निरंजन घाटे (जन्म : १० जानेवारी, इ.स. १९४६) हे विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. ते पुण्यात राहतात. भूशास्त्रामध्ये एम.एस्‌सी.पर्यंत शिक्षण घेतलेल्या घाट्यांनी सुरुवातीला काही काळ प्राध्यापकी केली, नंतर ते आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून दाखल झाले. त्यावेळी त्यांनी आकाशवाणीवर विज्ञानाशी संबंधित असे ६०० कार्यक्रम सादर केले. दै. तरुण भारत, पुण्यनगरी, लोकमत, लोकसत्ता, मार्मिक, स.पुण्यनगरी यांसारख्या विविध वृत्तपत्र आणि साप्तहिकांतून त्यांनी देवेन कौशिक, सुखदेव साळुंखे, प्रद्युन यादव, बाळ मुळ्ये, जी.एन.सिन्हा, गुरनाम सिंग, बाळ गुर्लहोसूर या टोपण नावाने त्यांनी स्तंभलेखन सुद्धा केले आहे.

निरंजन घाटे
जन्म १० जानेवारी, १९४६ (1946-01-10) (वय: ७८)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र पुणे
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, विज्ञानकथा

संक्षिप्त परिचय

संपादन

घाटे, निरंजन सिंहेंद्र

उपनाम - देवेनकौशिक

     निरंजन घाटे यांचा जन्म मुंबई, गिरगाव येथे झाला. यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. पुणे विद्यापीठातून भूशास्त्रातील एम. एस्सी. ही पदवी त्यांनी संपादन केली. १९६८ ते १९७७ या काळात त्यांनी पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागात प्राध्यापकीदेखील केली. मात्र नंतर ते आकाशवाणीकडे वळले. १९७७ ते १९८३ या काळात यांनी आकाशवाणीच्या नागपूर, जळगाव, सांगली या केंद्रांवर अधिकारी म्हणून काम केले. या काळात आकाशवाणीवर रूपके, एकांकिका, संवाद, भाषणे अशा विविध स्वरूपांचे सुमारे ६०० कार्यक्रम त्यांनी सादर केले. त्यांपैकी अनेक कार्यक्रम विज्ञानाशी संबंधित होते. १९८१ ते १९९३ या काळात पुण्यातील महात्मा फुले वस्तू संग्रहालयात आधी उपसंचालक व नंतर संचालक म्हणून ते कार्यरत होते. या नंतरच्या काळात मात्र त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ लेखनाला वाहून घेतले. घाटे यांनी विज्ञानप्रसाराचा वसा आपल्या कार्यक्षेत्रात व लिखाणात जपलेला आहे.

     घाटे हे विज्ञान लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. शास्त्रीय ग्रंथ, शास्त्रीय नियतकालिके आणि पाठ्यपुस्तके ह्यांमधील विज्ञानाच्या विविध शाखांमधील ज्ञान बाहेर काढून साध्या सोप्या भाषेतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी आपल्या विपुल लेखनाद्वारे केले आहे. वैज्ञानिक सत्य आणि कल्पनाशक्ती यांचा मेळ घालून त्यांनी जशा विज्ञान कथा लिहिल्या आहेत, तसेच विज्ञानाचे अंतरंग उलगडणारे अनेक लेख पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी एकूण १५० पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी १३० पुस्तके विज्ञानविषयक आहेत.

     घाटे यांच्या वाङ्मयीन लेखनाची सुरुवात सामाजिक आशयाच्या कथांपासून झाली, तरी लवकरच ते विज्ञान कथांकडे वळले. १९६५पासून विविध विषयांवर वर्तमानपत्रांमधून व नियतकालिकांमधून स्फुट लेखनास त्यांनी सुरुवात केली. १९७१, १९७२  व १९७४ अशी तीन वर्षे त्यांच्या विज्ञान कथांना मराठी विज्ञान परिषदेचे पुरस्कार लाभले. त्यांच्या १० विज्ञान कादंबऱ्या व १७ विज्ञान कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘पॉप्युलर सायन्स’ वर त्यांनी ७८ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ‘वसुंधरा’ या पुस्तकाला १९७८-१९७९ या वर्षाचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय ‘स्पेस जॅक’ (१९८५-१९८६), ‘एकविसावे शतक’ (१९९७-१९९८) या त्यांच्या विज्ञानविषयक पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले. घाटे यांनी विज्ञान कथांबरोबरच युद्धकथा, गुप्तहेर कथा, साहस कथा लिहिल्या आहेत. युद्धशास्त्र व युद्धकथांवर त्यांची १२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय त्यांनी बालवाङ्मयही विपुल प्रमाणात लिहिले आहे. बालवाङ्मयातील त्यांच्या विविध पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी विनोदी साहित्यही लिहिले आहे.

