मार्गारेट अल्वा

भारतीय राजकारणी

मार्गारेट अल्वा (जन्म: एप्रिल १४, इ.स. १९४२) या भारत देशातील राजकारणी आहेत.त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील कनारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या इ.स. १९७४ ते इ.स. १९९८ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. उत्तराखंड राज्याच्या राज्यपालपदी काम केल्यावर सध्या त्या राजस्थान राज्याच्या राज्यपाल आहेत.