परवेझ मुशर्रफ (उर्दू: پرویز مشرف; ११ ऑगस्ट १९४३) हा एक निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी (जनरल), पाकिस्तानचा माजी लष्करप्रमुख व राष्ट्राध्यक्ष आहे.

परवेझ मुशर्रफ
Pervez Musharraf 2004.jpg

पाकिस्तान ध्वज पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२० जून २००१ – १८ ऑगस्ट २००८
मागील मुहम्मद रफीक तातर
पुढील आसिफ अली झरदारी

पाकिस्तानचा राष्ट्रप्रमुख
कार्यकाळ
१२ ऑक्टोबर १९९९ – २८ नोव्हेंबर २००७
मागील नवाझ शरीफ (पंतप्रधान)
पुढील झफरुल्ला खान जमाली (पंतप्रधान)

पाकिस्तानचा लष्करप्रमुख
कार्यकाळ
६ ऑक्टोबर १९९८ – २१ नोव्हेंबर २००२
मागील जहांगिर करामत
पुढील अश्फाक परवेझ कयानी

जन्म ११ ऑगस्ट, १९४३ (1943-08-11) (वय: ७९)
दिल्ली, ब्रिटिश भारत (आजचा भारत)
धर्म इस्लाम

१९९९ साली पाकिस्तानचा लष्करप्रमुख असताना मुशर्रफच्या सैन्याला कारगील युद्धामध्ये भारताकडून पराभूत व्हावे लागले. ह्यावरून मुशर्रफ व तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ ह्यांच्या दरम्यान पराकोटीचे मतभेद निर्माण झाले होते. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी नवाझ शरीफने मुशर्रफला लष्करप्रमुख पदावरून काढल्याचे वृत्त कळताच मुशर्रफने नवाझ शरीफ विरुद्ध लष्करी बंड पुकारले व देशाची सत्ता हातात घेतली. १५ ऑक्टोबर १९९९ रोजी मुशर्रफने पाकिस्तानचे संविधान निलंबित केले, देशामध्ये आणीबाणी जाहीर केली व स्वतःला पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखपदावर नियुक्त केले. त्याने नवाझ शरीफला अटकेत टाकून नंतर देश सोडण्यास भाग पाडले.

२००१ साली घेण्यात आलेल्या एका बनावटी जनमतामध्ये विजय मिळवून मुशर्रफ अधिकृतपणे पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनला. २००७ सालापर्यंत पाकिस्तानमधील जनतेचे मत त्याच्याबद्दल प्रतिकूल बनले होते. डिसेंबर २००७ मध्ये बेनझीर भुट्टोची हत्या झाल्यानंतर अखेर १८ ऑगस्ट २००८ रोजी मुशर्रफने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला व लंडनकडे पळ काढला. पुढील ४ वर्षे लंडनमध्ये राहिल्यानंतर २४ मार्च २०१३ रोजी तो पाकिस्तानात परतला. तालिबान ह्या अतिरेकी संघटनेने मुशर्रला ठार मारण्याची धमकी दिली होती. पाकिस्तानात परतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला अटक करून त्याच्यावर देशद्रोह, खून इत्यादी आरोपांवरून खटला भरला.

बाह्य दुवेसंपादन करा