न्यूझ१८ लोकमत

मराठी वृत्त-चित्र वाहिनी



न्यूझ १८ लोकमत ही बातम्यांच्या प्रसारणाला वाहिलेली मराठी भाषेतील आघाडीची निष्पक्ष वृत्तचित्रवाहिनी आहे. या वाहिनीचे प्रसारण ६ एप्रिल, इ.स. २००८ रोजी सुरू झाले. नेटवर्क १८ आणि लोकमत न्यूझ प्रायव्हेट लि. यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. वाहिनीचे मुख्यालय मुंबईतील लोअर परेल येथे आहे. सध्या प्रसाद काथे हे वृत्तवाहिनीचे संपादक आहे. तर महेश म्हात्रे हे या वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक आहेत.



न्यूझ १८ लोकमत
सुरुवात६ एप्रिल २००८
नेटवर्कटीव्ही १८
मालक नेटवर्क १८, लोकमत
ब्रीदवाक्य ध्यास जनमानसाचा!!!
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत
मुख्यालयलोअर परेल, मुंबई
भगिनी वाहिनीन्यूझ १८ इंडिया, सीएनएन न्यूझ १८, सिएनबिसी आवाज, सीएनबीसी टीव्ही १८
प्रसारण वेळ२४ तास
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ

२०११ सालातल्या सर्वांत जास्त वृत्तविषयक कार्यक्रमासाठीचे राष्ट्रीय, तसेच मटा सन्मान सारखे पुरस्कार न्यूझ १८ लोकमत (पूर्वीच्या आयबीएन-लोकमत) ने मिळवले आहेत. ज्या व्यक्ती व संस्था महाराष्ट्राच्या प्रगतीला कारणीभूत झाल्या त्यांचा परिचय करून देणाऱ्या न्यूझ १८ लोकमतच्या लघुपटमालिकेला, ‘गर्जा महाराष्ट्र’ ह्या महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वांत जास्त बक्षिसे मिळाली.

वृत्तवाहिनी सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी या वाहिनीने पुरस्कार मिळविले आहेत . बेधडक, शो टाईम, दिवसभराच्या बातम्या, खबर महाराष्ट्राची, सलाम महाराष्ट्र, गावाकडच्या बातम्या, वाचाल तर वाचाल, टेकताई, क्राईम टाईम, रिपोर्ताज या सारखे अनेक कार्यक्रम या वाहिनीवर मराठी जगतात पहिल्यादांच प्रसारित केले गेले.

मुख्य कार्यक्रम

संपादन

दर तासाला एक बातमीपत्र रोज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू असते. सकाळी ८.०० वाजता ‘आज ठळक’ या बातमीपत्रात राज्यासह जगभरातील बातम्यांचा वेध घेतला जातो.

१०.३० वाजता शो टाईम तर ११.३० वाजता चॅनेल सर्फिंग नावाचे मनोरंजन विश्वाची सफर घडवणारे कार्यक्रम सादर केले जातात. दुपारी ३.३० वाजता टॉक टाइम हा माहितीपर चर्चात्मक आणि प्रेक्षकाना प्रश्न विचारायची संधी देणारा आणि एखाद्या विषयाला वाहिलेला कार्यक्रम असतो.

दुपारी १.०० वाजता लंच टाइम हे वार्तापत्र हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या देणारे एक तासाचे वार्तापत्र प्रसारित केले जाते.

संध्याकाळी ७.०० वाजता महाराष्ट्राची बित्तंबातमी देणारे राष्ट्र महाराष्ट्र वार्तापत्र तर ८.०० वाजता चर्चात्मक कार्यक्रम बेधडक घेतला जातो. रात्री दहा वाजता राज्यातील बातम्यांचा आढावा दिवसभराच्या बातम्या या वार्तापत्रात घेतले जातात. मुंबई, पुणे, नाशिक या महानगरांतल्या घडामोडींची नोंद ठेवणारे हे वार्तापत्र रात्री ११.०० वाजता प्रसारित केले जाते.

शिवसेनाचा हल्ला

संपादन

न्यूझ १८ लोकमत (पूर्वीचे आयबी‍एन-लोकमत) वाहिनीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकऱ्यांवर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ २० नोव्हेंबर २००९ रोजी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयांवर हल्ला केला होता.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "इन द नेम ऑफ देअर बॉस, सेना गुन्स अटॅक आयबीएन टीव्ही चॅनल्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)