देवमाणूस ही झी मराठी वाहिनीवरून प्रसारित झालेली सत्यघटनेवर आधारित एक गूढ व थरारक मालिका आहे.

देवमाणूस
दिग्दर्शक राजू सावंत
निर्माता श्वेता शिंदे, संजय खांबे
निर्मिती संस्था वज्र प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३०१
निर्मिती माहिती
स्थळ सातारा, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ३१ ऑगस्ट २०२० – १५ ऑगस्ट २०२१
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम देवमाणूस २

एका खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात आणि त्याचा आदर करतात. तथापि, त्यांच्या नकळत तो स्वतःचा फायदा साधतो आणि गावातल्या लोकांच्या जीवास धोका निर्माण करतो.

कलाकार

संपादन
 • किरण गायकवाड - डॉ. अजितकुमार चंद्रकांत देव (देवीसिंग)
 • अस्मिता देशमुख - सागरिका बाबू पाटील (डिंपल)
 • दीपाली जाधव - रुपाली
 • ऐश्वर्या नागेश - अपर्णा
 • गायत्री बनसोडे - रेश्मा विजय शिंदे
 • एकनाथ गीते - विजय शिंदे
 • किरण डांगे - बजरंग पाटील (बज्या)
 • रविना गोगावले - रविना बजरंग पाटील
 • निलेश गवारे - नामदेव जाधव (नाम्या)
 • वीरल माने - शुभंकर बाबू पाटील (टोण्या)
 • अंजली जोगळेकर - मंगल बाबू पाटील
 • अंकुश मांडेकर - बाबू पाटील
 • रुक्मिणी सुतार - सरु पाटील
 • पुष्पा चौधरी - वंदी
 • शशी डोईफोडे - लाला
 • कबीर गायकवाड - क्रिश
 • ऋतुजा पवार - राणी
 • कुलभूषण पालकर - महेश
 • प्रतीक्षा जाधव - मंजुळा अमर संकपाळ (मंजू)
 • सागर कोराडे - संजय (संजू)
 • सचिन हगवणे-पाटील - सुरेश पाटील
 • वंश शहा - विठ्ठल
 • नेहा खान - दिव्या सिंग
 • मिमिचार्वी खडसे - मायरा सिंग
 • अर्जुन कुसुंबे - रणजित चव्हाण
 • अजिंक्य दाते - अमित शिंदे
 • सत्यवान शिखरे - विराज शिखरे
 • वर्धन देशपांडे - अमर संकपाळ
 • सोनाली पाटील - आर्या देशमुख
 • संजना काळे - रिंकू
 • माधुरी पवार - चंदा
 • राजरत्न वाघमारे - न्यायाधीश
 • सुरेंद्र साठे - रुपालीचे बाबा

विशेष भाग

संपादन
 1. देवाच्या रूपात जेव्हा राक्षस थैमान घालतो, सत्यघटनांवरून प्रेरित. (३१ ऑगस्ट २०२०)
 2. देवीसिंग ऊर्फ डॉ. अजितकुमार देव ते देवमाणूस, गावातल्या लोकांसाठी अजित ठरणार देवमाणूस. (२ सप्टेंबर २०२०)
 3. अजितसाठी मुंबईहून येणार खास सरप्राइज. (४ सप्टेंबर २०२०)
 4. रुपालीच्या गावात येण्याने वाढली अजितची चिंता. (७ सप्टेंबर २०२०)
 5. कट्ट्याखाली दडलंय काय, विठ्ठलला कळलंय का अजितचं गुपित? (९ सप्टेंबर २०२०)
 6. आई-मुलीच्या भाबडेपणाचा अजित घेणार गैरफायदा. (९ नोव्हेंबर २०२०)
 7. अजितच्या फसवेगिरीला बळी पडल्याने अपर्णा देणार स्वतःलाच कायमची शिक्षा. (११ नोव्हेंबर २०२०)
 8. दिवाळसणाला गावात येणार नवी पाहुणी. (१३ नोव्हेंबर २०२०)
 9. मंजुळाच्या मोहात पडलेल्या अजितला बसणार पहिला झटका. (१६ नोव्हेंबर २०२०)
 10. मंजूने दुर्लक्ष केल्याने दुखावणार अजितचा अहंकार. (१८ नोव्हेंबर २०२०)
 11. अजितने विणलेल्या जाळ्यात अडकणार का मंजुळा? (१ डिसेंबर २०२०)
 12. मंजुळाच्या कानउघाडणीमुळे अजित उचलणार का टोकाचं पाऊल? (७ डिसेंबर २०२०)
 13. अजितमुळे मंजुळाला चढावी लागणार पोलीस स्टेशनची पायरी. (१० डिसेंबर २०२०)
 14. अजितमधला क्रूरपणा संपून समोर येणार देवमाणूस. (१४ डिसेंबर २०२०)
 15. अजित आणि मंजूमध्ये हळूहळू मैत्रीची सुरुवात. (१७ डिसेंबर २०२०)
 16. पोलिसांच्या संशयाची सुई अजितच्या दिशेला वळणार का? (१९ डिसेंबर २०२०)
 17. अजित मंजूच्या नवऱ्याची मदत करणार की त्याचा काटा काढणार? (२ जानेवारी २०२१)
 18. अजित मंजूभोवती विणतोय सहानुभूतीचं जाळं. (६ जानेवारी २०२१)
 19. अजितच्या मनसुब्यांचा मंजूच्या नवऱ्याला सुगावा लागणार का? (९ जानेवारी २०२१)
 20. सरु आजी अजितला रंगेहाथ पकडणार का? (१२ जानेवारी २०२१)
 21. सरु आजीच्या नजरेतून काहीच सुटत नाही, अजितची कारस्थानंसुद्धा... (१४ जानेवारी २०२१)
 22. गावाला गप्प करणाऱ्या सरु आजीचा आवाज अजित कायमसाठी बंद करणार का? (१७ जानेवारी २०२१)
 23. डिंपलच्या वाड्यावर अजितमुळे शोककळा येणार का? (१९ जानेवारी २०२१)
 24. मंजूचं मन जिंकण्यात अजितला यश येणार का? (२१ जानेवारी २०२१)
 25. महाबळेश्वर ट्रिपमध्ये अजित जिंकणार का डिंपलसोबत लावलेली पैज? (२३ जानेवारी २०२१)
 26. अजितच्या प्रेमाच्या जाळ्यात मंजू अडकणार का? (२७ जानेवारी २०२१)
 27. नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी मंजूला अजितच्या मदतीचा आधार घ्यावा लागणार. (३० जानेवारी २०२१)
 28. मंजूच्या प्रेमात वेडा झालेला अजित उचलणार टोकाचं पाऊल. (३ फेब्रुवारी २०२१)
 29. मंजूच्या घातपातामागे सरु आजी पोलिसांसमोर घेणार अजितवर संशय. (५ फेब्रुवारी २०२१)
 30. अजितच्या दिशेने येतंय एक झंझावाती वादळ. (८ फेब्रुवारी २०२१)
 31. रफ अँड टफ दिव्याच्या येण्याने बदलणार का अजितचं आयुष्य? (१० फेब्रुवारी २०२१)
 32. दिव्याला पाहून अजितचं हरपलं भान. (१३ फेब्रुवारी २०२१)
 33. इन्स्पेक्टरसमोर येणार डॉ. अजितकुमार देवचा खरा चेहरा. (२१ मार्च २०२१)
 34. सरु आजीच्या वाड्यात साजरी होणार होळी, नटूनथटून तयार झाली दिव्या, डिंपल आणि टोण्याची टोळी. (३० मार्च २०२१)
