नीला घाणेकर

एक शास्त्रीय संगीत गायिका

नीला पुरुषोत्तम घाणेकर (मृत्यू : २५ मे २००१) या एक शास्त्रीय संगीत गायिका होत्या. हिंदी चित्रपट पार्श्वगायिका साधना सरगम यांच्या त्या आई होत.

घाणेकर ह्या मुंबईच्या गोरेगाव उपनगरात संगीताचे वर्ग घेत. त्यांची संगीतकार अनिल मोहिलेंसोबत ओळख होती. त्यावेळी मोहिले हे संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी म्युझिक अरेंजिंगचे काम बघायचे. मोहिलेंनी साधना सरगम यांची कल्याणजी-आनंदजींसोबत भेट घालून दिली होती. त्यानंतर साधना सरगम हिंदी चित्रपटांच्या पार्श्वगायिका बनल्या.