रेसिफे
रेसिफे (पोर्तुगीज: Recife) ही ब्राझिल देशाच्या पर्नांबुको राज्याची राजधानी आहे. हे शहर ब्राझिलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. १५.३६ लाख शहरी तर ४१.३६ लाख महानगरी लोकसंख्या असलेले रेसिफे ब्राझिलमधील चौथे मोठे महानगर क्षेत्र आहे.
रेसिफे Recife |
|||
ब्राझिलमधील शहर | |||
| |||
रेसिफेचे पर्नांबुकोमधील स्थान | |||
देश | ब्राझील | ||
राज्य | पर्नांबुको | ||
स्थापना वर्ष | मार्च १२, इ.स. १५३७ | ||
क्षेत्रफळ | २१८ चौ. किमी (८४ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ३३ फूट (१० मी) | ||
लोकसंख्या (२०१०) | |||
- शहर | १५,३६,९३४ | ||
- घनता | ७,१६३.३ /चौ. किमी (१८,५५३ /चौ. मैल) | ||
- महानगर | ४१,३६,५०६ | ||
recife.pe.gov.br |
२०१४ फिफा विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या ब्राझिलमधील १२ यजमान शहरांपैकी रेसिफे एक आहे. ह्यासाठी ४६,१६० आसन क्षमता असणारे एक नवे स्टेडियम येथे बांधण्यात येत आहे.
जुळी शहरे
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |