संपूर्ण राजेशाही ही एक सरकार-पद्धत आहे ज्यामध्ये देश अथवा राज्याचे सर्वाधिकार राजा अथवा सम्राटाच्या हातात असतात. एकाधिकारशाहीचा एक प्रकार असलेल्या संपूर्ण राजेशाहीमध्ये सम्राटाला संपूर्ण सामर्थ्य असते व त्याची निवड सर्वसाधारणपणे शाही कुटुंबामधूनच होते.

विद्यमान संपूर्ण राजेशाह्यासंपादन करा

देश सम्राट
  ब्रुनेई सुलतान हसनल बोल्किया
  ओमान सुलतान काबूस बिन सैद अल सैद
  सौदी अरेबिया सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद
  इस्वाटिनी राजा उम्स्वाती तिसरा
  व्हॅटिकन सिटी पोप फ्रान्सिस
  कतार शेख तमीम बिन हमाद अल थानी
  संयुक्त अरब अमिराती खलिफा बिन झायेद अल नह्यान

ह्याखेरीज उत्तर कोरियामध्ये देखील किम जाँग-उन ह्याची राजेशाही आहे असे मानण्यात येते परंतु तेथे शाही घराणे अस्तित्वात नाही.

हे सुद्धा पहासंपादन करा