रेणुका शहाणे

मराठी चित्रपट अभिनेत्री

रेणुका शहाणे ( मार्च ७, इ.स. १९६६) या मराठी तसेच हिंदी भाषेतल्या चित्रपटांत व दूरचित्रवाणी कार्यक्रमांतून अभिनय करणाऱ्या मराठी अभिनेत्री आहेत.दूरदर्शनवरील सुरभि (१९९३-२००१) या मालिकेतील सूत्रसंचालक म्हणून त्या पहिल्यांदा प्रकाश झोतात आल्या. "हम आपके है कौन" या हिंदी चित्रपटामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.

रेणुका शहाणे
रेणुका शहाणे
जन्म रेणुका शहाणे
७ ऑक्टोबर, १९६६ (1966-10-07) (वय: ५७)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम सुरभि, सर्कस, खिचडी
वडील विजयकुमार शहाणे
आई शांता गोखले
पती
अपत्ये शौर्यमान व सतेन्द्र

पार्श्वभूमी संपादन

शहाणे यांचा जन्म मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील लेफ्टनंट कमांडर विजयकुमार शहाणे भारतीय नौदलात अधिकारी होते. त्यांची आई शांता गोखले लेखिका आणि चित्रपट समीक्षक आहेत.[१] रेणुका यांचे शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांचे भाऊ गिरीश शहाणे लेखक, कला समीक्षक आणि सदर लेखक आहेत.रेणुका शहाणे यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयातून मानसशास्त्रात बी.ए.ची पदवी घेतली आणि मुबई विद्यापीठातून क्लिनिकल मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली.[२]

रेणुका शहाणे यांचा पहिला विवाह मराठी नाट्यलेखक आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी झाला. पण त्यांचा लवकरच घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांचा विवाह हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांच्याशी झाला. त्यांना शौर्यमान आणि सतेन्द्र हे दोन पुत्र आहेत.

कारकीर्द संपादन

‘हाच सूनबाईचा भाऊ’ या मराठी चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीस सुरुवात झाली. १९८९ साली अझिझ मिर्झा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘सर्कस’ या दूरदर्शनवरील हिंदी मालिकेत त्यांनी भूमिका केली. सुरभि या दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकेतील सूत्रसंचालक म्हणून केलेल्या कामाने त्या प्रकाशझोतात आल्या.[३] या मालिकेद्वारे त्या घराघरात पोचल्या. सुरभि लोकप्रिय असतानाच १९९४ मध्ये ‘हम आप के है कौन..!’ या चित्रपटात भूमिका करण्याची त्यांना संधी मिळाली. सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांची भूमिका असलेला हा चित्रपट खूप गाजला.  त्यांनी अनेक मराठी चित्रपटातसुद्धा काम केले आहे. १९९५ मध्ये त्यांनी सचिन खेडेकर या अभिनेत्याबरोबर ‘सैलाब’ या हिंदी मालिकेत काम केले. कोरा कागज या हिंदी मालिकेत त्यांनी सलील अंकोला या अभिनेत्याबरोबर काम केले. (१९९८-१९९९). २००९ मध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून ‘रीटा’ हा मराठी चित्रपट केला. त्यांची आई शांता गोखले यांच्या ‘रीटा वेलिंगकर’ या कादम्बरीवर हा चित्रपट आधारित होता.[४] या चित्रपटात जॅकी श्रॉफ, पल्लवी जोशी, सुहासिनी मुळे, मोहन आगाशे,सई ताम्हणकर, तुषार दळवी, मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची पटकथा रेणुका शहाणे यांनीच लिहिलेली आहे. शहाणे यांनी राम गोपाल वर्मांच्या मनी या तेलुगु चित्रपटात काम केले आहे. त्या समाज माध्यमांवर सक्रिय असतात आणि विविध विषयांवर आपली मते मांडत असतात.[५]


चित्रपट संपादन

 • हम आप के है कौन..!(१९९४)
 • मासूम (१९९६)
 • तुन्नू की टीना (१९९७)
 • तुम जियो हजारो साल (२००२)
 • एक अलग मौसम (२००३)
 • दिल ने जिसे अपना कहा (२००४)

मराठी चित्रपट संपादन

 • हायवे
 • रीटा
 • दुसरी गोष्ट
 • ते आठ दिवस
 • बकेट लिस्ट
 • गुलाबजाम

वेबसिरीज संपादन

व्हॉट द फोक्स (२०१८)

दूरचित्रवाणी मालिका संपादन

 • सर्कस (१९८९-१९९०)
 • सुरभि (१९९३-२००१)
 • इम्तिहान (१९९४)
 • आसमान से आगे (१९९४)
 • जुनून (१९९४)
 • सैलाब (१९९५-१९९८)
 • मिसेस माधुरी दीक्षित (१९९७)
 • घुटन (१९९७-१९९८)
 • ९ मलबार हिल (१९९७-१९९८)
 • कोरा कागज (१९९८-१९९९)
 • खामोशिया कब तक (२००१)
 • जिते ही जिसके लिये (२००७)
 • याला जीवन ऐसे नाव (२०१०)
 • झलक दिखला जा (२०१०-२०११)
 • जीना इसी का नाम है (२०१०-२०११)
 • फू बाई फू (२०११)
 • आवाज महाराष्ट्राचा (२०११)
 • लेडीज फर्स्ट (२०११)
 • मेरे रंग मे रंगनेवाली (२०१४)
 • कॉमेडीची बुलेट ट्रेन (२०१५)
 • कभी ऐसे गीत गाया करो (२०१५)
 • खिचडी (२०१८)
 • बँड बाजा वरात (२०२२)

पुरस्कार संपादन

 • अबोली चित्रपटासाठी फिल्मफेर पुरस्कार

संदर्भ संपादन

 1. ^ Gokhale, Shanta (2013-08-15). Crowfall (इंग्रजी भाषेत). Penguin UK. ISBN 9789351181965.
 2. ^ ""Women Are Strong. Period!" Says Renuka Shahane". Women's Web: For Women Who Do (इंग्रजी भाषेत). 2019-11-10 रोजी पाहिले.
 3. ^ "New look". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2008-02-25. ISSN 0971-751X. 2019-11-10 रोजी पाहिले.
 4. ^ Gokhale, Shanta (1995). Rita Welinkar (इंग्रजी भाषेत). Orient Blackswan. ISBN 9788125003243.
 5. ^ "आझम खान यांच्यावर संतापलेल्या रेणुका शहाणे म्हणतात." Loksatta. 2019-11-10 रोजी पाहिले.