एप्रिल १४
दिनांक
(१४ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)
एप्रिल १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०४ वा किंवा लीप वर्षात १०५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनइ.स.पू. पहिले शतक
संपादन- ४३ - फोरम गॅलोरमची लढाई - ज्युलियस सीझरचा मारेकरी डेसिमस ज्युनियस ब्रुटस मार्क ऍन्टनीच्या सैनिकांकडून ठार.
सतरावे शतक
- १६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.
- १६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.
- १६९९ : गुरू गोविंद सिंग यांनी 'खालसा'ची स्थापना केली.
अठरावे शतक
- १७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करून जंजिऱ्याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८२८ - नोआह वेब्स्टरने डिक्शनरीचा कॉपीराईट नोंदवला.
- १८६० - पोनी एक्सप्रेसचा पहिला घोडेस्वार साक्रामेंटो, कॅलिफोर्निया येथे पोचला.
- १८६५ - जॉन विल्कस बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. लिंकन दुसऱ्या दिवशी मृत्यू पावला.
विसावे शतक
संपादन- १९१२ - आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.
- १९१५ - तुर्कस्तानने आर्मेनियावर आक्रमण केले.
- १९३१ - स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने राजा आल्फोन्सो तेराव्याची हकालपट्टी केली व दुसरे स्पॅनिश प्रजासत्ताक अस्तित्वात आल्याचे जाहीर केले.
- १९४० - युनायटेड किंग्डमचे सैनिक नॉर्वेतील नाम्सोस गावात शिरले व गाव काबीज केले.
- १९४४ - मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.
- १९६२ - जॉर्जेस पॉम्पिदु फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९८६ - अमेरिकेच्या लढाउ विमानांनी लिब्याच्या बेंगाझी व ट्रिपोली शहरांवर हल्ला केला. ६० ठार.
- १९८६ - बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजून अबाधित आहे.
- १९८८ : यू.एस.एस.आर.ने अफगाणिस्तानातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
- १९९४ : भारताने गॅट करारास मान्यता दिली.
- १९९५: टेबल टेनिसमध्ये सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- १३३६ - गो-कोगोन, जपानी सम्राट.
- १५७८ - फिलिप तिसरा, स्पेनचा राजा.
- १७४१ - मोमोझोनो, जपानी सम्राट.
- १८३३ डॉ. विश्राम घोले, सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष
- १८६६ - ऍन सुलिव्हान, हेलन केलरची शिक्षिका.
- १८९१ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानचे शिल्पकार, मानवी हक्काचे कैवारी, अद्वितीय विद्वान
- १९१४: शांता हुबळीकर, अभिनेत्री
- १९१९: शमशाद बेगम, पार्श्वगायिका
- १९१९: के. सरस्वती अम्मा, भारतीय लेखक आणि नाटककार
- १९२२: अली अकबर खान, मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक
- १९२५ - एबेल मुझोरेवा, झिम्बाब्वेचा पंतप्रधान.
- १९२७: द. मा. मिरासदार , विनोदी लेखक
- १९४२: मार्गारेट अल्वा केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल
- १९४३: रामदास फुटाणे , वात्रटिकाकार
- १९७२- राजेश्वरी सचदेव, गायिका तथा अभिनेत्री
मृत्यू
संपादन- १५९९ - हेन्री वॅलप, इंग्लिश राजकारणी.
- १७५९ - जॉर्ज फ्रीडरीक हान्डेल, जर्मन संगीतकार.
- १९५० - श्री रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञ.
- १९६२ - सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.
- १९६३ - राहुल सांकृत्यायन इतिहासकार
- १९९७ - चंदू पारखी , चित्रपट आणि नाट्य अभिनेते
- २०१३ - राम प्रसाद गोएंका, उद्योगपती
प्रतिवार्षिक पालन
संपादन- आंबेडकर जयंती – भारत व जगभरात
- ज्ञान दिन – महाराष्ट्र राज्य
- मुंबई अग्निशमन सेवा दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर एप्रिल १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - एप्रिल १५ - एप्रिल १६ - (एप्रिल महिना)