कतार
कतार (अरबी: قطر) हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पावरील एक छोटा देश आहे. कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया देश व इतर सर्व बाजुंनी इराणचे आखात आहे. कतारच्या वायव्येला इराणच्या आखातात बहरैन हा द्वीप-देश आहे. दोहा ही कतारची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१४ साली कतारची लोकसंख्या सुमारे २१ लाख होती ज्यापैकी केवळ ११ टक्के लोक कतारी नागरिक होते व उर्वरित सर्व रहिवासी येथे स्थलांतरित होऊन आलेले आहेत.
कतार دولة قطر दौलत कतार | |||||
| |||||
राष्ट्रगीत: अस्-सलाम अल्-आमिरी | |||||
कतारचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
दोहा | ||||
अधिकृत भाषा | अरबी | ||||
सरकार | अमिराती (संपूर्ण एकाधिकारशाही) | ||||
- राष्ट्रप्रमुख | तमीम बिन हमाद अल थानी | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ३ सप्टेंबर १९७१ (युनायटेड किंग्डमपासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ११,४३७ किमी२ (१४८वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
- २०१० | २१,५५,४४६[१] (१४२वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १२३.२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २९८.४ अब्ज[२] अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १,४५,८९४ अमेरिकन डॉलर (१वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.८०३[३] (अति उच्च) (३८ वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | कतारी रियाल | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी+०३:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | QA | ||||
आंतरजाल प्रत्यय | .qa | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ९७४ | ||||
प्रदीर्घ काळ ओस्मानी साम्राज्याच्या भाग राहिल्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस कतार युनायटेड किंग्डमचे मांडलिक संस्थान बनले. १९७१ साली कतारला स्वातंत्र्य मिळाले. येथे पारंपरिक काळापासून संपूर्ण राजेशाही अस्तित्वात असून अल थानी परिवाराकडे १९व्या शतकापासून कतारची सत्ता आहे. तमीम बिन हमाद अल थानी हा कतारचा विद्यमान अमीर आहे. इस्लाम हा कतारचा राजधर्म असून येथे शारिया कायदा अस्तित्वात आहे.
वार्षिक दरडोई उत्पन्नानुसार कतार जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. येथे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे आहेत. कतारमधील राहणीमान उच्च दर्जाचे असून येथील अर्थव्यवस्था विकसित आहे. अरब जगतात व अरब संघात कतारचे मोठे सामर्थ्य आहे. २०२२ फिफा विश्वचषकासाठी कतारची यजमानपदी निवड झाली आहे. अल जजीरा, कतार एअरवेज इत्यादी कतारी कंपन्या झपाट्याने वाढत आहेत.
इतिहास
संपादननावाची व्युत्पत्ती
संपादनप्रागैतिहासिक कालखंड
संपादनभूगोल
संपादनचतुःसीमा
संपादनराजकीय विभाग
संपादनमोठी शहरे
संपादनसमाजव्यवस्था
संपादनवस्तीविभागणी
संपादनधर्म
संपादनशिक्षण
संपादनसंस्कृती
संपादनराजकारण
संपादनअर्थतंत्र
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Populations". Qsa.gov.qa. 2010-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-10-02 रोजी पाहिले.
- ^ "Report for Selected Countries and Subjects (PPP valuation of country GDP)". IMF. October 2014.
- ^ "Human Development Report 2010" (PDF). United Nations. 2010. 5 November 2010 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)