     घाटे यांची संपादक म्हणूनही कारकीर्द घडली आहे. १९८३ ते १९९४ या काळात सृष्टिज्ञान, बुवा, पैंजण, अद्भुत, कादंबरी, ज्ञानविकास, किर्लोस्कर या नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले. नव्या लेखकांचा शोध घेऊन त्यांनी त्यांना लिहिते केले. विज्ञान लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने त्यांनी विज्ञान लेखकांचे मेळावे, वासंतिक शास्त्रीय व्याख्यानमाला, शारदीय शास्त्रीय व्याख्यानमाला, शालेय मुलांसाठी विज्ञानवर्ग असे अनेकविध उपक्रम राबवले. घाटे यांचा वाचनाचा व्यासंग दांडगा आहे. त्यांचा ग्रंथसंग्रह मोठा आहे. मोठ्या मेहनतीने आणि चोखंदळपणाने त्यांनी विविध विषयांवरती इंग्रजी, मराठी पुस्तके संग्रहित केली आहेत. ‘जे जे आपणासि ठावे। ते इतरांसि सांगावे। शहाणे करूनि सोडावे। सकल जन॥’ या वृत्तीने त्यांनी वाङ्मयीन कार्य केले आहे. त्यांना ११ मे २०२२ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला.

प्रकाशित साहित्य (१८५हून अधिक पुस्तके)

संपादन
  • ११ सप्टेंबर
  • अग्निबाणांचा इतिहास
  • अंटार्टिका
  • अणूच्या वेगळ्या वाटा
  • अद्‌भुत किमया
  • अमेरिकन गुन्हेगारी
  • अमेरिकन चित्रपटसृष्टी
  • अवकाश मोहीमा आणि अपघात
  • अवकाशाचे आव्हान
  • अवकाशातील पाहुणे : उल्का आणि धूमकेतू
  • अवतीभवती
  • अशी ही औषधे
  • असे घडले सहस्रक (सहलेखक - डॉ. प्रमोद जोगळेकर)
  • असे शास्त्रज्ञ, अशा गमती
  • असे शास्त्रज्ञ, असे संशोधन
  • आई असंच का ? बाबा तसंच का ?
  • आकाशगंगा
  • आक्रमण
  • आदिवासींचे अनोखे विश्व
  • आधुनिक युद्धकाैशल्य
  • आधुनिक युद्धसाधने
  • ऑपरेशन नर्व्ह गॅस
  • आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान
  • आपल्या पूर्वजांचे विज्ञान
  • आभाळातून पडलेला माणूस
  • आरोग्य
  • आरोग्यगाथा
  • आल्फ्रेड रसेल वॅलेस (चरित्र)
  • आश्चर्यकारक प्राणीसृष्टी
  • इलेक्ट्रॉनिक्स
  • उत्क्रांतीची नवलकथा
  • ऊर्जावेध
  • औटघटकेचा दादा
  • कथा अणुस्फोटांची
  • करड्या छटा
  • कळसूत्री
  • कालयंत्राची करामत
  • कालयात्रा
  • कोणे एके काळी
  • क्रीडाविज्ञान
  • खगोलीय गमती जमती
  • गमतीदार विज्ञान
  • गमतीदार संगणक
  • गुन्हेगारांचं जग
  • गुन्हेगारीच्या जगात
  • घर हीच प्रयोगशाळा
  • जगाची मुशाफिरी
  • जगावेगळ्या व्यक्ती
  • जगप्रसिद्ध विज्ञानकथा
  • जल झुंजार
  • जिज्ञासापूर्ती
  • जीवनचक्र
  • ज्याचं करावं भलं...
  • झू
  • झोपाळू ससा
  • तरुणांनो होशियार !
  • 'ती'ची कहाणी
  • द किलर लेडीज
  • दॅट क्रेझी इंडियन
  • द डांग्ज : एक अनोखा प्रवास (अनुवादित; मूळ लेखक - रणधीर खरे)
  • दिवास्वप्न (अनुवादित, मूळ गुजराती लेखक - गिजुभाई बधेका)
  • दीपशिखा : पर्यावरणातील स्त्रिया
  • दुसऱ्या महायुद्धातील शाैर्यकथा
  • नॅनो
  • नवे शतक
  • निवडक मराठी विज्ञानकथा
  • पाण्याखालचे युद्ध
  • प्रदूषण
  • परपे (?)
  • पर्यावरण
  • पर्यावरण आणि आरोग्य
  • पर्यावरण-गाथा
  • पर्यावरण प्रदूषण (सहलेखक - डॉ. रवींद्र भावसार)
  • प्रतिरूप
  • प्राणिजीवन गाथा
  • प्राण्यांची दुनिया
  • प्राण्यांचे जग
  • प्रेम, स्पर्श आणि आकर्षण
  • प्रोटोकॉल
  • फार फार वर्षांपूर्वी
  • फिनिक्स
  • बिलंदर टोपी बहाद्दर
  • भविष्यवेध
  • मन : मनोविकारांची रंजक आणि शास्त्रीय माहिती
  • मन्वंतर
  • मराठीतील निवडक विज्ञानकथा
  • मानव आणि पर्यावरण (सहलेखिका - डॉ. सविता घाटे)
  • मानवाच्या शोधाची कहाणी
  • मुलांचे विश्व
  • मृत्यूदूत
  • यंत्रमानव
  • यंत्रमानव व कृत्रिम बुद्धिमत्ता
  • यंत्रमानवाची साक्ष
  • यंत्रलेखक
  • युगंधर
  • युद्धकथा
  • रणझुजार
  • रहस्यरंजन
  • रामचे आगमन
  • रोबॉट फिक्सिंग
  • लोकप्रिय साहित्यिक
  • वसुंधरा
  • वाचत सुटलो त्याची गोष्ट (समकालीन प्रकाशन)
  • विचित्र माणसं विक्षिप्त शास्त्रज्ञ
  • विचित्र माणसांचे विश्व
  • विदेशी विज्ञान चित्रपट
  • विषकन्या
  • विसाव्या शतकातील विज्ञानमहर्षी
  • विज्ञान आणि आपण
  • विज्ञान नवलाई
  • विज्ञान परिक्रमा
  • विज्ञानमंजुषा
  • विज्ञान, मराठी आणि विज्ञान वाङ्मय
  • विज्ञानमेवा
  • विज्ञानवारी
  • विज्ञानवेध भाग १ ते ४
  • विज्ञान संदर्भ
  • विज्ञानसाहित्य आणि संकल्पना (सहलेखक - डॉ. व.दि. कुलकर्णी)
  • विज्ञानसाहित्यविश्व
  • विज्ञानाचे शतक
  • विज्ञानाने जग बदलले
  • वेध पर्यावरणाचा
  • वाचीत सुटलो त्याची गोष्ट : एका लेखकाच्या ग्रंथप्रेमाची सफर
  • वेध संशोधनाचा
  • वैज्ञानिक साहसकथा भाग १, २
  • शास्त्रज्ञाचा मुलगा
  • शास्त्रज्ञांचे जग
  • शोधवेडे शास्त्रज्ञ
  • संक्रमण
  • सफर हॉलिवूडची
  • संभव असंभव
  • सहस्र सूर्यांच्या छायेत
  • सुपर कॉम्प्युटर
  • सुपरमॅन
  • सेक्सायन
  • स्पेसजॅक
  • स्वप्नचौर्य
  • स्वप्नरंजन
  • स्वयंवेध
  • हटके भटके (समकालीन प्रकाशन)
  • हायजॅक
  • हेरांच्या जगात
  • ज्ञानज्योती
  • ज्ञानतपस्वी
  • ज्ञानदीप,

पुरस्कार

संपादन

1) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कार : वसुधरा , प्रौढ विभाग-भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान 1979-80.

