तुझ्यात जीव रंगला

मराठी टीव्ही मालिका

तुझ्यात जीव रंगला ही एक भारतीय रोमँटिक दूरचित्रवाणी मालिका आहे जिची निर्मिती सोबो फिल्म्सने केली आहे. झी मराठी वाहिनीवर ही लोकप्रिय मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेने टीआरपीमध्ये ८.७, ८.५ असे सर्वोच्च स्तर गाठून अनेकदा पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.

तुझ्यात जीव रंगला
दिग्दर्शक अनिकेत साने
निर्माता स्मृती शिंदे
निर्मिती संस्था सोबो फिल्म्स
कलाकार खाली पहा
संगीतकार ए.व्ही. प्रफुल्लचंद्र
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या १२६२
निर्मिती माहिती
स्थळ कोल्हापूर, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता
  • सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता (२१ ऑक्टोबर २०१९ आणि २ नोव्हेंबर २०२० पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग ३ ऑक्टोबर २०१६ – २७ मार्च २०२०
प्रथम प्रसारण १३ जुलै २०२० – २ जानेवारी २०२१
अधिक माहिती
आधी होम मिनिस्टर
नंतर लाडाची मी लेक गं!

कथानक

संपादन

रणविजय गायकवाड ऊर्फ राणादा हा प्रतापराव गायकवाड यांचा थोरला मुलगा आहे. प्रतापराव गायकवाड हे गावचे एक मोठे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आहेत. राणा हा एक कुस्ती पैलवान, पोलीस कर्मचारी आणि शेतकरी सुद्धा आहे. तो शाळेत कधीच गेला नसल्यामुळे तो अशिक्षित आहे. कुस्तीगीर असल्याने तो कुस्ती समुदायाच्या नियमांचे तो पालन करतो. त्या नियमांनुसार त्याने स्वतःच्या नातेवाईक यांव्यतिरिक्त कुठल्याही महिलांशी बोलू किंवा संपर्क साधू नये असाही एक नियम असतो. राणाचा छोटा भाऊ सूरज गायकवाड उर्फ सनीदा आहे. सूरज हा एक व्रात्य आणि वाया गेलेला मुलगा आहे. मुख्यतः आपल्या मद्यपानाच्या वाईट सवयीमुळे तो गावात कुप्रसिद्ध आहे. गावातल्या इतर गुंडांसह गावात भटकणे आणि फक्त फुशारक्या मारण्यासाठी पार्ट्या देणे त्याला पसंत आहे. राणा-अंजलीच्या लग्नानंतर सूरज सुधारतो. सूरजने नंदिताशी लग्न केले आहे. ती एक श्रीमंत राजकीय व्यक्तिमत्त्व उत्तम जाधव कुटुंबातील असल्याने ती अत्यंत अहंकारी दाखवली आहे. गायकवाड कुटुंबावर संपूर्ण नियंत्रण नंदिताला हवे आहे म्हणून तिचा प्रत्येक डाव राणाचे लग्न न होऊ देण्याकरिता असतो. राणाने लग्न केले तर आपोआपच मोठ्या मुलाची पत्नी म्हणून राणाची बायको कुटुंबाची प्रमुख स्त्री होईल, अशी भीती तिला वाटत असते.

अंजली एक अतिशय हुशार आणि उच्च शिक्षित असलेली शहरातील मुलगी आहे. या गावात तिला शालेय शिक्षिका म्हणून नियुक्त केले आहे. तिचे वडील बँक कर्मचारी असतात आणि या गावात त्यांची बदली झालेली असते. वडील व आईसमवेत अंजली या गावात आनंदाने राहत असते. एके दिवशी तिची राणाशी भेट होते आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून होते आणि नंतर ते दोघे लग्न करतात.

या मालिकेच्या नंतरच्या भागात नंदिता आणि अंजली यांच्यातील कलहावर लक्ष केंद्रित आहे. यात राणादा आणि सूरज यांचे बालपण आणि लग्नाआधी नंदिताचे आयुष्य यावर फ्लॅशबॅक देण्यात आले आहेत. नंतर अंजलीला जर्मनीला जाण्याची संधी मिळते. परंतु राणाचा अपघात झाल्याने ती जर्मनीला जाण्याचे टाळते व त्याची खूप काळजी घेते. त्यानंतर राणा राष्ट्रीय स्तरावर दलजित सिंग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर टटांका या दोन्ही कुस्तीगीरंना हरवून विजयी होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरची कुस्ती व त्यांचे नियम रामाला शिकवण्यासाठी सखी नावाची मुलगी येते. तेव्हासुद्धा नंदिता राणा-अंजली मध्ये सखीच्या कारणावरून फूट पाडण्याचा प्रयत्न करते. पण ते सर्व प्रयत्न फोल ठरतात.

या नंतरचे कथानक गावातल्या राजकारणावर फिरते. अंजली आणि नंदिता दोघीही सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून उभ्या राहतात. त्यात नंदिता आणि परेश पाटील मिळून अनेक कुरघोडी करतात. तरीसुद्धा गावकरी मोठ्या विश्वासाने अंजलीला सरपंच म्हणून निवडून देतात. यानंतर राणाला नंदिताचे सर्व सत्य कळल्यामुळे परेश पाटील आणि नंदिता दोघे मिळून राणाचा काटा काढतात. यामुळे अंजली खचते व याचा फायदा उठवून नंदिता सरपंच बनून २ वर्षे गावावर हुकूमशाही गाजवते. परंतु राणा पुन्हा राजा राजगोंडाच्या रूपात पुन्हा गावात परततो आणि नंदिताला अद्दल घडवतो. यासाठी नंदिताला जन्मठेपेची शिक्षा होते.

यानंतर मालिकेचे कथानक ६ वर्षांनी पुढे जाते. या ६ वर्षांत प्रतापरावांचे निधन होते. तसेच राणा-अंजलीला राजलक्ष्मी आणि नंदिता-सूरजला युवराज ही अपत्ये होतात. दरम्यान सूरज नंदिताला घटस्फोट देतो. यावेळी राणा पोलीस दलात भरती होतो व अनेक अनैतिक धंदे उद्ध्वस्त करतो. यामुळे राणाचा पुन्हा काटा काढण्यासाठी निवृत्ती नाईक मामा आणि माधुरी येतात. नंतर मामा गोड बोलून गायकवाड घराण्यात माधुरीचे सूरजशी लग्न लावून देतात. नंतर अनेक प्रयत्नांनंतर माधुरी आणि मामा मिळून राणाला खुनाच्या प्रकरणात अडकवतात. पण राणा कायम पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतो. शेवटी मामा इन्स्पेक्टर संग्राम मोहितेंना ही मोहिम राबवायला सांगतात. नंतर योग्य वेळ साधून मोहिते राणाच्या एन्काऊंटरचा आदेश काढतात. या संपूर्ण कटामध्ये परेश पाटील देखील सामील असतो. या काळात राणा कायद्याचे नियम न पाळता अनेकांची मदतसुद्धा करतो. दरम्यान हे चौघे अंजलीला फसवून तिच्या मदतीने राणाला दोनदा अटक करतात आणि राणाला ठार मारण्याचे अयशस्वी प्रयत्न करतात. पण यातून सुटून राणा यांची खलबते उघडकीस आणतो. यामुळे माधुरी व मामाला जन्मठेप आणि परेश पाटील व संग्राम मोहिते यांना सश्रम कारावासाची शिक्षा होते. तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे राणाला सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागतो. दरम्यान अंजलीने राणावर या काळात अविश्वास दाखवल्याने तो तिच्याशी कायमचे संबंध तोडतो.

यानंतर ६ महिन्यांनी राणा पुन्हा गावात परततो आणि पुन्हा पहिल्यासारखे ब्रह्मचारी होण्याचे ठरवतो. याकाळात अंजली जिजाच्या रूपात गावात राहते आणि नंतर बंड्या व बरकत यांच्या मदतीने राणाचे मन पुन्हा अंजलीकडे वळवण्याचा प्रयत्न करते. यावेळेसही परेश पाटील तुरुंगातून सुटल्यावर राणाचा बदला घेण्यासाठी अनेक कारस्थाने रचतो. परंतु जिजा आणि राणा दोघेही ही कारस्थाने मोडून काढतात. नंतर अंजली जिजाच्या रूपात राणाला लग्नाआधीच्या दिवसांची अनेक प्रयत्नांतून आठवण करून देते. अचानकपणे नंदिताला चांगल्या वागणुकीमुळे ७ वर्षांनंतर तुरुंगातून सुटका मिळते आणि ती सूरजचे मन जिंकून घेते. नंदिता तिने अनुभवलेल्या त्रास, भोग, हाल आणि अवहेलनांचा बदला, सूड घेण्यासाठी गायकवाडांच्या वाड्यात नवी कपटे, कारस्थाने रचण्यासाठी परत येते.

