ताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक (मराठी लेखनभेद: ताजिकिस्तानाचे प्रजासत्ताक; ताजिक: Ҷумҳурии Тоҷикистон, चुम्हुरिये तॉचिकिस्तॉन ; फारसी: جمهوری تاجیکستان ; रशियन: Республика Таджикистан ;), हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून अफगाणिस्तानाच्या वाखान पट्ट्यामुळे त्या दुरावल्या आहेत.

ताजिकिस्तान
ҷумҳурии Тоҷикистон
ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक
ताजिकिस्तानचा ध्वज ताजिकिस्तानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: सुरुदी मिल्ली
ताजिकिस्तानचे स्थान
ताजिकिस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
दुशान्बे
अधिकृत भाषा ताजिक
सरकार
 - राष्ट्रप्रमुख एमोमाली राहमोन
 - पंतप्रधान कोखिर रसुल्झोदा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (सोव्हिएत संघापासून)
सप्टेंबर ९, इ.स. १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,४३,१०० किमी (९५वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.३
लोकसंख्या
 -एकूण ७३,४९,१४५[१] (१००वा क्रमांक)
 - घनता ४५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ८.८०२ अब्ज अमेरिकन डॉलर (१३९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,३८८ अमेरिकन डॉलर (१५९वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन ताजिकिस्तानी सोमोनी (TJS)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०५:००
आय.एस.ओ. ३१६६-१ TJ
आंतरजाल प्रत्यय .tj
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९९२
राष्ट्र_नकाशा

ताजिकिस्तानाची बहुसंख्य प्रजा फारसीभाषक ताजिक लोकांची आहे. सामाईक ऐतिहासिक वारशामुळे संस्कृती व राहणी यांबाबत अफगाणिस्तान व इराणातील लोकांशी त्यांचे पुष्कळ साम्य आहे. ऐतिहासिक काळात समानी साम्राज्याचा भाग असलेला हा देश इ.स.च्या २०व्या शतकात सोव्हियेत संघातील घटक प्रजासत्ताक बनला. ताजिक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य असे तत्कालीन नाव असणारा ताजिकिस्तान इ.स. ११९१ साली सोव्हियत संघातून बाहेर पडून सार्वभौम झाला.

इतिहाससंपादन करा

सांप्रतकाळी ताजिकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूप्रदेशात सुमारे इ.स.पू. ४०००पासून मानवी वसवणुकीच्या खुणा आढळल्या आहेत [ संदर्भ हवा ]. या प्रदीर्घ इतिहासात ताजिकिस्तानाच्या भूभागावर अनेक साम्राज्यांची, राज्यांची सत्ता होती. वेदकालीन रचनाकार यास्काच्या (इ.स.पू. ७वे शतक) निरुक्तात काम्बोजातील लोक शावति हे क्रियापद जाणे अश्या अर्थी वापरत असल्याची टिप्पणी आहे. आधुनिक काळीही अमू दर्याच्या काठी व पामीर पर्वतांच्या परिसरात प्रचलित असलेल्या वाल्खी, शिगाली, मुंजानी, याग्नोबी इत्यादी बोल्यांमध्ये प्राचीन काम्बोजी भाषेप्रमाणे शावतिवरून उद्भवलेले शब्द जाणे या अर्थी वापरले जातात. भाषाशास्त्रीय सिद्धान्तांनुसार काम्बोज व परम काम्बोज या वैदिक साहित्यात वर्णिलेल्या प्रदेशांत वर्तमान ताजिकिस्तानाचा अंतर्भाव होत असावा.

इ.स.पू. ६व्या शतकापासून इ.स.पू. ४थ्या शतकापर्यंत या भूभागावर इराणातल्या हखामनी साम्राज्याचा अंमल होता. पुढे महान अलेक्झांडराने हखामनी साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर ग्रेको-बाख्तरी राज्याच्या उत्तरसीमाप्रदेशात हा भाग मोडला जाऊ लागला. इ.स.पू. ४थ्या शतकाच्या अखेरपासून इ.स.पू. २र्‍या शतकाच्या आरंभापर्यंत हा भाग बाख्तरी राज्याचा हिस्सा होता. तुखार या शक टोळ्यांनी आक्रमणे करून हा भाग जिंकल्यानंतर तो तुखारिस्तानात गणला जाऊ लागला. इ.स.पू. २र्‍या शतकात हान राजघराण्याने राजदूत पाठवून चिनी साम्राज्याच्या पश्चिमेस वसलेल्या बाख्तराशी राजनैतिक संबंध जुळवले.

 
सामानी साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा आधुनिक नकाशा

इ.स.च्या ७व्या शतकात अरबांनी येथे इस्लाम आणला. मात्र अल्पकाळातच अरबांना सारून सामानी साम्राज्याने या भागावर आपली सत्ता स्थापली. सामानी साम्राज्याच्या काळातच समरकंदबुखारा ही शहरे (ही शहरे सध्या उझबेकिस्तानात मोडतात) भरभराटीस येऊन ताजिक संस्कृतीची प्रमुख केंद्रे बनली. पुढे मंगोलांनी मध्य आशियाचा बह्वंशी प्रदेश पादाक्रांत केला. इ.स.च्या १३व्या शतकापासून १८व्या शतकाच्या मध्यापर्यंत मंगोलवंशीयांच्या राज्यांनी येथे सत्ता गाजवली. त्यानंतर सध्या ताजिकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूभागात बुखार्‍याची अमिरात उदयास आली व तिची सत्ता इ.स. १९२०पर्यंत येथे चालली.

इ.स.च्या १९व्या शतकाच्या उत्तरा‍र्धात रशियन साम्राज्याने मध्य आशियात चालवलेल्या साम्राज्यविस्तार मोहिमांत कास्पियन समुद्रापासून अफगाणिस्तानापर्यंतचा तुर्कवंशीयांचे बाहुल्य असलेला मोठा भूप्रदेश बळकावला व त्यांपासून रशियन तुर्कस्तान नावाचा प्रशासकीय विभाग बनवला. इ.स. १९१७ साली बोल्शेविक क्रांतीने रशियन साम्राज्य उलथून टाकल्यानंतरच्या संधिकाळात रशियन तुर्कस्तानातील लोकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची ऊर्मी बळावली. त्यांनी बोल्शेविक राजवटीविरुद्ध गनिमी युद्ध छेडले. गनिमी तंत्राने उठाव करणार्‍या या बास्माची बंडखोरांनी सुमारे चार वर्षे लढा दिला; मात्र अंतिमतः लाल सैन्याची सरशी झाली. इ.स. १९२९ साली सोव्हियेत संघांतर्गत ताजिक सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताकाची निर्मिती करण्यात आली. इ.स. ११९१ साली सोव्हियेत संघ कोसळल्यावर ताजिकिस्तानाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले.

भूगोलसंपादन करा

 
ताजिकिस्तानातील पर्वतरांगा

मध्य आशियात वसलेला ताजिकिस्तान ३६° उ. ते ४१° उ. अक्षांशांदरम्यान आणि ६७° पू. ते ७५° पू. रेखांशांदरम्यान पसरला आहे. ताजिकिस्तानाचा निम्म्याहून अधिक भूभाग समुद्रसपाटीहून ३००० मी. उंचीवर असून तेथे पामीर पर्वतंरागांचा डोंगराळ मुलूख आहे. उत्तरेकडील फरगाना खोरे आणि दक्षिणेकडील कोफारनिहोनवाख्श खोर्‍यांच्या प्रदेशातला भाग तुलनेने सखल आहे. तजिकिस्तनाच्या पर्वतीय भागात उगम पावणार्‍या हिमनद्या अरल समुद्राचे प्रमुख जलस्रोत आहेत.

राजकीय विभागसंपादन करा

मोठी शहरेसंपादन करा

समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागणीसंपादन करा

thumb|right|250px|ताजिकिस्तानचा वस्तीनकाशा. जुलै, इ.स. २००९च्या अंदाजानुसार ताजिकिस्तानची लोकसंख्या ७३,४९,१४५ आहे.[१] ताजिकभाषक ताजिक लोक येथील मुख्य गट आहे तर रशियन आणि उझबेकांचीही संख्याही लक्षणीय आहे. येथील रशियन लोक आता पुन्हा रशियात परतत आहेत[२] इ.स. १९८९मध्ये ८.९% व्यक्ती रशियन होत्या.[३] याशिवाय बादाख्शान प्रांतात पामिरी लोकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे.

धर्मसंपादन करा

शिक्षणसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

राजकारणसंपादन करा

अधिकृत रित्या ताजिकिस्तान प्रजासत्ताक असून येथे संसदेच्या आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतात. मात्र सोव्हियेतोत्तर काळातील यादवी संपल्यानंतरच्या इ.स. १९९९ सालातल्या निवडणुकींपासून संसदेत कायम बहुमत राखलेल्या ताजिकिस्तानच्या जनता लोकशाही पक्षाने राजकारणावर सातत्याने पकड राखली आहे. इ.स. २००५ सालातल्या संसदीय निवडणुकींमध्ये अध्यक्ष एमॉम-अली राहमॉन याने निवडणूक प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचे अनेक आरोप विरोधी राजकीय पक्ष आणि राजकीय निरीक्षकांकडून झाले. इ.स. २०१०मधील संसदीय निवडणुकींमध्ये ताजलोपला ४ जागा जिंकता आल्या नाहीत; तरीही एकंदरीत संसदेत ताजलोप सुरक्षित आधिक्य राखून होता. ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटी ॲंड को-ऑपरेशन इन युरोप या संघटनेच्या राजकीय निरीक्षकांनुसार इ.स. २०१०मधील निवडणुकी "लोकशाहीच्या किमान प्रमाणनिकषांपिकी काही निकषांमध्ये अनुत्तीर्ण ठरल्या"[४]. मात्र निवडणुकींत घडलेले गैरप्रकार क्षुल्लक होते व त्यांचा ताजिक लोकांच्या निवड-पसंतीवर काहीही दुष्परिणाम झाला नाही, असा पवित्रा शासनाने घेतला.

६ नोव्हेंबर, इ.स. २००६ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकींवर "मुख्यप्रवाहातील" विरोधी राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला होता. २३,००० सदस्यसंख्या असलेल्या इस्लामी प्रबोधन पक्षाने बहिष्कारात सहभाग घेतला.

अर्थतंत्रसंपादन करा

ताजिकिस्तान भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या घटक प्रजासत्ताकांमधील सर्वांत गरीब देश होता; तसेच सांप्रत काळीदेखील मध्य आशियातील सर्वाधिक गरीब देशांपैकी एक देश आहे. भ्रष्टाचार, आर्थिक सुधारणांमधील असमतोल व आर्थिक व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे या देशाची वर्तमानकालीन अर्थव्यवस्था नाजूक आहे. ॲल्युमिनियम, कापूस इत्यादी मालाची निर्यात व स्थलांतरित परदेशस्थ ताजिक कामगार-नोकरदारांनी पाठवलेले परदेशी वित्तप्रेषण यांवर देशाचा परकीय महसूल आधारलेला आहे. अ‍ॅल्युमिनियम-उत्पादनक्षेत्रात ताजिकिस्तान अ‍ॅल्युमिनियम कंपनी, अर्थात ताल्को, या शासकीय कंपनीचे वर्चस्व असून तिचे उत्पादनप्रकल्प मध्य आशियात व जगभरात सर्वांत मोठे आहेत[५]. नोकरी-धंद्यासाठी परदेशी - व खासकरून रशियात - गेलेल्या स्थलांतरित परदेशस्थ ताजिक कामगार-नोकरदारांनी पाठवलेले परदेशी वित्तप्रेषण हा गरीबीची झळ सोसणार्‍या ताजिकिस्तानातील लाखो लोकांच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार बनला असून ते राष्ट्रीय सकल वार्षिक उत्पन्नाच्या ३६.२% हिश्श्याएवढ्या मोलाचे असल्याचा अंदाज आहे[६].

संदर्भसंपादन करा

  1. a b "पीपल ऑफ ताजिकिस्तान (ताजिकिस्तानाचे लोक)". द वर्ल्ड फॅक्टबुक (इंग्लिश मजकूर). सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन्स एजन्सी, अमेरिका. 
  2. ^ रॉबर्ट ग्रीनॉल (२३ नोव्हेंबर, इ.स. २००५). "रशियन्स लेफ्ट बिहाइंड इन सेंट्रल एशिया (मध्य आशियात मागे राहिलेले रशियन)" (इंग्लिश मजकूर). बीबीसी न्यूज. .
  3. ^ "ताजिकिस्तान - एथ्निक ग्रुप्स (ताजिकिस्तान - वांशिक गट)" (इंग्लिश मजकूर). लायब्ररी ऑफ कॉंग्रेस, अमेरिका. 
  4. ^ "ताजिकिस्तान्स फ्लॉड इलेक्शन : चेंज यू कान्ट बीलिव्ह इन (ताजिकिस्तानातील सदोष निवडणुकी : अविश्वसनीय बदल)" (इंग्लिश मजकूर). इकनॉमिस्ट. ४ मार्च, इ.स. २०१०. १३ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी पाहिले. 
  5. ^ "ताजिकिस्तान अ‍ॅल्युमिनियम" (रशियन मजकूर). एक्सपर्ट कझाकस्तान. १२ जून, इ.स. २००४. 
  6. ^ दिलीप रथ, संकेत मोहापात्रा, के.एम. विजयलक्ष्मी, चीमेई शू (= २९ नोव्हेंबर, इ.स. २००७). "रेमिटन्स ट्रेंड्स २००७. मायग्रेशन ॲंड डेव्हलपमेंट ब्रीफ ३." (इ.स. २००७मधील वित्तप्रेषणाचे कल. स्थलांतर व विकासाचा आढावा) (पीडीएफ) (इंग्लिश मजकूर). वर्ल्ड बॅंक. 


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: