चला हवा येऊ द्या हा नितीन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणीवरील विनोदी कार्यक्रम आहे. सध्या झी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता प्रक्षेपित केला जातो. या मालिकेचे दिग्दर्शन आणि निवेदन डॉक्टर निलेश साबळे करतात. ह्या तुफान विनोदी मालिकेत प्रमुख भूमिकेत भालचंद्र कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे आहेत. काहीवेळा ह्या कार्यक्रमाचे सोम ते बुध / गुरु / शुक्र विशेष भाग अथवा रविवारी दोन किंवा तीन तासांचे विशेष भाग देखील दाखवले जातात. २०२० च्या दिवाळीपासून स्वप्नील जोशीने या कार्यक्रमात परीक्षक म्हणून उपस्थित राहण्यास सुरुवात करण्यात आली.

चला हवा येऊ द्या
दिग्दर्शक निलेश साबळे
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार आणि मंगळवार रात्री ०९:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग * १८ ऑगस्ट २०१४ ते ०७ नोव्हेंबर २०१७
 • ०८ जानेवारी २०१८ ते २४ मार्च २०२०
प्रथम प्रसारण १३ जुलै २०२० –
अधिक माहिती
आधी माझा होशील ना
नंतर देवमाणूस

ह्या मालिकेत मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि मराठी चित्रपट यातील कलाकार येतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाची, नाटकाची किंवा प्रसारित मालिकेची माहिती देतात. तसेच काहीवेळा या मंचावर अनेक हिंदी कलाकारांना देखील बोलावले जाते. ह्या मालिकेची मध्यवर्ती संकल्पना थुकरटवाडी या गावातील घडणार्‍या गमती जमतींवर आधारित आहे. थुकरटवाडी गावाचा पोस्टमन आलेल्या पाहुण्या कलाकारांसाठी त्यांच्या नातलगांनी पाठवलेली पत्रे घेऊन येतो आणि विशिष्ट शैलीत ती वाचूनही दाखवतो. ही पत्रे अरविंद जगताप लिखित असतात.

कमी भागात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा सुप्रसिद्ध काॅमेडी शो आहे. निलेश साबळे, भालचंद्र कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि तुषार देवल यांनी मिळून सुरु केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच योगेश शिरसाट, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, उमेश जगताप, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, विनीत भोंडे, शशिकांत केरकर, मानसी नाईक, संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो. चला हवा येऊ द्या आयएमडीबीवर

नवे पर्वसंपादन करा

 1. महाराष्ट्र दौरा (१४ डिसेंबर २०१५)
 2. भारत दौरा (०१ मे २०१७)
 3. विश्व दौरा (०८ जानेवारी २०१८)
 4. होऊ दे व्हायरल (२७ ऑगस्ट २०१८)
 5. शेलिब्रिटी पॅटर्न (२९ एप्रिल २०१९)
 6. उत्सव हास्याचा (०५ ऑगस्ट २०२०)
 7. लेडीज जिंदाबाद (१७ ऑगस्ट २०२०)