कलाकार

संपादन
  • हार्दिक जोशी - रणविजय प्रतापराव गायकवाड (राणादा / राजा राजगोंडा)
    • रुद्र रेवणकर - लहान राणा
  • अक्षया देवधर - अंजली रणविजय गायकवाड / अंजली दिनकर पाठक (पाठकबाई / जिजा)
  • धनश्री काडगांवकर / माधुरी पवार - नंदिता सूरज गायकवाड / नंदिता उत्तमराव जाधव (ताईसाहेब)
  • राज हंचनाळे - सूरज प्रतापराव गायकवाड (सन्नीदा)
    • सिद्धेश खुपरकर - लहान सूरज
  • छाया सागांवकर - गोदावरी (गोदाक्का)
  • मिलिंद दास्ताणे - प्रतापराव गायकवाड (आबा)
  • अमोल नाईक - बरकत
  • दीप्ती सोनावणे - चंदा
  • श्रुती कुलकर्णी - रेणुका
  • प्रफुल्ल (पप्पू) गवस - महाजन
  • वाग्मी शेवाडे - राजलक्ष्मी रणविजय गायकवाड (लक्ष्मी)
  • श्रेयस मोहिते - युवराज सूरज गायकवाड
  • राजवीरसिंह राजे - लाडू
  • शिवराज वाळवेकर / बाळकृष्ण शिंदे - संग्राम मोहिते
  • अवधूत जोशी - अवधूत
  • अभिषेक कुलकर्णी - परेश पाटील (पप्या)
  • योगेशकुमार पवार - बंड्या
  • संजीवकुमार पाटील - निवृत्ती नाईक
  • संध्या माणिक - माधुरी जावळे / माधुरी सूरज गायकवाड
  • नेहा बाम - नंदिताची आई
  • श्रीराम कोल्हटकर - बलसारा
  • विकास पाटील - आदित्य गोरे
  • ऋचा आपटे - सखी
  • अतुल पाटील - भाल्या
  • श्वेता कुलकर्णी - भाल्याची बायको
  • अतुल सनस - जयंत
  • प्राची गोडबोले - अंजलीची आई
  • कल्याणी जाधव - राधा
  • उमेश बोळके - रेणुकाचे बाबा

नव्या वेळेत

संपादन
क्र. दिनांक वार वेळ
३ ऑक्टोबर २०१६ – १९ ऑक्टोबर २०१९ सोम-शनि
(कधीतरी रवि)
संध्या. ७.३०
२१ ऑक्टोबर २०१९ – २७ मार्च २०२० संध्या. ६.३०
१३ जुलै - ३१ ऑक्टोबर २०२० संध्या. ७.३०
१ नोव्हेंबर २०२० - २ जानेवारी २०२१ संध्या. ६.३०

नवीन वळण

संपादन
  1. २२ जून २०१९ (२ वर्षांनंतर)
  2. २७ ऑक्टोबर २०१९ (६ वर्षांनंतर)
  3. १७ ऑगस्ट २०२० (६ महिन्यांनंतर)

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तमिळ रेक्का कट्टी परकडूधू मनसु झी तमिळ १९ जून २०१७ - २४ मे २०१९
कन्नड जोडी हक्की झी कन्नडा १३ मार्च २०१७ - ५ जुलै २०१९
मल्याळम अलियायंबल झी केरळम २६ नोव्हेंबर २०१८ - ९ नोव्हेंबर २०१९
पंजाबी छोटी जेठानी झी पंजाबी १४ जून २०२१ - ११ नोव्हेंबर २०२२

पुरस्कार

संपादन
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार
वर्ष श्रेणी प्राप्तकर्ता भूमिका
२०१७ सर्वोत्कृष्ट कुटुंब गायकवाड कुटुंब
सर्वोत्कृष्ट मालिका
सर्वोत्कृष्ट नायक हार्दिक जोशी राणा
सर्वोत्कृष्ट सून अक्षया देवधर अंजली
सर्वोत्कृष्ट आई छाया सागांवकर गोदाक्का
सर्वोत्कृष्ट सासरे मिलिंद दास्ताणे प्रताप
२०१८ सर्वोत्कृष्ट बालकलाकार राजवीरसिंह राजे लाडू
सर्वोत्कृष्ट सून अक्षया देवधर अंजली
सर्वोत्कृष्ट जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर राणा-अंजली
सर्वोत्कृष्ट खलनायिका धनश्री काडगांवकर नंदिता
सर्वोत्कृष्ट भावंडं हार्दिक जोशी-राज हंचनाळे राणा-सूरज
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष अमोल नाईक बरकत
२०१९ सर्वोत्कृष्ट बालकलाकार राजवीरसिंह राजे लाडू

विशेष भाग

संपादन
  1. ब्रह्मचारी राणाला घ्यावी लागणार अंजलीबाईंची भेट. (३ ऑक्टोबर २०१६)
  2. अंजलीकडून साखळी मिळवण्याच्या राणाच्या भाबड्या प्रयत्नांना मिळेल का यश? (५ ऑक्टोबर २०१६)
  3. सच्चा पैलवान राणाच्या भेटीसाठी अंजली पोहोचली तालमीत. (७ ऑक्टोबर २०१६)
  4. राणा-अंजलीमधला साखळीचा गुंता वाढणार की सुटणार? (१० ऑक्टोबर २०१६)
  5. अंजलीपासून दूर पळणाऱ्या राणाची पुन्हा होणार तिच्याशीच भेट. (१२ ऑक्टोबर २०१६)
  6. राणाच्या शेतावर भरणार अंजलीबाईंची शाळा! (१४ ऑक्टोबर २०१६)
  7. राणाविषयी अंजलीच्या मनातील गैरसमज दूर होईल? (१७ ऑक्टोबर २०१६)
  8. अंजलीचा गैरसमज दूर करूनही राणाच्या मनात हूरहूर. (१९ ऑक्टोबर २०१६)
  9. राणा-अंजलीला जोडणार कोणती नवी साखळी? (२१ ऑक्टोबर २०१६)
  10. अंजलीने मागितलेल्या हमीपत्रासाठी राणा बनला पोस्टमन. (२४ ऑक्टोबर २०१६)
  11. अंजली शेतावर आल्याने राणाची उडणार भंबेरी. (२६ ऑक्टोबर २०१६)
  12. नको म्हणतानाही राणा-अंजलीची भेट ठरलेलीच! (२८ ऑक्टोबर २०१६)
  13. राणा अंजलीला ब्रेसलेट परत करणार का? (३१ ऑक्टोबर २०१६)
  14. ब्रेसलेट परत केल्यानंतरही होऊ शकेल का राणा-अंजलीची भेट? (२ नोव्हेंबर २०१६)
  15. अंजली स्वीकारणार का राणाची माफी? (५ नोव्हेंबर २०१६)
  16. अंजलीचं ब्रेसलेट परत करून राणा मारणार का मैदान? (७ नोव्हेंबर २०१६)
  17. अखेरीस राणाला लक्षात येणार अंजलीच्या माफीचं कारण. (९ नोव्हेंबर २०१६)
  18. अंजलीच्या माफीचं कारण उमजून राणा देणार शक्तिपरीक्षा. (११ नोव्हेंबर २०१६)
  19. पाठकबाई होणार राणाची पहिली मैत्रीण! (१४ नोव्हेंबर २०१६)
  20. वहिनींची नजर चुकवून राणा जाणार का पाठकबाईंच्या घरी? (१६ नोव्हेंबर २०१६)
  21. पाठकबाईंच्या घरी पाहुणचाराला राणाची हजेरी! (१८ नोव्हेंबर २०१६)
  22. राणाला मिळेल का रुसलेल्या अंजलीला मनवण्याचा उपाय? (२१ नोव्हेंबर २०१६)
  23. राणा-अंजलीच्या मैत्रीची गोड सुरुवात! (२३ नोव्हेंबर २०१६)
  24. सुरू होणार राणा-अंजलीच्या रोजच्या भेटीचा लपंडाव. (२५ नोव्हेंबर २०१६)
  25. चुकामुकीनंतर कशी होणार राणा-अंजलीची भेट? (२८ नोव्हेंबर २०१६)
  26. राणाला उमगणार पाठकबाईंशी फोनवर बोलण्यातली गंमत. (१ डिसेंबर २०१६)
  27. शाळेपासून दूर पळणारा राणा करणार परीक्षेची तयारी. (५ डिसेंबर २०१६)
  28. परीक्षक बनलेल्या राणाचीच होणार अंजलीबाईंसमोर परीक्षा. (८ डिसेंबर २०१६)
  29. राणा-अंजलीला लागणार पुन्हा भेटीची हुरहूर! (१२ डिसेंबर २०१६)
  30. चहा आणि बरंच काही! कटिंग चहासोबत रंगणार राणा-अंजलीच्या गप्पा‌. (१५ डिसेंबर २०१६)
  31. आपल्या माणसांना वेळ देण्याचं गणित कसं सांभाळणार राणा? (१९ डिसेंबर २०१६)
  32. वेळ देण्याच्या कात्रीत सापडलेला राणा अंजलीच्या भेटीची वेळ साधणार? (२२ डिसेंबर २०१६)
  33. अंजलीला होणार राणावरच्या प्रेमाची जाणीव! (२५ डिसेंबर २०१६)
  34. मनाच्या गोड इशाऱ्याचा अर्थ राणाला उमगेल का? (२६ डिसेंबर २०१६)
  35. राणाविषयी वाटणाऱ्या प्रेमाबद्दल अंजलीच्या मनाला पटणार खात्री. (२९ डिसेंबर २०१६)
  36. अंजलीच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी राणाची खटपट. (२ जानेवारी २०१७)
  37. डायरीच्या रूपात अंजली देणार राणाच्या प्रश्नांचं उत्तर. (५ जानेवारी २०१७)
  38. डायरीत दडलेलं उत्तर राणा वाचू शकणार? (९ जानेवारी २०१७)
  39. राणाकडून अंजलीची डायरी मिळवण्यात नंदिताला येणार का यश? (११ जानेवारी २०१७)
  40. डायरीमुळे झालेला राणाचा गैरसमज अंजली कसा दूर करणार? (१३ जानेवारी २०१७)
  41. जुन्या मित्राच्या भेटीने बदलणार का राणा-अंजलीच्या मैत्रीचं नातं? (१६ जानेवारी २०१७)
  42. राणाला कळणार का अंजलीने दिलेले प्रेमाचे संकेत? (१८ जानेवारी २०१७)
  43. अंजलीला घडणार राणाच्या नजरेतून गायकवाडांच्या वाड्याचे दर्शन. (२० जानेवारी २०१७)
  44. राणाच्या मनधरणीसाठी अंजलीचा खास बेत. (२३ जानेवारी २०१७)
  45. राणा अंजलीला देणार प्रेमाची पहिली भेट. (२५ जानेवारी २०१७)
  46. राणाच्या साधेपणाचा कल्पेश घेणार गैरफायदा. (२७ जानेवारी २०१७)
  47. जॉलीच्या मदतीने राणा करणार अंजलीसमोर प्रेम व्यक्त. (३० जानेवारी २०१७)
  48. जॉली राणाला करून देणार अंजलीबद्दलच्या प्रेमाची जाणीव. (१ फेब्रुवारी २०१७)
  49. राणा अंजलीला देणार लग्नाच्या प्रेमाची कबुली. (३ फेब्रुवारी २०१७)
  50. लग्नासाठी नाही म्हणणारा राणा होणार बोहल्यावर चढायला तयार. (६ फेब्रुवारी २०१७)
  51. रीतसर मागणीसाठी राणा अंजलीकडे पाठवणार लग्नाचा अर्ज. (८ फेब्रुवारी २०१७)
  52. अंजलीसोबत लग्नासाठी राणा कशी करणार होणाऱ्या सासूबाईंची मनधरणी? (१० फेब्रुवारी २०१७)
  53. राणा-अंजलीच्या लग्नासाठी मिळणार आईचा होकार. (१३ फेब्रुवारी २०१७)
  54. राणाच्या लग्नासाठी वाड्यावर जमले इरसाल वऱ्हाडी! (१६ फेब्रुवारी २०१७)
  55. होणार राणा-अंजलीच्या लग्नाच्या प्रेमाची सुरुवात. (२० फेब्रुवारी २०१७)
  56. सुपारी फुटणार अन् राणादाची नवरी नटणार! (२३ फेब्रुवारी २०१७)
  57. राणा-अंजलीच्या लग्नाची लागणार गावाला खबर. (२७ फेब्रुवारी २०१७)
  58. राणादा आणि अंजलीबाईंची सुरू झाली लगीनघाई! (२ मार्च २०१७)
  59. राणादा आणि अंजलीबाईंच्या लग्नाला यायला लागतंय, चालतंय की! (५ मार्च २०१७)
  60. अंजलीसोबत राणा करणार सुखी संसाराचा श्रीगणेशा. (६ मार्च २०१७)
  61. अंजलीच्या साथीने राणा गिरवणार संसाराची बाराखडी‌. (९ मार्च २०१७)
  62. खुलतंय राणा-अंजलीच्या लग्नाचं प्रेम! (१३ मार्च २०१७)
  63. मैत्री आणि लग्नाच्या प्रेमाने खुलणार राणा-अंजलीचा संसार. (१६ मार्च २०१७)
  64. घरच्यांनी राणाला न भेटण्याचं प्रतापरावांचं फर्मान पाळलं जाणार का? (२० मार्च २०१७)
  65. अंजली आबांना देणार राणासोबत गृहप्रवेशाचं वचन. (२३ मार्च २०१७)
