पिएर क्युरी

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.

पिएर क्युरी हे शास्त्रज्ञ आहेत.

पिएर क्युरी

पिएर क्युरी
पूर्ण नावपिएर क्युरी
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

जन्म व बालपण संपादन

पिएर क्युरी यांचा जन्म १५ मे १८५९ या दिवशी पॅरिस येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव युजीन असे होते. त्यांचे वडील व आजोबा हे दोघही डॉक्टर होते. त्यांच्या आईचे नाव सोफी असे होते. त्यांना जॅक नावाचा एक भाऊ होता. पिएर क्युरी हे शाळेत गेलेच नाही. त्यांना युजीन आणि सोफी यांनी घरीच शिक्षण दिले. पिएर क्युरी यांना लहानपणी प्रत्येक विषयाच्या मुळाशी जायला आवडत.

शिक्षण संपादन

पिएर क्युरी हे शाळेत गेले नाहीत. त्यांना युजीन आणि सोफी यांनी घरीच शिक्षण दिले. नंतर त्यांना खासगी शिकवणी लावली. ते वयाच्या १६ व्या वर्षी बी.एस्सी. आणि १८ व्या वर्षी एम.एस्सी झाले.

विवाह संपादन

पिएर क्युरी यांचा विवाह नोबेल पुरस्कार प्राप्त मेरी क्युरी यांच्याशी २६ जुलै १८९५ साली झाला.

संशोधन व कार्य संपादन

पिएर आणि जॅक या दोघांनी मिळून पिझो इलेक्ट्रिक क्वार्ट्झचा शोध लावला. पिझो क्वार्ट्झ इलेक्ट्रोमीटरचे उपकरण तयार केले. पिएर क्युरी यांनी क्युरी स्केल नावाची मोजमापपट्टीही तयार केली.

मृत्यू संपादन

१९०६ साली पिएर क्युरी यांचा अपघाती मृत्यू झाला.

पुरस्कार संपादन

बाह्यदुवे संपादन