विशेष भागसंपादन करा

 1. सोनाली रॉकेट, गुरुनाथ भुईचक्र आणि सौमित्र नागगोळी, थुकरटवाडीत होणार विनोदाची आतषबाजी. (४-६ जानेवारी २०२१)
 2. क्रिकेटवीरांच्या उपस्थितीत थुकरटवाडीच्या पिचवर रंगणार विनोदाची हटके मॅच. (११-१३ जानेवारी २०२१)
 3. नव्या वर्षात न होवो सुखाची कमी, थुकरटवाडी देणार हास्याची हमी. (१८-२० जानेवारी २०२१)
 4. सुरक्षेचा विश्वास, कायद्याची ताकद, दृष्टीचा दाता आणि शिक्षणाचं भविष्य एकाच मंचावर. (२५-२७ जानेवारी २०२१)
 5. सोमवार ते बुधवार होणार मनोरंजन धमाकेदार, कारण थुकरटवाडीत उडणार सई-आदित्यच्या लग्नाचा बार. (१-३ फेब्रुवारी २०२१)
 6. सुरांची आतषबाजी आणि विनोदाची फटकेबाजी एकाच मंचावर, थुकरटवाडीत अवतरणार महाराष्ट्राचे लाडके लिटील चॅम्प्स. (८-१० फेब्रुवारी २०२१)
 7. थुकरटवाडीत रंगणार मनोरंजन लयभारी, कारण सोबतीला येणार टीम कारभारी. (१५-१७ फेब्रुवारी २०२१)
 8. थुकरटवाडीत सुटणार नव्या कथांचे वारे, समोरासमोर येणार झी मराठीचे तारे. (२२-२४ फेब्रुवारी २०२१)
 9. थुकरटवाडीत येणार 'येऊ कशी'ची टीम नांदायला, प्रेक्षकांशी हसरी नाती बांधायला. (१-३ मार्च २०२१)
 10. थुकरटवाडीत होणार वातावरण टाईट, अप्सरांमध्ये रंगणार विनोदाची फाईट. (८-१० मार्च २०२१)
 11. घेऊन ऑनलाईन क्लासची सुट्टी, थुकरटवाडीत होणार छोट्या दोस्तांची बट्टी. (१५-१७ मार्च २०२१)
 12. थुकरटवाडीत वाहणार झी मराठी अवॉर्डची हवा, सोमवार ते बुधवार दिसणार मनोरंजनाचा रंग नवा. (२२-२४ मार्च २०२१)
 13. अनोख्या रंगांनी रंगणार थुकरटवाडी, सोमवार ते बुधवार सुसाट सुटणार कॉमेडीची गाडी. (२९-३१ मार्च २०२१)
 14. थुकरटवाडीत चढणार संगीताचा साज, दिसणार कैलाश खेर यांचा मराठमोळा बाज. (५-७ एप्रिल २०२१)
 15. थुकरटवाडीतर्फे कॉमेडीचे बादशाह दादा कोंडके यांना अनोखी हास्यांजली. (१२-१४ एप्रिल २०२१)
 16. सचिनभाऊचा बर्थडे. (१९-२१ एप्रिल २०२१)
 17. रापचिक सुरु राहणार हास्याचा कारभार, सोमवार ते बुधवार भरणार विनोदाचा दरबार. (२६-२८ एप्रिल २०२१)
 18. असतील संकटे अनेक, पण उद्देश आमचा नेक, मनोरंजन करणार अखंड, हसणार वडील-मुलगा अन् मायलेक. (३-४ मे २०२१)
 19. थुकरटवाडीच्या कोर्टाचा काही लागो निकाल, सोमवार आणि मंगळवार मनोरंजन होणार धमाल. (१०-११ मे २०२१)
 20. जाहिरातीची शूटिंग त्यात भाऊची धतिंग. (१७-१८ मे २०२१)
 21. वन टू का फोर करत कुशल विकणार घर, थुकरटवाडीत बरसणार हास्याची सर. (२४-२५ मे २०२१)
 22. सोसायटीवाले भटकतात दारोदारी, भाऊ वॉचमन लयभारी. (३१ मे २०२१)
 23. डायरेक्टर कुशलचा सिनेमा आहे ऑल सेट, सिनेमात बायकोपेक्षा मेहुणी ठरेल का ग्रेट? (०१ जून २०२१)
 24. लकी पॅंट, लकी शर्ट, लकी पेन, लकी कप, कुणी लक देता का लक?, अनलकी नवऱ्याची लकी बायको. (०७ जून २०२१)
 25. हरवून जंगलाची वाट, पडणार भाऊ आजोबांशी गाठ. (०८ जून २०२१)
 26. बायको गेली माहेरी, मोलकरीण लावणार का हजेरी? (१४ जून २०२१)

नवीन वेळसंपादन करा

क्र. दिनांक वार वेळ
१८ ऑगस्ट २०१४ - ०७ नोव्हेंबर २०१७ सोम-मंगळ (कधीतरी सोम-बुध / सोम-शुक्र) रात्री ९.३०
०८ जानेवारी २०१८ - २५ जून २०१९ सोम-मंगळ (कधीतरी सोम-गुरु / रवि)
०१ जुलै - ०१ ऑगस्ट २०१९ सोम-गुरु
०५ ऑगस्ट २०१९ - २४ मार्च २०२० सोम-मंगळ (कधीतरी सोम-गुरु / रवि)
१३ जुलै - १५ सप्टेंबर २०२० सोम-मंगळ रात्री ९.३०
०५ ऑगस्ट - १९ सप्टेंबर २०२० बुध-शनि
२१ सप्टेंबर २०२० - २८ एप्रिल २०२१ सोम-बुध
०३ मे २०२१ - चालू सोम-मंगळ

कलाकारसंपादन करा

 • निलेश साबळे : निलेश फक्त प्रसिद्ध नट नाही तर तो एक चांगला विनोदी लेखकही आहे. ह्या कार्यक्रमात त्याची भूमिका कॅफेचा मालकाची आहे. येथे तो कलाकारांशी संवाद साधतो.
 • भारत गणेशपुरे : थुकरटवाडी गावाचे सरपंच, न्यायाधीश या भूमिकेत पाहायला मिळतात.
 • सागर कारंडे : सरकारी वकिल, पोस्टमन व प्रहसनानुसार स्त्री भूमिकेत दिसतात.
 • भालचंद्र कदम (भाऊ) : निलेशच्या वडिलांची भूमिका करतात. त्यांना कधीही लोकांची नावे लक्षात राहत नाहीत, त्याबाबतीत ते नेहमी नवा गोंधळ करतात. विनोदी प्रहसनानुसार त्यांची भूमिका बदलत राहते.
 • श्रेया बुगडे : ह्यांनी खेड्यातील मुलीची म्हणजे सरपंचांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. कधी कधी त्या पत्रकार, हायस्कूल टीचर यांच्या भूमिका साकारताना दिसतात.
 • विनीत भोंडे / अंकुर वाढवे : ह्या कार्यक्रमातला हा एक कलाकार आहे. अन्य कलाकारांपेक्षा सगळ्यात कमी उंची ह्या कलाकारांची आहे.
 • कुशल बद्रिके
 • योगेश शिरसाट
 • स्नेहल शिदम
 • उमेश जगताप
 • तुषार देवल
 • अरविंद जगताप

संदर्भसंपादन करा

 1. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya
 2. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya
 3. http://timesofindia.indiatimes.com/tv/trade-news/marathi/CHYD-completes-100-episodes/articleshow/48281229.cms
 4. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya
 5. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya/character/nilesh-sable
 6. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya/character/bhalchandra-kadam
 7. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya/character/shreya-bugade
 8. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya/character/bharat-ganeshpure