 35. दिव्याच्या हाती लागलेला पुरावा मिळवण्यासाठी अजित करणार वेषांतर. (१३ एप्रिल २०२१)
 36. आपण लग्न करायचं तर देवीसिंगची केस सोड, अजित दिव्यासमोर लग्नासाठी ठेवणार अट. (१५ एप्रिल २०२१)
 37. दिव्यावर दबाव आणण्यासाठी अजित करणार मायराचं अपहरण. (१७ एप्रिल २०२१)
 38. कर्तव्य की ममता, कशाची निवड करणार दिव्या? (२० एप्रिल २०२१)
 39. दिव्याने तपासाचा वेग वाढवल्याने बिथरलेला अजित रचणार कोणता नवा खेळ? (२३ एप्रिल २०२१)
 40. गावकऱ्यांच्या उपस्थितीत अजित देणार डिंपलशी लग्नाला होकार. (२७ एप्रिल २०२१)
 41. देवीसिंग केसमधला प्रत्यक्षदर्शी दिव्याच्या हाती लागल्याने उडणार अजितची झोप. (३० एप्रिल २०२१)
 42. अजित रुपाली प्रकरणातल्या साक्षीदारासमोर येणार का? (५ मे २०२१)
 43. देवीसिंग केसमधला प्रत्यक्षदर्शी पोलीस स्टेशनमध्येच घेणार अखेरचा श्वास. (८ मे २०२१)
 44. अजितच्या नियतीचं चक्र आता उलट फिरु लागणार, दिव्याच्या हाती अजितच्या गुन्ह्यांचे धागेदोरे येऊ लागणार. (१२ मे २०२१)
 45. दिव्याच्या हाती लागणार रेश्माच्या केसमधली महत्त्वाची माहिती. (१५ मे २०२१)
 46. अखेर अजितच्या गळ्याचा फास आवळण्याच्या दिशेने एक पाऊल पडणार. (१८ मे २०२१)
 47. रेश्माच्या घरात पोलिसांना सापडणार अजितच्या हातांचे ठसे. (२० मे २०२१)
 48. तपासाच्या फेऱ्यात दिव्याला मिळू लागणार अजितविरोधात सबळ पुरावे. (२२ मे २०२१)
 49. अखेर देवमाणसाच्या ढोंगाचा पर्दाफाश होणार, देवीसिंग ऊर्फ डॉ. अजितकुमारच्या अटकेचं काऊंटडाऊन सुरू. (२५ मे २०२१)
 50. अखेर देवीसिंगच्या पापाचा घडा भरला. (२७ मे २०२१)
 51. भरलाय देवीसिंगच्या पापाचा घडा, डॉ. अजितकुमार देवच्या आजवरच्या गुन्ह्यांची मालिका. (३० मे २०२१)
 52. नराधम अजितची दिव्या काढणार गावभर धिंड, निष्पापांचे बळी घेणारा अजित होणार गजाआड. (३१ मे २०२१)
 53. अटकेनंतर अजितच्या डोक्यात सुरू झाली नव्या खेळीची समीकरणं. (३ जून २०२१)
 54. डॉ. अजितकुमार देव ऊर्फ देवीसिंग खटल्याच्या कोर्टाची पहिली तारीख. (५ जून २०२१)
 55. साक्षी पुराव्यांच्या कचाट्यात अजित पुरता अडकणार. (९ जुलै २०२१)
 56. अजितचा डाव त्याच्यावरच उलटणार की एक गोळी कायमचा आराम? (१६ जुलै २०२१)
 57. एका देवमाणसाचा अंत? (१५ ऑगस्ट २०२१)

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा १३ २०२१ ३.९
आठवडा १६ २०२१ ३.६
आठवडा १८ २०२१ ३.९
आठवडा २२ २०२१ ५.३ [१]

अनुवादित

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी हैवान अँड टीव्ही (एक तास) २४ सप्टेंबर २०२२ - १६ एप्रिल २०२३

संदर्भ

संपादन
 1. ^ "टीआरपीच्या स्पर्धेत 'देवमाणूस' चौथ्या स्थानावर; 'ही' मालिका ठरली अव्वल". महाराष्ट्र टाइम्स. 2021-06-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
रात्री १०.३०च्या मालिका
शुभं करोति | गुंतता हृदय हे | आभास हा | दिल दोस्ती दुनियादारी | रात्रीस खेळ चाले | १०० डेझ | दिल दोस्ती दोबारा | जागो मोहन प्यारे | ग्रहण | नाममात्र | बाजी | रात्रीस खेळ चाले २ | देवमाणूस | ती परत आलीये | देवमाणूस २ | सातव्या मुलीची सातवी मुलगी