मिन्स्क
(मिन्स्क या पानावरून पुनर्निर्देशित)
मिन्स्क (बेलारूशियन: Мінск, Менск, रशियन: Минск, यिडिश/हिब्रू: Minsk ,מינסק) पूर्व युरोपातील बेलारूस देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलारूसच्या मध्य भागात वसलेले मिन्स्क शहर राष्ट्रीय राजधानीसोबत मिन्स्क प्रदेशाची देखील प्रशासकीय राजधानी आहे. इ.स. १५८९ पासून मिन्स्क पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाच्या तर इ.स. १७९३ पासून रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते. इ.स. १९१९ ते १९९१ दरम्यान मिन्स्क सोव्हिएत संघामधील बेलारूशियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची राअज्धानी होती.
मिन्स्क Мінск |
|||
बेलारूसमधील शहर | |||
| |||
देश | बेलारूस | ||
स्थापना वर्ष | इ.स. १०६७ | ||
क्षेत्रफळ | ३०५.५ चौ. किमी (११८.० चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ९२० फूट (२८० मी) | ||
लोकसंख्या (२०१४) | |||
- शहर | १९,२१,८०७ | ||
- घनता | ५,९६६ /चौ. किमी (१५,४५० /चौ. मैल) | ||
- महानगर | २१,०१,०१८ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:०० | ||
http://www.minsk.gov.by |
सध्या मिन्स्क हे एक प्रगत शहर असून स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ हा बेलारूसमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-04-01 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |