काबो व्हर्दे एरलाइन्स
(टी.ए.सी.व्ही. काबो व्हेर्दे एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
टी.ए.सी.व्ही. काबो व्हर्दे एरलाइन्स (पोर्तुगीज: Transportes Aéreos de Cabo Verde) ही पश्चिम आफ्रिकेमधील केप व्हर्दे ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. प्राइया येथे मुख्यालय असलेल्या टी.ए.सी.व्ही.चा प्रमुख वाहतूकतळ साल ह्या बेटावरील आमिल्कार काब्राल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. युरोपियन संघाने आफ्रिका खंडामधील बव्हंशी विमान कंपन्यांवर बंदी घातली असल्यामुळे आफ्रिकेतून युरोपाला सेवा पुरवणारी टी.ए.सी.व्ही. ही मोजक्या आफ्रिकन कंपन्यांपैकी एक आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2008-06-12 at the Wayback Machine.