2) मराठी विज्ञान परिषद, मुंबईतर्फे उत्कृष्ट विज्ञानप्रसारक मानपत्र आणि सन्मान नागपूर.

3) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कार स्पेसर्जक, प्रौढ वाङमय-ललित लेखन 1985-86.

4) पुणे मराठी ग्रंथालय कै. अनंत सुर्वे स्मृती प्रित्यर्थ स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारः आधुनिक युध्यसाधने 1992

5)रदआबेकर ग्रंथालय सेलु, विज्ञान साहित्य पुरस्कार : अंटाक्टिक 1993.

6) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कारः एकविसावे शतक भौतिकशास्त्र व तंत्रज्ञान 1997-98.

7) इंडियन फिजिक्स असोसिएशन पुणे विभागः विज्ञान प्रसारासाठी डॉ. मो. वा. चिपळोणकर पुरस्कार, 1997.

8) सार्वजनिक वाचनालय नाशिकः डॉ. वि.म. गोगटे पुरस्कार आत्मवेध 1999.

8) केसरी-मराठा संस्था, पुणेतर्फे कै. डॉ. वारदेकर 'विज्ञाननिष्ठ प्रबोधन' पारितोषिक, 2001.

10) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कारः डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार : विज्ञानाने जग बदलले भौतिकशास्त्र व तंत्रज्ञान 2001-02.

11) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कारः यदुनाथ थत्ते पुरस्कार : जगाची मुशाफिरी सर्वसामान्य ज्ञान-बाल (छंद व शास्त्र) 2001-02.

12) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे: विज्ञान साहित्यासाठी गो. रा. परांजपे सन्मानपत्र, 2002.

13) ए.ई.आर.एफ पुणेतर्फे जगदीश गोडबोले स्मृती पर्यावरण लेखन पुरस्कार, 2002.

14) मराठी बाल-कुमार साहित्य सभा , कोल्हापूर: उत्कृष्ट बाल-कुमार वा मय निर्मिती पुरस्कार : अद्भुतकिमया, 2002.

15) अखिल भारतीय बालकुमार साहित्य सम्मेलन संस्था पुणे (महाराष्ट्र) उत्कृष्ट बाल-कुमार वाङमय निर्मिती पुरस्कार : निसर्ग यात्रा 2002

16) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कारः सी. डी. देशमुख पुरस्कार : नवे शतक भौतिकशास्त्र व तंत्रज्ञान 2004-05

17) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कारः रेव्हरंड टिळक पुरस्कारः विचित्र माणसाचे विश्व 2005-2006

18) मराठी विभाग, पुणे विद्यापीठातर्फे मानपत्र, 2009.

19) गुरुवर्य मा. सी. पेंढारकर ग्रंथ-पुरस्कार , लोकसेवा संध पारले: आपल्या पूर्वजांचे विज्ञान , 2008-09

20) बडोदा वाङ्मय परिषद, विनोदी साहित्य पुरस्कार : ज्याचे करावे भले , 2011

२१) महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड , सु. ल. गद्रे साहित्यिक पुरस्कार, 2014.

22) महाराष्ट्र साहित्य पुणेः उत्कृष्ट वाडमय निर्मिती: विजया गाडगीळ पारितोषिक. वाचत सुटलो त्याची गोष्ट, २०१८.

२३) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे: वार्षिक ग्रंथ पुरस्कार, उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती, वाचत सुटलो त्याची गोष्ट, 2018

2४) जवाहर वाचनालय, कळवे: कै. गोपीनाथ पाटील स्मृती वाडमय पुरस्कार: वाचत सुटलो त्याची गोष्ट, 2019.

2५) अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ: साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार, 2019

बाह्य दुवे

संपादन


  1. ^ "Aksharnama.com". www.aksharnama.com. 2020-04-05 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)