बाईपण भारी देवा
बाईपण भारी देवा हा २०२३ मधील केदार शिंदे दिग्दर्शित भारतीय मराठी-भाषेतील नाटक चित्रपट आहे.[३] चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडियोझ आणि एमव्हीबी मीडियाद्वारे करण्यात आली असून यात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीपा परब, सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[४]
बाईपण भारी देवा | |
---|---|
दिग्दर्शन | केदार शिंदे |
निर्मिती | जिओ स्टुडियोझ आणि एमव्हीबी मीडिया |
प्रमुख कलाकार |
|
संकलन | मयूर हरदास |
छाया | वासुदेव राणे |
संगीत | साई-पियूष |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ३० जून २०२३ |
वितरक | पीव्हीआर पिक्चर्स |
निर्मिती खर्च | ₹५ कोटी[१] |
एकूण उत्पन्न | ₹९०.५० कोटी[२] |
|
शीर्षक गीत ‘बाईपण भारी देवा’च्या चित्रीकरणापर्यंत या चित्रपटाचे नाव ‘मंगळागौर ’ असे होते. सहनिर्माते अजित भुरे यांनी केदार शिंदेंना चित्रपटाचे शीर्षक बदलून बाईपण भारी देवा असे सुचवले. [५]
चित्रपटाने तिकीट खिडकीवर ५० दिवसांमध्ये ₹९०.५० कोटींहून अधिक कमाई केली.[६][७][८] हा आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.[९] हा चित्रपट पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट[१०] आणि २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून उदयास आला. याने मराठी चित्रपट उद्योगासाठी एका दिवसात ₹६.१० कोटींपेक्षा जास्त कमाईचा नवा विक्रम देखील रचला.[११] हा २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा महिला केंद्रित चित्रपट आहे.[१२]
बाईपण भारी देवा हा समीक्षणात्मक तसेच व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट ठरला. चित्रपटाचे लेखन, कथा, संगीत आणि दिग्दर्शनासाठी प्रशंसा केली गेली आहे. बाईपण भारी देवा हा "ब्लॉकबस्टर" चित्रपट ठरला.[१२][१०]
प्रदर्शन तारीख
संपादनहा चित्रपट सर्व प्रथम २८ मे २०२१ ला प्रदर्शित होणार होता.[१३] त्यानंतर तो २८ जानेवारी २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आला.[१४] पुढे ६ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित तारीख ठरवण्यात आली.[१५] परंतु शेवटी ३० जून २०२३ ला चित्रपट प्रदर्शित झाला.[१६]
कथा
संपादनहा चित्रपट अशा सहा बहिणींची कथा आहे ज्या काही कारणास्तव एकमेकांपासून विभक्त होतात आणि कौटुंबिक, वैयक्तिक आणि आर्थिक समस्यांनाही तोंड देतात. [१७]
कलाकार
संपादन- रोहिणी हट्टंगडी
- वंदना गुप्ते
- दीपा परब
- सुकन्या कुलकर्णी
- सुचित्रा बांदेकर
- सुरुची अडारकर
- शिल्पा नवलकर
- सोहम बांदेकर
- साक्षी परांजपे
- वरद चव्हाण
- तुषार दळवी
- शरद पोंक्षे
- पीयूष रानडे
- स्वप्नील राजशेखर
निर्मिती
संपादनसुरुवात
संपादनजिओ स्टुडिओने आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२२ रोजी चित्रपटाची घोषणा केली. [१८] EmVeeBee मीडियाच्या माधुरी भोसले यांनी बेला शिंदे आणि अजित भुरे यांच्यासह चित्रपटाची निर्मिती केली आहे . [१९] [२०]
भूमिका
संपादनचित्रपटाची कथा सहा बहिणींवर महिला केंद्रीत असून अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, [२१] वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी, शिल्पा नवलकर [२२] प्रमुख भूमिकेत आहेत. [२३]
चित्रीकरण
संपादनभारतात कोरोना टाळेबंदीपूर्वी मुख्य छायाचित्रण सुरू करण्यात आले होते, परंतु महाराष्ट्रात कोविड-१९ साथीच्या आजारामुळे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. केदार शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, टाळेबंदीपूर्वी चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झाले होते. [२४] टाळेबंदीनंतर उत्तर-निर्मितीचे (पोस्ट-प्रॉडक्शन) काम पूर्ण झाले. [२५]
संगीत
संपादनचित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत साई-पीयूष यांनी दिले आहे आणि संगीताचे पुनर्मुद्रण स्वरूप जोशी यांनी केले आहे. अदिती द्रविड आणि वलय मुलगुंद यांची अतिरिक्त गाणी व बोल आहेत, तर सावनी रवींद्र आणि मानसी हेडऊ यांनी गायन केले आहे.
प्रदर्शन
संपादनचित्रपटगृह
संपादन८ मार्च २०२३ रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. [२६] २८ एप्रिल २०२३ रोजी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला [२७] यानंतर ६ जून २०२३ रोजी मुंबईतील महालक्ष्मी मंदिराला भेट देणाऱ्या टीमसोबत शीर्षक गीत सादर करण्यात आले. [२८] चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर १३ जून २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपूर्ण टीम आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. [२९] हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
संदर्भ
संपादन- ^ "'बाईपण भारी देवा'ची जादू कायम, चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केलेले फक्त 'इतके' रुपये". लोकसत्ता. 2023-07-19 रोजी पाहिले.
- ^ "Baipan Bhaari Deva Box Office Collection". एबीपी माझा. 2023-07-19 रोजी पाहिले.
- ^ "Baipan Bhari Deva: सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची सुपर कथा, केदार शिंदेचा नवा चित्रपट". Hindustan Times Marathi. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ "केदार शिंदेचा 'बाईपण भारी देवा..' या दिवशी होतोय प्रदर्शित." सकाळ. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ "काय सांगता बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव नव्हतंच... या व्यक्तीमुळं करण्यात आला नावात बदल". महाराष्ट्र टाइम्स. 2023-07-14 रोजी पाहिले.
- ^ "Marathi film 'Baipan Bhari Deva' unstoppable at box office, earns Rs 58 crore in 3 weeks". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-07-24 रोजी पाहिले.
- ^ डेस्क, एबीपी माझा एंटरटेनमेंट (2023-08-14). "'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार 'बाईपण भारी देवा'? कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क". marathi.abplive.com. 2023-08-17 रोजी पाहिले.
- ^ "Baipan Bhari Deva Box Office Collection | All Language | Day Wise | Worldwide - Sacnilk". www.sacnilk.com (इंग्रजी भाषेत). 2023-08-18. 2023-09-02 रोजी पाहिले.
- ^ "'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी सुसाट, १०० कोटींचा आकडा करणार पार?". Lokmat. 2023-07-31. 2023-08-02 रोजी पाहिले.
- ^ a b "मराठी मूवी 'बाईपण भारी देवा' की ताबड़तोड़ कमाई, बॉक्स ऑफिस पर तोड़े रिकॉर्ड". आज तक (हिंदी भाषेत). 2023-07-07. 2023-07-19 रोजी पाहिले.
- ^ "Marathi Cinema : 5 करोड़ के बजट में बनी 'बिना हीरो वाली' फिल्म ने तोड़े कमाई के सभी रिकॉर्ड, सिनेमाघरों में उमड़ रही दर्शकों की भीड़". jagrantv (हिंदी भाषेत). 2023-07-19 रोजी पाहिले.
- ^ a b "Baipan Bhaari Deva Box Office: Kedar Shinde's Directorial Turns Out To Be The Latest Marathi Blockbuster, Makes Solid Returns Of 296%". Koimoi. 2023-07-09 रोजी पाहिले.
- ^ "Kedar Shinde releases poster of his new film 'Baipan Bhaari Deva'". Marathi Movie World (इंग्रजी भाषेत). 2023-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Kedar Shinde's multi-starrer 'Baipan Bhaari Deva' to hit screens on January 28, 2022 - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2023-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Kedar Shinde's multi-starrer 'Baipan Bhaari Deva' to hit screens on January 6, 2023 - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2023-07-20 रोजी पाहिले.
- ^ "केदार शिंदेचा 'बाईपण भारी देवा..' या दिवशी होतोय प्रदर्शित." सकाळ. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2022-08-19). "केदार शिंदेंचा 'बाईपण भारी देवा' या दिवशी होणार प्रदर्शित; चित्रपटात सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची कथा". TV9 Marathi. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ PTI (2022-09-06). "Jio Studios unveils slate of Marathi films, series". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ "The story of a super woman in a common life". Samna. 20 August 2022. 2023-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-07-15 रोजी पाहिले.
- ^ "केदार शिंदे यांचा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला.. 'बाईपण भारी देवा!'". Nagpur Today : Nagpur News (इंग्रजी भाषेत). 2022-03-09. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ ""ती समोर आली की..." केदार शिंदेंची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले "'बाईपण भारी देवा'च्या निमित्ताने..." | marathi director kedar shinde share special post for baipan bhari deva rohini hattangady nrp 97". Loksatta. 2023-07-01. 2023-07-02 रोजी पाहिले.
- ^ "Shilpa Navalkar movies, filmography, biography and songs - Cinestaan.com". Cinestaan. 2023-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-04-03 रोजी पाहिले.
- ^ ""या ६ बहिणींकडून…" भाऊबीजेच्या मुहूर्तावर केदार शिंदेच्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित". Loksatta. 26 October 2022. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ "Baipan Bhari Deva: Kedar Shinde Presents A Woman Centric Marathi Entertainer | SpotboyE". www.spotboye.com (इंग्रजी भाषेत). 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ Poojari, Nitesh. "'Bai Pan Bhari Deva': Kedar Shinde resumes shooting of his upcoming film - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ "Sachin Tendulkar announces release of Marathi film 'Baipan Bhari Deva'". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2023-03-09. 2023-07-02 रोजी पाहिले.
- ^ "Video : "अर्ध आयुष्य संपलं, पण..." सहा बहिणींची अनोखी गोष्ट, केदार शिंदेंच्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित". Loksatta. 2023-04-28. 2023-07-02 रोजी पाहिले.
- ^ "'Baipan Bhari Deva': Makers seek blessings at Mahalaxmi temple as they unveil film's title song -Watch". द टाइम्स ऑफ इंडिया. 2023-06-06. ISSN 0971-8257. 2023-07-02 रोजी पाहिले.
- ^ "'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर पाहून अशोक सराफ म्हणाले, 6 अभिनेत्रींना एकत्रित." News18 Lokmat. 2023-06-13. 2023-07-02 रोजी पाहिले.