  66. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राणा-अंजली करणार वाड्यात गृहप्रवेश. (२७ मार्च २०१७)
  67. अंजलीच्या येण्याने गायकवाडांच्या वाड्याला येणार घरपण. (३० मार्च २०१७)
  68. हनिमूनच्या नावाने उडणार राणादाची भंबेरी. (३ एप्रिल २०१७)
  69. अंजलीला कळणार राणा निरक्षर असल्याचं सत्य. (७ एप्रिल २०१७)
  70. रुसवा घालवून राणा आणणार अंजलीच्या चेहऱ्यावर हसू. (१२ एप्रिल २०१७)
  71. नव्याने खुलणार राणा-अंजलीचं लग्नाचं प्रेम. (१७ एप्रिल २०१७)
  72. अंजलीला मदत करण्यासाठी राणाचे भाबडे प्रयत्न. (२१ एप्रिल २०१७)
  73. राणाच्या मदतीत दडलेल्या प्रेमाने खुलणार अंजलीची कळी‌. (२६ एप्रिल २०१७)
  74. अंजली राणाला शिकवतेय सुखी संसाराचा धडा. (१ मे २०१७)
  75. अक्षरओळख नसलेला राणा आणणार अंजलीसाठी पुस्तकांची भेट. (५ मे २०१७)
  76. अंजलीच्या रूपात हरवणाऱ्या राणाला आवडू लागलंय लग्नाचं प्रेम. (८ मे २०१७)
  77. पुस्तकांत रमणाऱ्या अंजलीमध्ये हरवणार राणा. (१२ मे २०१७)
  78. अंजलीला आवडतंय राणाला लागलेली लग्नाच्या प्रेमाची ओढ‌. (१५ मे २०१७)
  79. अंजलीची परसबाग खुलवायला राणा लावणार पारिजातकाचं झाड. (१९ मे २०१७)
  80. अंजलीने घेतलाय राणाच्या शिक्षणाचा ध्यास. (२२ मे २०१७)
  81. राणा-अंजलीमध्ये लागलेल्या अतरंगी पैजेने होणार लग्नाच्या प्रेमाची सुरुवात. (२६ मे २०१७)
  82. भक्तिमार्गातून अंजली राणाला घेऊन येणार शिक्षणाच्या मार्गावर. (२९ मे २०१७)
  83. अंजलीसमोर उलगडणार राणाच्या बालपणाची गोष्ट. (१ जून २०१७)
  84. अंजलीच्या व्रताला राणाची साथ, साजरी होणार अंजलीची वटपौर्णिमा. (५ जून २०१७)
  85. लग्नाच्या प्रेमात आता राणाचाही पुढाकार, अंजलीसमोर येणार राणाचं नवं रुप. (९ जून २०१७)
  86. भांडण मिटवण्याच्या राणाच्या गोड प्रयत्नांनी खुलणार अंजलीची कळी. (१४ जून २०१७)
  87. अंजली पडणार बदललेल्या राणाच्या रूपाच्या प्रेमात. (१९ जून २०१७)
  88. अंजलीसोबतच्या नात्याला राणा देणार नवं वळण. (२३ जून २०१७)
  89. आषाढी एकादशीला राणा-अंजली गोदाक्काला घडवणार माऊलीचं दर्शन. (२८ जून २०१७)
  90. राणाच्या साथीने अंजली गिरवणार शेतीचे धडे. (३ जुलै २०१७)
  91. राणा अंजलीला देणार अस्सल कोल्हापुरी भेट. (७ जुलै २०१७)
  92. राणासोबत आता अंजलीबाईसुद्धा बनणार शेतकरी. (१२ जुलै २०१७)
  93. राणा-अंजली होऊ देणार का घराच्या वाटण्या? (१७ जुलै २०१७)
  94. डब्ब्यातल्या चिठ्ठीतून पोहोचणार प्रेमाचा निरोप! (२१ जुलै २०१७)
  95. ओलांडून मीच मला झुले उंच माझा झोका, अंजलीच्या इच्छेखातर राणा बांधणार झोका. (२६ जुलै २०१७)
  96. पंचगंगा नदीला चिरेबंदी घाट, अंजलीबाईंच्या मंगळागौरीचा निराळा थाट. (३१ जुलै २०१७)
  97. नंदिताच्या थोरलेपणाच्या हट्टामुळे येईल का राणा-अंजलीमध्ये दुरावा? (४ ऑगस्ट २०१७)
  98. अंजलीच्या दागिन्यांची चोरी करण्यात नंदिताला येईल का यश? (९ ऑगस्ट २०१७)
  99. राणाच्या भोळेपणाचा फायदा घेणाऱ्या नंदिताला अंजली विचारणार जाब. (१४ ऑगस्ट २०१७)
  100. अंजली नंदिताला गायकवाडांच्या घरी परत आणणार का? (१८ ऑगस्ट २०१७)
  101. राणा-अंजलीच्या पुढाकाराने गावकरी साजरा करणार इकोफ्रेंडली गणेशोत्सव. (२३ ऑगस्ट २०१७)
  102. गायकवाडांच्या वाड्यात रंगणार मोदक खाण्याची स्पर्धा. (२८ ऑगस्ट २०१७)
  103. राणाच्या इच्छेखातर अंजली पेलणार मोटारसायकल चालवण्याचं आव्हान. (१ सप्टेंबर २०१७)
  104. अंजली निघाली जर्मनीला, चैन पडेना राणाला. (६ सप्टेंबर २०१७)
  105. राणाला लागला इंग्रजी शिकण्याचा ध्यास. (११ सप्टेंबर २०१७)
  106. इंग्रजी शिकण्यासाठी राणा करणार अजब प्रयत्न. (१५ सप्टेंबर २०१७)
  107. राणाच्या टाइमटेबलमध्ये मिळू शकेल का अंजलीसाठीचा वेळ? (२० सप्टेंबर २०१७)
  108. अंजली घेणार राणाचा इंग्रजीचा क्लास. (२५ सप्टेंबर २०१७)
  109. अंजली-राणाचं नातं पार करणार प्रेमाची आणखी एक कसोटी. (२८ सप्टेंबर २०१७)
  110. घरच्यांनी लपवलेलं सत्य अखेर राणाला कळणार. (२६ नोव्हेंबर २०१७)
  111. मॅनेजरच्या येण्याने होणार का राणाचं आयुष्य मॅनेज? नव्या भेटीगाठी घेऊन येणार नवं आव्हान. (२२ जुलै २०१८)
  112. मुंबईच्या वेगाला भोळाभाबडा राणा सामोरा जाऊ शकेल का? (१९ ऑगस्ट २०१८)
  113. मैदान गाजवितो माऊ आणि काकाबोकाचा पठ्ठ्या! (२९ ऑक्टोबर २०१८)
  114. कोण देणार बालकेसरी लाडू पैलवानला आव्हान? (३१ ऑक्टोबर २०१८)
  115. ऐका हो ऐका... कोल्हापुरात लागलंय कुस्त्यांचं जंगी मैदान, बालकेसरी लाडूला भिडणार पैलवान तारा, तवा मंडळी यायला लागतंय! (२ नोव्हेंबर २०१८)
  116. शपथ आहे प्रेमाची राणादाच्या विजयाची! अंजलीबाईंच्या प्रेमाखातर राणादा लढणार इंटरनॅशनल कुस्ती लीग, राणा विरुद्ध टटांकाची फायनल लढत. (२५ नोव्हेंबर २०१८)
  117. अंजलीच्या निर्णयाने कापली जाणार का नंदिताच्या उमेदवारीची पतंग? (१९ डिसेंबर २०१८)
  118. नंदिताच्या खेळीमुळे निवडणुकांच्या मैदानात राणा-अंजली आमनेसामने. (२२ डिसेंबर २०१८)
  119. घरात प्रेम घराबाहेर विरोधक, राणा-अंजलीमध्ये ठरतोय प्रेमळ करार. (२६ डिसेंबर २०१८)
  120. आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाने खचलेल्या अंजलीला राणा देणार उमेद. (२९ डिसेंबर २०१८)
  121. दारुबंदी प्रकरणातल्या आरोपांमुळे अंजली घेणार का माघार? (२ जानेवारी २०१९)
  122. निवडणुकीच्या रणधुमाळीतही खुलतंय राणा-अंजलीचं प्रेम. (६ जानेवारी २०१९)
  123. आता राणादा आणि अंजलीबाई भेटणार एक तास आधी. (२१ ऑक्टोबर २०१९)
  124. गायकवाडांच्या वाड्याला मिळणार का नव्या धाकट्या सूनबाई? (२७ ऑक्टोबर २०१९)
  125. धाकट्या सूनबाई होण्यासाठी माधुरी जिंकेल का गायकवाडांची मनं? (१५ डिसेंबर २०१९)
  126. विश्वासाच्या कसोटीवर पणाला लागणार राणा-अंजलीचं नातं. (१३ जुलै २०२०)
  127. शत्रूपर्यंत पोहोचण्याच्या राणाच्या प्रयत्नांत अंजलीच ठरतेय अडसर. (१८ जुलै २०२०)
  128. राणाशिवाय अंजली एकटीनेच उचलणार घर आणि शेताची जबाबदारी. (२३ जुलै २०२०)
  129. राणाचा शेतात काम करण्याचा हट्ट आणेल का त्याला अडचणीत? (२८ जुलै २०२०)
  130. अंजलीच देणार का राणाला दगा? (१ ऑगस्ट २०२०)
  131. मामांच्या भूलथापांनी डळमळणार अंजलीचा राणावरचा विश्वास. (६ ऑगस्ट २०२०)
  132. अंजलीची प्रेमाची हाक आणणार राणाला धोक्यात. (१० ऑगस्ट २०२०)
  133. जिजाच्या ठसक्याने होणार राणाची बोलती बंद. (१५ ऑगस्ट २०२०)
  134. जिजाचा गायकवाडांच्या वाड्यात धमाल धुमाकूळ. (१७ ऑगस्ट २०२०)
  135. घरी बाप्पाच्या स्वागतासोबत राणाला करावं लागणार जिजाचं स्वागत. (२७ ऑक्टोबर २०२०)
  136. जवा येतील आमनेसामने नंदिता-जिजा, तवा कडाडतील कडकड विजा. (१ नोव्हेंबर २०२०)

