आसिफ अली झरदारी
आसिफ अली झरदारी (उर्दू: آصف علی زرداری; सिंधी: آصف علي زرداري; २६ जुलै १९५५) हा एक पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तानचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००८ ते २०१३ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला झरदारी हा लोकशाही मार्गाने निवडुन आलेला व ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा पाकिस्तानचा पहिलाच राष्ट्राध्यक्ष आहे.
आसिफ अली झरदारी | |
पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ ९ सप्टेंबर २००८ – ८ सप्टेंबर २०१३ | |
मागील | परवेझ मुशर्रफ |
---|---|
पुढील | ममनून हुसेन |
पाकिस्तान पीपल्स पार्टीचा सह-अध्यक्ष
| |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २००७ | |
मागील | बेनझीर भुट्टो |
जन्म | २६ जुलै, १९५५ कराची, पाकिस्तान |
पत्नी | बेनझीर भुट्टो (१९८७-२००७) |
अपत्ये | बिलावल भुट्टो झरदारी |
धर्म | इस्लाम |
पाकिस्तानची दिवंगत पंतप्रधान व लोकप्रिय पुढारी बेनझीर भुट्टोचा पती असलेला झरदारी भुट्टोच्या मंत्रीमंडळामध्ये अनेक खात्यांवर होता. १९९६ साली झरदारीला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिक्षा झाली. २००४ साली तुरूंगातून सुटल्यानंतर झरदारीने पुढील अनेक वर्षे दुबईमध्ये व्यतीत केली. डिसेंबर २००७ मधील बेनझीर भुट्टोच्या हत्येनंतर झरदारी पकिस्तानात परतला व त्याने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेतृत्व हाती घेतले. सप्टेंबर २००८ मध्ये तो निवडणुकीमध्ये विजय मिळवून पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनला. आपल्या कार्यकाळादरम्यान झरदारीने अफगाणिस्तानात चालू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेसोबत सहकार्य केले तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानसाठी कोट्यावधी डॉलर्सचे कर्ज मिळवले.