अमर्त्य सेन (बांग्ला: অমর্ত্য সেন , उच्चार - ओमोर्तो शेन; रोमन लिपी: Amartya Sen) (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३ - हयात) हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र[श १]सामाजिक पर्याय सिद्धान्त[श २] या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९९८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.[१] गरिबी ,आरोग्य ,शिक्षण , मानवी  विकास आणि एकूणच मानवी कल्याण त्यांच्या विचाराचा गाभा आहे . भारतीय केंद्रशासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी इ.स. २००७ साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे [श ३] हे अध्यक्ष आहेत [२] एकूण ४० वर्षात, ३०हून अधिक भाषांत अमर्त्य सेन यांची पुस्तके प्रकाशित झाली आहे. ते 'ऑक्सब्रिज कॉलेज'चे पहिले आशियाई प्रमुख आहेत.

अमर्त्य सेन
Amartya Sen 20071128 cologne.jpg
जन्म ३ नोव्हेंबर, १९३३ (1933-11-03) (वय: ८६)
शांतिनिकेतन, भारत
निवासस्थान न्यू यॉर्क शहर अमेरिका
नागरिकत्व Flag of India.svgभारतीय
कार्यक्षेत्र अर्थशास्त्र
प्रशिक्षण हार्वर्ड विद्यापीठ (२००४ - )
कैम्ब्रिज विद्यापीठ (१९९८-२००४)
हार्वर्ड विद्यापीठ (१९८८-१९९८)
ऑक्सफर्ड विद्यापीठ (१९७७-१९८८)
लंडन अर्थशास्त्र विद्यालय (१९७१-१९७७)
दिल्ली अर्थशास्त्र विद्यालय (१९६३-१९७१)
कैम्ब्रिज विद्यापीठ (१९५७-१९६३)
जाधवपूर विद्यापीठ (१९५६-१९५८)
पुरस्कार Nobel prize medal.svg अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते


लवकर जीवन आणि शिक्षणसंपादन करा

अमर्त्य सेन यांचा जन्म बंगाल मध्ये झाला.रवींद्रनाथ टागोर यांनी अमर्त्य सेन यांना त्याचे नाव दिले (बंगाली অমৃত্য ortमॉर्टो, लिटर. "अमर").

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. ^ "The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel 1998" (इंग्रजी मजकूर). नोबेल प्रतिष्ठान. १४ जून २०१४ रोजी पाहिले. 
  2. ^ "नालंदा विद्यापीठ अधिनियम, इ.स. २०१०" (इंग्रजी मजकूर). १३ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 


शब्दसूचीसंपादन करा

  1. ^ इंग्लिश: Welfare economics वेल्फेअर इकनॉमिक्स, मराठी: कल्याणाभिमुख अर्थशास्त्र
  2. ^ इंग्लिश: Social choice theory सोशल चॉइस थिअरी, मराठी: सामाजिक पर्याय सिद्धान्त
  3. ^ इंग्लिश: Nalanda Mentor Group रोमन लिपीतील लघुरूप: NMG, मराठी: नालंदा मार्गदर्शक समूहकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.