अहमद शाह मसूद
अहमद शाह मसूद २ सप्टेंबर १९५३ - ९ सप्टेंबर, २००१) हा अफगाणिस्तानमधील एक लष्करी पुढारी होता. १९७९ - १९९२ दरम्यान झालेल्या अफगाण युद्धात त्याने सोव्हिएट सैन्याला पराभुत करण्यात मोठा वाटा उचलला. १९९२ मध्ये मसूदची अफगाणिस्तानचा संरक्षणमंत्री म्हणुन निवड करण्यात आली. त्यानंतर तालिबानने १९९५ सालापासुन अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर उत्तरी आघाडीचे प्रमुख नेतेपद त्याने सांभाळले. ९ सप्टेंबर २००१ रोजी त्याच्याविरुद्ध झालेल्या एका आत्मघातकी बॉंबहल्यात मसूद मृत्युमुखी पडला.
अहमद शाह मसूदच्या शौर्याबद्दल त्याला अफगाणिस्तानमध्ये शेर-ए-पंजशीर ह्या नावाने संबोधले जाते. भारत सरकारचे मसूद सोबत विशेष सलोख्याचे संबंध होते. राजधानी दिल्लीमध्ये त्याच्या सन्मानाप्रित्यर्थ एका रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |