द हिंदू (इंग्लिश: The Hindu) हे एक भारतीय इंग्लिश भाषेतील अग्रगण्य दैनिक आहे. याच्यावर द हिंदू ग्रुपच्या मालकीचे हक्क आहेत. ज्याचे मुख्यालय तामिळनाडू शहरातील चेन्नई येथे आहे. हे १८७८ मध्ये सुरुवातीला साप्ताहिक म्हणून सुरू झाले आणि १८८९ मध्ये दैनिक बनले. हे सर्वाधिक खप असणारे भारतीय वृत्तपत्रांपैकी तसेच टाइम्स ऑफ इंडिया नंतर भारतातील दुसरे सर्वाधिक प्रसारित इंग्लिश भाषेतील वृत्तपत्र आहे. द हिंदू भारतातील ११ राज्यांमधील चेन्नई, कोइम्बतुर, बंगळूर, हैदराबाद, मदुरै, दिल्ली, विशाखापट्टणम, तिरुवअनंतपुरम, कोची, विजयवाडा, मंगळूर, आणि तिरुचिरापल्ली अशा २१ ठिकाणांहून प्रकाशित होतं.[]

द हिंदू
प्रकारदैनिक वृत्तपत्र

प्रकाशकद हिंदू ग्रुप
स्थापना१८७८
भाषाइंग्रजी
मुख्यालयचेन्नई


संदर्भ

संपादन
  1. ^ "The Hindu @ 140: 140 years and counting". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 28 November 2021. 5 December 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 December 2023 रोजी पाहिले.