काबो व्हर्देचे प्रजासत्ताक (पोर्तुगीज: República de Cabo Verde; लोकप्रिय नाव: केप व्हर्दे) हा पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ १० बेटांच्या द्वीपसमूहावर वसलेला एक देश आहे. हा द्वीपसमूह अटलांटिक महासागरामध्ये पश्चिम आफ्रिकेच्या ५७० किमी पश्चिमेस स्थित आहे. १५व्या शतकापर्यंत पूर्णपणे निर्मनुष्य असलेला हा द्वीपसमूह १४६० साली पोर्तुगीजांनी शोधुन काढला व तिथे वसाहत स्थापन केली. आफ्रिकेतील गुलामांना युरोपामध्ये नेणारी जहाजे येथे थांबा घेत असत. ह्यामुळे १७व्या व १८व्या शतकात केप व्हर्देची भरभराट झाली. १९व्या शतकात गुलागिरीवर बंदी घालण्यात आल्यानंतर केप व्हर्देची अर्थव्यवस्था खालावत गेली. १९७५ मध्ये पोर्तुगालने केप व्हर्देला स्वातंत्र्य मंजूर केले. सध्या केप व्हर्दे संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २०१५ साली ५.२५ लाख लोकसंख्या असलेल्या केप व्हर्देचे बहुसंख्य रहिवासी मिश्र युरोपीय व आफ्रिकन वंशाचे आहे.

केप व्हर्दे
República de Cabo Verde
काबो व्हर्देचे प्रजासत्ताक
केप व्हर्देचा ध्वज केप व्हर्देचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: स्वातंत्र्याचा मंत्र
केप व्हर्देचे स्थान
केप व्हर्देचे स्थान
केप व्हर्देचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
प्राईया
अधिकृत भाषा पोर्तुगीज
इतर प्रमुख भाषा केप व्हर्देयन क्रियोल
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख होर्हे कार्लोस फोन्सेका
 - पंतप्रधान होजे मारिया नेव्हेस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ५ जुलै १९७५ (पोर्तुगालपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ४,०३३ किमी (१७२वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ५,२५,००० (१६७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२३.७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २३०.५ कोटी अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ६,५६९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.६३६ (मध्यम) (१२३ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन केप व्हर्दे एस्कुदो
आंतरराष्ट्रीय कालविभाग केप व्हर्दे प्रमाणवेळ (यूटीसी−०१:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ CV
आंतरजाल प्रत्यय .cv
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २३८
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

केप व्हर्दे आफ्रिकेमधील प्रगत व संपूर्ण लोकशाही असलेल्या देशांपैकी एक आहे. येथे फारशी नैसर्गिक संपत्ती उपलब्ध नसल्यामुळे केप व्हर्देची अर्थव्यवस्था पर्यटन व परकीय गुंतवणुकीवर अवलंबून आहे. २००७ साली केप व्हर्देला अविकसित देशांच्या गटातून विकसनशिल देशांच्या गटात बढती देण्यात आली. आफ्रिकेत हुकुमशाही व अराजकता वाढीस लागली असताना केप व्हर्देला येथील राजकीय व सामाजिक स्थैर्य व आर्थिक प्रगतीसाठी कौतुकाचे प्रमाणपत्र दिले जाते. २०१४ सालच्या लोकशाही निर्देशांकानुसार येथील लोकशाही जगात ३१व्या क्रमांकाची बळकट मानली जाते.

इतिहास

संपादन

नावाची व्युत्पत्ती

संपादन

प्रागैतिहासिक कालखंड

संपादन

भूगोल

संपादन

चतुःसीमा

संपादन

राजकीय विभाग

संपादन

मोठी शहरे

संपादन

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

शिक्षण

संपादन

संस्कृती

संपादन

राजकारण

संपादन

वाहतूक

संपादन

टी.ए.सी.व्ही. काबो व्हेर्दे एरलाइन्स ही केप व्हर्देची राष्ट्रीय विमानकंपनी आहे. ही कंपनी केप व्हर्देला युरोपातील पॅरिस, मिलान, लिस्बन, माद्रिद, ॲम्स्टरडॅम इत्यादी प्रमुख विमानतळांसोबत जोडते. काबो व्हर्दे एरलाइन्सद्वारे अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स तसेच ब्राझीलमधील रेसिफेफोर्तालेझा ही शहरे देखील केप व्हर्देसोबत जॉडली गेली आहेत.

अर्थतंत्र

संपादन

केप व्हर्दे फुटबॉल संघ देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. केप व्हर्देने आजवर २०१३ व २०१५ सालच्या आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. ऑलिंपिक खेळात केप व्हर्दे १९९६ पासून सामील होत आहे.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: