सप्टेंबर ११
दिनांक
सप्टेंबर ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५४ वा किंवा लीप वर्षात २५५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनतेरावे शतक
संपादन- १२९७ - स्टर्लिंग ब्रिजची लढाई - विल्यम वॉलेसच्या स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव केला.
सोळावे शतक
संपादन- १५४१ - मिचिमालोंकोच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाश्यांनी सांटियागो, चिली उद्ध्वस्त केले.
सतरावे शतक
संपादन- १६०९ - हेन्री हडसन पहिल्यांदा मॅनहॅटनला पोचला.
अठरावे शतक
संपादन- १७७३ - बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय व्हिच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.
- १७७७ - अमेरिकन क्रांती-ब्रँडीवाइनची लढाई.
- १७९२ - होप हिरा चोरला गेला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८५७ - माउंटन मेडोझची कत्तल - मोर्मोन पंथील लोकांनी १२० पायोनियर्सची[मराठी शब्द सुचवा] कत्तल केली.
- १८९७ - मेनेलेक दुसऱ्याच्या सैन्याने काफ्फाच्या राजा गाकी शेरोचोला पकडले व त्याचे राज्य बळकावले.
विसावे शतक
संपादन- १९०६ - महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
- १९१९ - अमेरिकेने होन्डुरास वर चढाई केली.
- १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीने केलेल्या बॉम्बफेकीत बकिंगहॅम पॅलेसची पडझड.
- १९४१ - अमेरिकेने पेंटेगॉन बांधायला सुरुवात केली.
- १९४२ - सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने कॉर्सिका आणि कोसोव्हो बळकावले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने मिन्स्क आणि लिडामधील ज्यू राहत असलेले भाग रिकामे करवले.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रे पश्चिमेकडून जर्मनीत घुसली.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - ऑस्ट्रेलियाच्या सैन्याने बाटु लिंटांग येथील युद्धकैदी व इतर बंदी असलेला तुरुंग मुक्त केला. तेथील २,००० कैद्यांना १५ तारखेस ठार मारण्याची जपान्यांची योजना होती.
- १९६१ - वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडची स्थापना.
- १९६८ - एर फ्रांस फ्लाइट १६११ हे विमान फ्रांसच्या नीस शहराजवळ कोसळले.
- १९७३ - चिलीमध्ये जनरल ऑगुस्तो पिनोशेने सी.आय.ए.च्या मदतीने साल्वादोर आयेंदेचे सरकार उलथवले.
- १९७४ - ईस्टर्न एरलाइन्स फ्लाइट २१२ हे विमान शार्लट, उत्तर कॅरोलिना येथे कोसळले. ६९ ठार.
- १९८० - चिलीने नवीन संविधान अंगिकारले.
- १९९७ - नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोचले.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - अमेरिकेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
- २००७ - रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.
जन्म
संपादन- १८१६ - कार्ल झाइस, जर्मन संशोधक.
- १८६२ - ओ. हेन्री, इंग्लिश लेखक.
- १८८५ - डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक.
- १८९५ - आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते.
- १९०१ - कवी अनिल
- १९१७ - फर्डिनांड मार्कोस, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८२ - श्रिया शरण, तमिळ चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- १६८० - गो-मिझुनू, जपानी सम्राट.
- १८८८ - दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२१ - सुब्रमण्य भारती, तमिळ कवी.
- १९४८ - मुहम्मद अली जीना, पाकिस्तानचे संस्थापक.
- १९५० - यानी स्मट्स, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- १९७१ - निकिता ख्रुश्चेव, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७३ - साल्वादोर अयेंदे, चिलीचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७३ - नीम करोली बाबा, भारतीय गुरू.
- १९७८ - जॉर्जी मार्कोव्ह, बल्गेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८७ - महादेवी वर्मा, हिंदी कवयित्री.
- १९९३ - अभि भट्टाचार्य, चित्रपटसृष्टीतील अभिनेते
- १९९८ - एन. डी. नगरवाला, क्रीडा संघटक व शिक्षणमहर्षी.
- २००१ - सप्टेंबर ११ च्या दहशतवादी हल्ल्यांचे बळी.
- २००२ - जॉनी युनिटास, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- राष्ट्र दिन - कॅटेलोनिया.
- शिक्षक दिन - लॅटिन अमेरिका.
- राष्ट्रभक्त दिन - अमेरिका.
इतर
संपादन- ११ सप्टेंबर या नावाची निरंजन घाटे यांची कादंबरी आहे.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर ९ - सप्टेंबर १० - सप्टेंबर ११ - सप्टेंबर १२ - सप्टेंबर १३ - सप्टेंबर महिना