तू चाल पुढं ही झी मराठीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. यात अभिनेत्री दीपा परबने अश्विनीच्या मुख्य भूमिकेचे काम केले आहे.[१]

तू चाल पुढं
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १५ ऑगस्ट २०२२ – चालू
अधिक माहिती

कथानकसंपादन करा

अश्विनी ही एक सामान्य गृहिणी असते व तिचे ब्युटी पार्लर सुरू करण्याचे मोठे स्वप्न असते. तसेच नवीन घर घेण्यासाठी कुटुंबाला तिला थोडा हातभार लावायचा असतो. ज्यासाठी ती अश्विनी ब्युटी पार्लर सुरू करून कमावलेल्या पैशांमधून नवीन घरासाठी मदत करते.

कलाकारसंपादन करा

 • दीपा परब - अश्विनी म्हात्रे / अश्विनी श्रेयस वाघमारे
 • धनश्री काडगांवकर - शिल्पी प्रकाश वाघमारे / शिल्पी विद्युत म्हात्रे
 • प्रतिभा गोरेगांवकर - उज्ज्वला प्रकाश वाघमारे
 • वैष्णवी कल्याणकर - मयुरी श्रेयस वाघमारे
 • देवेंद्र दोडके - प्रकाश वाघमारे
 • आदित्य वैद्य - श्रेयस प्रकाश वाघमारे
 • पिहू गोसावी - कुहू श्रेयस वाघमारे
 • रेयांश जुवाटकर - संजय विद्युत म्हात्रे
 • दीपकार पारकर - विद्युत म्हात्रे
 • स्नेहा माजगांवकर - प्राजक्ता बबन पांडे
 • गणेश सरकटे - बबन पांडे
 • प्रियंका देशमाने - ऋतुजा
 • सागर चव्हाण - दीप
 • मैत्रेय बापट - रुद्र
 • शलाका चितळे - सौ. शिर्के

विशेष भागसंपादन करा

 1. गोष्ट वेगळी ही तुझी वेगळीच राहू दे, तू चाल पुढं. (१५ ऑगस्ट २०२२)
 2. एका हाती संसार एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच. (१८ ऑगस्ट २०२२)
 3. अश्विनीच्या मुली आहेत तिचा अभिमान. (२० ऑगस्ट २०२२)
 4. अश्विनीला सोडावं लागणार का तिचं घर? (२४ ऑगस्ट २०२२)
 5. श्रेयसने बिझनेस करावा अशी अश्विनीची इच्छा. (२७ ऑगस्ट २०२२)
 6. बिझनेस श्रेयसचा धावपळ अश्विनीची, घर सांभाळून मदत करणार 'ती'. (२९ ऑगस्ट २०२२)
 7. बाप्पाचा उत्सव अजून होणार जोमदार, श्रेयसच्या बिझनेसला अश्विनीचा हातभार. (०१ सप्टेंबर २०२२)
 8. अश्विनीची गैरहजेरी सगळ्यांना सलणार, श्रेयसच्या ऑफिस उद्घाटनात काय होणार? (०३ सप्टेंबर २०२२)
 9. गणेशोत्सवानिमित्त धमाल मस्ती, 'मिसेस आश्रय सोसायटी' स्पर्धा कोण जिंकणार, अश्विनी की शिल्पी? (०८ सप्टेंबर २०२२)
 10. 'मिसेस आश्रय सोसायटी' स्पर्धेनंतर सर्वत्र अश्विनीचीच चर्चा, व्हायरल व्हिडीओमुळे श्रेयस नाराज. (१२ सप्टेंबर २०२२)
 11. अश्विनीचा होतोय अनादर, मयुरी करून देणार का अश्विनीला याची जाणीव? (१५ सप्टेंबर २०२२)
 12. अश्विनीला मिळणार आणखी एक संधी, श्रेयस होऊ देणार का अश्विनीची प्रगती? (२५ सप्टेंबर २०२२)
 13. अश्विनी श्रेयसला संकटातून वाचवणार, घराचं स्वप्न पूर्ण होणार. (२८ सप्टेंबर २०२२)
 14. अश्विनीने घातला भूमिपूजनाचा घाट, 'गणू'च्या साक्षीने होणार का सगळं थाटमाट? (०१ ऑक्टोबर २०२२)
 15. भूमिपूजनात 'गणू'ची मूर्ती सापडणार, अश्विनीसमोर संकट उभं राहणार. (०५ ऑक्टोबर २०२२)
 16. अश्विनीने घराबाहेर पडण्यास श्रेयसचा नकार, मयुरीच्या शिक्षणाचा प्रश्न अश्विनी कसा सोडवणार? (०३ नोव्हेंबर २०२२)
 17. मयुरीचं एक चुकीचं पाऊल ठेवणार अश्विनीच्या संस्कारांवर बोट. (१४ नोव्हेंबर २०२२)
 18. अश्विनी मुलींसाठी घेणार एक महत्त्वाचा निर्णय, मयुरीच्या मदतीने टाकणार घराबाहेर पाऊल. (१७ नोव्हेंबर २०२२)
 19. अश्विनीने ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल अडखळणार. (२४ नोव्हेंबर २०२२)
 20. अश्विनीवर चोरीचा आळ, कामाच्या ठिकाणी होणार घोर अपमान. (२७ नोव्हेंबर २०२२)

संदर्भसंपादन करा

 1. ^ "गृहिणीचं आयुष्य दाखवणारी नवी मालिका, 'तू चाल पुढं'मधून दीपा परबचं छोट्या पडद्यावर पुनरागमन!". एबीपी माझा.

बाह्य दुवेसंपादन करा

संध्या. ७.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | अवघाचि संसार | भाग्यलक्ष्मी | अरुंधती | दिल्या घरी तू सुखी राहा | राधा ही बावरी | जावई विकत घेणे आहे | असे हे कन्यादान | नांदा सौख्य भरे | तुझ्यात जीव रंगला | लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू | कारभारी लयभारी | पाहिले न मी तुला | मन उडू उडू झालं | तू चाल पुढं