अरल समुद्र (कझाक: Арал теңізі; उझबेक: Orol dengizi; रशियन: Аральскοе мοре; ताजिक: Баҳри Арал; फारसी: |دریاچه خوارزم) हे मध्य आशियातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. अरल समुद्र पूर्णपणे बंदिस्त असून त्यामधून कोणताही बहिर्वाह होत नाही. अरल समुद्राच्या उत्तरेला कझाकस्तान व दक्षिणेला उझबेकिस्तान हे देश आहेत.

अरल समुद्र
Aral Sea  
अरल समुद्र Aral Sea - झपाट्याने घटणारा असल समुद्रातील पाण्याचा साठा
अरल समुद्र
Aral Sea - झपाट्याने घटणारा असल समुद्रातील पाण्याचा साठा
झपाट्याने घटणारा असल समुद्रातील पाण्याचा साठा
स्थान मध्य आशिया
गुणक: 45°00′N 60°00′E / 45.000°N 60.000°E / 45.000; 60.000
प्रमुख अंतर्वाह सिर दर्या
प्रमुख बहिर्वाह -
पाणलोट क्षेत्र १५,४९,००० वर्ग किमी
भोवतालचे देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान

उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ १७,१६०
कमाल खोली १३८
पाण्याचे घनफळ २७ घन किमी (२००७ साली)


१९६० च्या दशकामध्ये सोव्हिएत संघाने अरल समुद्राला मिळणाऱ्या अनेक नद्या सिंचनासाठी इतरत्र वळवल्या. ह्या कारणास्तव एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या सरोवरांपैकी एक असणारा अरल समुद्र घटत चालला आहे. २००७ सालाअखेरीस ह्या सरोवराच्या मूळ आकाराच्या केवळ १० टक्केच पाणी अस्तित्वात आहे. ह्यामुळे येथील मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. अरल समुद्राचे घटणे ही जगातील सर्वात भयंकर नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक मानली जाते.

अरल समुद्रामधील एक भंगार जहाज

अरल समुद्र कोरडा होण्याची कारणे

संपादन

एके काळी जगातील चौथ्या क्रमांकाचा तलाव असणारा अरल समुद्र आता कोरडा पडला आहे. हा समुद्र मूळच्या ६८,००० चौरस किलोमीटर आकारमानापासून, २०१४ साली फक्त १७,१६० चौरस किमी शिल्लक राहिला आहे.

२०२० पर्यंत हा समुद्र नष्ट झालेला असेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

१९६० सालापर्यंत सगळे ठीक होते. रशिया एकसंध होता. आताचे कझाकस्तान आणि उझबेकिस्तान हे रशियाचेच भाग होते. नंतर रशियाचे तुकडे झाले आणि अनेक राष्ट्रे उदयाला आली. त्यांपैकी कझाकस्तान आणि उझबेकिस्तान ही दोन राष्ट्रे झाली.

अमुदर्या आणि सिरदर्या नावाच्या दोन प्रमुख नद्या या समुद्राला येऊन मिळत. ह्या नद्यांचे पाणी हाच अरलचा प्रमुख जलस्रोत होता.मात्र रशियाने कापूस आणि इतर पिकांसाठी या नद्यांचे पाणी शेतीकडे वळवले. त्यासाठी मोठमोठी धरणे बांधली आणि कालवे काढले. परिणामी समुद्रात गोडे पाणी येणे बंद झाले आणि समुद्राचा खारटपणा वाढला. हळूहळू समुद्र आटू लागला. २०२० मध्ये अरल समुद्र पूर्णपणे कोरडा होईल असे भाकित आहे.याचे नाव केवळ इतिहासात असेल.

अरल समुद्राच्या नामशेष होण्याचे परिणाम

संपादन

या समुद्राच्या आसपासचे वातावरण बदलले,. उन्हाळा कडक आणि हिवाळा अतिथंड बनला.. समुद्राची जमीन जी आता कोरडी आहे, ती खारट बनली आहे. वारे वाहताना आपल्याबरोबर येथील मीठयुक्त रेती घेऊन जातात. ही रेती शेजारील मोठ्या जमिनींवर पसरत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनल्या आहेत. त्यामुळे शेतीचे उत्पन्‍न घटत आहे व त्याचा दर्जा घसरत आहे. शेतकरी (अज्ञानापोटी आणि दीर्घदृष्टीने विचार न करता) क्षाराचा परिणाम कमी करण्यासाठी शेताला जास्त पाणी देताहेत. त्यामुळे शेते अजूनच खारट बनत आहेत. श्वासावाटे क्षार शरीरात गेल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

 
1960–2014
 
२०१८मधील अरल समुद्राचे अवकाशातून घेतलेले चित्र
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: