वहिनीसाहेब ही झी मराठी वाहिनीवरील एक जुनी व लोकप्रिय मालिका आहे. लोकाग्रहास्तव या मालिकेचे पुनःप्रक्षेपण झी युवा या वाहिनीवर सुरु करण्यात आले होते.

वहिनीसाहेब
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ७३४
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ * सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता
  • सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता (०९ एप्रिल २००७ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २७ नोव्हेंबर २००६ – ०९ मे २००९
अधिक माहिती
आधी होम मिनिस्टर
नंतर अवघाचि संसार

घराला घरपण देणारी असते ती त्या घरातील स्त्री. आई, मुलगी, बहीण, सून अशा वेगवेगळ्या भूमिकेतून ती घर सजवत असते. घरामधली आई ही एकेकाळची सून असते. घराची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी, वाटेत येणाऱ्या संकटांशी, नियतीच्या लहरींची टक्कर देऊन ही सून 'वहिनीसाहेब' बनून डोंगराएवढी मोठी होत जाते. मात्र तिची परिस्थिती खरंच बिकट होते जेव्हा तिची ओळख, तिचे हक्क तिचा नवराच डावलतो, तेव्हा वहिनीसाहेब कोणती भूमिका घेतात? असे या मालिकेचे कथानक आहे.

कलाकारसंपादन करा

  1. सुचित्रा बांदेकर
  2. शरद पोंक्षे
  3. भार्गवी चिरमुले
  4. विनय आपटे
  5. अभिजीत केळकर
  6. प्रसाद जवादे
  7. रोहिणी हट्टंगडी
  8. ऋग्वेदी प्रधान