सुप्रिया पिळगांवकर

मराठी चित्रपट अभिनेत्री

सुप्रिया पिळगांवकर (१७ ऑगस्ट, इ.स. १९६७ - हयात), अनेकदा फक्त सुप्रिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, या भारतीय अभिनेत्री आहेत. त्यांचे लग्न अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याशी झाले.

सुप्रिया पिळगांवकर
जन्म सुप्रिया पिळगांवकर
(पूर्वाश्रमी सुप्रिया सबनीस)

१७ ऑगस्ट, इ.स. १९६७
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी, नाट्य)
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला
अशी ही बनवाबनवी
पती
अपत्ये श्रीया पिळगांवकर

सुप्रिया यांना स्टार प्लस वरील "तू तू - मैं मैं" या कार्यक्रमातील सुनेच्या भूमिकेसाठी विशेष प्रसिद्धी मिळाली. सुप्रिया आणि सचिन यांनी नच बलिये कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद मिळवले होते.

मराठी चित्रपटांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. पती सचिन पिळगावकर यांच्यासोबत त्यांनी अभिनय केलेल्या नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा चित्रपटांना मोठे यश मिळाले.[१]

खाजगी आयुष्य संपादन

 
पती सचिन पिळगावकरसोबत (२०१२)

पिळगावकर यांचा जन्म 16 ऑगस्ट 1967 रोजी मुंबई येथे एका मराठी कुटुंबात सुप्रिया सबनीस म्हणून झाला. नवरी मिळे नवऱ्याला या मराठी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी त्यांची भेट पती सचिन पिळगावकर यांच्याशी झाली. 1985 मध्ये त्यांचे लग्न झाले, जेव्हा त्या 18 वर्षांची होत्या. त्यांना श्रिया पिळगावकर ही मुलगी आहे.

कारकीर्द संपादन

चित्रपट संपादन

हिंदी कार्यक्रम संपादन

 • तू तू-मैं मैं
 • नच बलिये (पर्व -१)

पुरस्कार संपादन

 • 2002: इंडियन टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड्स- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री- तू तू मैं मैं जीती
 • 2010: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ससुराल गेंदा फूल
 • 2010: इंडियन टेली अवॉर्ड्स सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
 • 2016: सुवर्ण पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री कुछ रंग प्यार के ऐसे भी - नामांकन
 • 2017: लायन्स गोल्ड अवॉर्ड्स सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री जिंकले इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार- नामांकन
 • 2018: सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- वेब मालिका
 • 2019 iReel पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नाटक)

बाह्य दुवे संपादन

 • "मराठी तारका संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2007-12-07. 2006-11-06 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
 • Supriya Pilgaonkar Biography Archived 2011-03-03 at the Wayback Machine.

संदर्भ आणि नोंदी संपादन

 1. ^ "Staying in step". www.telegraphindia.com. 2022-01-30 रोजी पाहिले.