लाओस
लाओस (अधिकृत नाव: लाओ जनतेचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक) हा आग्नेय आशियातील देश आहे. या देशाच्या वायव्येस म्यानमार व चीन, पूर्वेस व्हियेतनाम, दक्षिणेस कंबोडिया, पश्चिमेस थायलंड हे देश आहेत. व्हियांतियान ही लाओसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उत्तर लाओस, मध्य लाओस आणि दक्षिण लाओस असे या देशाचे तीन प्रमुख विभाग आहेत.
लाओस ສາທາລະນະລັດ ປະຊາທິປະໄຕ ປະຊາຊົນລາວ लाओ जनतेचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "ສັນຕິພາບ ເອກະລາດ ປຊາທິປະໄຕ ເອກະພາບ ວັດທະນາຖາວອນ" शांतता, स्वातंत्र्य, लोकशाही, एकात्मता व समृद्धी | |||||
राष्ट्रगीत: फेंग शात लाओ | |||||
लाओसचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
विआंतिआन | ||||
अधिकृत भाषा | लाओ | ||||
सरकार | समाजवादी प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | ले.ज. चुम्माली सायासोन | ||||
- पंतप्रधान | बुआसोन बुफावान | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | जुलै १९, १९४९ (फ्रान्सपासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २,३६,८०० किमी२ (८३वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | २ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | ६३,२०,००० (१०१वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | २६.८/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १४.४४७ अब्ज अमेरिकन डॉलर (१२९वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २,२०० अमेरिकन डॉलर (१३८वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.६१९[१] (मध्यम) (१३३ वा) (२००७) | ||||
राष्ट्रीय चलन | लाओ किप (LAK) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी + ७:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | LA | ||||
आंतरजाल प्रत्यय | .la | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ८५६ | ||||
चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत लान शांग साम्राज्य होते. त्यानंतरच्या कालखंडात फ्रेंच वसाहतवादी साम्राज्य|फ्रेंचांनी वसाहत म्हणून राज्य केल्यानंतर१९४९ साली लाओसला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर दीर्घ काळ चाललेले यादवी युद्ध १९७५ साली पाथेट लाओ ही साम्यवादी आघाडी सत्तेत येताच संपुष्टात आले. मात्र विविध गटातटांच्या नेतृत्वात अंतर्गत धुसफूस त्यानंतरही चालू राहिली.
इ.स. १९९० च्या दशकात खासगीकरणाला चालना देण्याच्या शासकीय धोरणामुळे लाओसमध्ये आर्थिक सुधारणा घडून येत आहेत. तसे असले तरीही राज्यव्यवस्थेच्या व्याख्येनुसार लाओस समाजवादी प्रजासत्ताक आहे. राष्ट्राध्यक्ष ह शासनव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी असला तरीही पंतप्रधान हा प्रशासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. बौद्ध धर्म हा लाओस देशाचा प्रमुख धर्म असुन विविध अहवालानुसार देशातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण ६५% ते ९८% आहे.
इतिहास
संपादनप्राचीन काळय
संपादनलाओसचा इतिहास इ.स. १३५३च्या सुमारास फा न्गुम राजाच्या काळापासून ज्ञात आहे. फा न्गुम हा खौन बौलोमचा वंशज समजला जातो. याचे लान शांग साम्राज्य १८व्या शतकापर्यंत सत्तेवर होते. त्यानंतर लाओस थायलंडच्या आधिपत्याखाली आले.
फ्रेंच आधिपत्य
संपादन१९व्या शतकामध्ये लाओस ही एक फ्रेंच वसाहत बनली/तो फ्रेंच अधिपत्याखाली आला.१९४९साली लाओसला स्वातंत्र्य मिळाले.
अर्वाचीन लाओस
संपादनभूगोल
संपादनचतुःसीमा
संपादनया देशाच्या वायव्येला चीन व म्यानमार,पूर्वेला व्हिएतनाम,पश्चिमेला थायलंड,दक्षिणेकडे कंबोडिया आहे.
राजकीय विभाग
संपादनउत्तर लाओस,मध्य लाओस,दक्षिण लाओस हे लाओसचे प्रमुख तीन विभाग आहेत.
मोठी शहरे
संपादन- फोंगसाली
वस्तीविभागणी
संपादनधर्म
संपादनबौद्ध धर्म हा लाओस देशाचा राष्ट्रधर्म (राजधर्म) असुन देशाची तब्बल ९८% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. केवळ २% लोक हे अन्य धर्मीय आहे.
शिक्षण
संपादनसंस्कृती
संपादनराजकारण
संपादनधर्म
संपादनअर्थतंत्र
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Human Development Report 2009. Human development index trends: Table G" (PDF). 2009-10-05 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |