शक (फारसी:ساکا; ग्रीक: Σάκαι; लॅटिन: Sacae; चिनी: 塞; इंग्लिश: Scythians) हे पूर्व इराण आणि युरेशियाच्या स्टेप्स भागात राहणाऱ्या भटक्या जमाती होत्या.[][][] रेने ग्रुसेच्या संशोधनानुसार चिनी लोक ताशकेंत, फर्गाना आणि काश्गरच्या आसपास राहणाऱ्या लोकांना स्से नावाने ओळखत, इराणी व भारतीय लोक त्यांना शक म्हणत तर ग्रीक त्यांना सकाई म्हणून ओळखत. त्यांना आता आशियाई सिथियन हे नामाभिधान आहे. हे लोक सिथो-सार्माटियन कुळातील होते व वायव्य स्टेप प्रदेशांत भटक्या जमातींमधून राहत.[]

इसवी सनपूर्व पहिल्या शतकामध्ये आलेले शक, इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये आलेले कुषाण आणि पाचव्या शतकात आलेले हूण यांची हिंदुस्थानावर जी आक्रमणे झाली त्यांचा सगळ्या भारतावर, विशेषतः उत्तर भारतावर मोठा प्रभाव पडला. ज्यांच्या पुरुषांप्रमाणे स्त्रिया आणि लहान मुलेसुद्धा घोड्यावर स्वार होत असत अशा या रानटी टोळ्या संख्येने प्रचंड असून त्यांना दिवस रात्रीची तमा नसे. वाटेत येतील ती ती नगरे, ग्रामे उद्ध्वस्त करत, जाळपोळ करत संख्येने प्रचंड असलेल्या ह्या टोळधाडी शत्रूपक्षाचा पराभव झाल्यावर किंचाळत, आरडाओरडा करत, कवट्यांमधून रक्त पीत पीत ही मंडळी विजयोत्सव साजरे करीत.[ संदर्भ हवा ] त्यांना विजयापेक्षा विध्वंसाचीच आवड अधिक होती असे सावरकरांनी लिहून ठेवले आहे.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ West 2009, pp. 713–717
  2. ^ "Scythian". Encyclopædia Britannica Online. 2014-05-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 18, 2015 रोजी पाहिले.
  3. ^ P. Lurje, “Yārkand”, Encyclopædia Iranica, online edition
  4. ^ ग्रुसे, रेने. द एम्पायर ऑफ द स्टेप्स. pp. २९-३१.
  • सहा सोनेरी पाने (लेखक - वि.दा. सावरकर)