कोन्राड आडेनाउअर
(कॉन्राड अडेनॉउअर या पानावरून पुनर्निर्देशित)
कोन्राड आडेनाउअर (५ जानेवारी, इ.स. १८७६ - १९ एप्रिल, इ.स. १९७६) हा दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या पराभवानंतर निर्माण झालेल्या पश्चिम जर्मनी देशाचा पहिला चान्सेलर होता. १९४९ ते १९६३ ह्या दरम्यान चान्सेलरपदावर असणाऱ्या आडेनाउअरने महायुद्धामध्ये बेचिराख झालेल्या जर्मनीला विकास व समृद्धीच्या वाटेवर आणले. त्याने फ्रान्स, अमेरिका इत्यादी पश्चिमी देशांसोबत अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण केले व युरोप व जगात पश्चिम जर्मनीला पुन्हा एकदा मान मिळवून दिला.
कोन्राड आडेनाउअर | |
पश्चिम जर्मनीचा चान्सेलर
| |
कार्यकाळ १५ सप्टेंबर १९४९ – १६ ऑक्टोबर १९६३ | |
मागील | पद-निर्मिती लुट्झ ग्राफ श्वेरिन फॉन क्रोसिक |
---|---|
पुढील | लुडविग एर्हार्ड |
जन्म | ५ जानेवारी, १८७६ क्योल्न, जर्मनी |
मृत्यू | १९ एप्रिल, १९६७ (वय ९१) नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन |
राजकीय पक्ष | ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन |
सही |
वयाच्या ७३व्या वर्षी चान्सेलरपदावर निवडून आलेला आडेनाउअर त्याच्या मेहनती जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होता.
बाह्य दुवे
संपादन- व्यक्तिचित्र Archived 2016-02-28 at the Wayback Machine. (जर्मन)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |