प्रंबानन किंवा रारा जोंगग्रॉंग (जावानीज: ꦫꦫꦗꦺꦴꦁꦒꦿꦁ, रोमनीकृत: रारा जोंगग्रॉंग) हे योगकार्ता या इंडोनेशियातील विशेष प्रदेशातील ९व्या शतकातील त्रिमूर्तींचे हिंदू मंदिर आहे. त्रिमूर्तींपैकी ब्रह्मा म्हणजे निर्माता, विष्णू म्हणजे पालनकर्ता आणि संहारक किंवा समूळ बदल घडवून आणणारा म्हणजे शिव! या मंदिर परिसराचा विस्तार मध्य जावा आणि योग्यकर्ता प्रांतांच्या सीमेवर योग्यकर्ता शहराच्या ईशान्य दिशेस अंदाजे १७ किलोमीटर (११ मैल) अंतरावर आहे.[./Https://en.wikipedia.org/wiki/Special%20Region%20of%20Yogyakarta [१]]

इंडोनेशिया येथील सर्वात मोठ्या आणि आग्नेय आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या असलेल्या या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. उंच आणि कळसाकडे निमुळत्या होत जाणाऱ्या वास्तू हे हिंदू स्थापत्यशास्त्राचे एक वैशिष्ट्य आहे. अनेक छोट्या छोट्या आणि वेगवेगळ्या मंदिरांनी बनलेल्या या मंदिर संकुलाची ४७ मीटर (१५४ फूट) उंच अशी मध्यवर्ती वास्तू हिंदू स्थापत्यशास्त्राचे हेच वैशिष्ट्य दर्शविते.[२] प्रंबानन जगभरातील अनेक पर्यटकांना आकर्षित करते.[३][४]