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ४० २०१६ ३.२
आठवडा ४१ २०१६ २.७
आठवडा ४२ २०१६ २.४ []
आठवडा ४३ २०१६ २.६
आठवडा ४४ २०१६ २.३
आठवडा ४७ २०१६ २.८ []
आठवडा ५२ २०१६ ३.९
२५ डिसेंबर २०१६ एक तास २.९
आठवडा १ २०१७ ३.१
आठवडा ५ २०१७ ४.२
आठवडा ६ २०१७ ४.५
आठवडा ७ २०१७ ४.१
आठवडा ८ २०१७ ५.२
आठवडा ९ २०१७ ५.२
आठवडा १० २०१७ ६.३
५ मार्च २०१७ दोन तास ५.८
आठवडा ११ २०१७ ५.८
आठवडा १२ २०१७ ५.३ []
आठवडा १३ २०१७ ५.६
आठवडा १४ २०१७ ५.५
आठवडा १५ २०१७ ५.६ []
आठवडा १७ २०१७ ५.१ []
आठवडा २३ २०१७ ३.९ []
आठवडा २६ २०१७ ५.१
आठवडा २७ २०१७ ५.५ []
आठवडा २८ २०१७ ५.२
आठवडा ३० २०१७ ५.२
आठवडा ३१ २०१७ ५.७ []
आठवडा ३२ २०१७ ६.०
आठवडा ३३ २०१७ ६.२
आठवडा ३४ २०१७ ६.२
आठवडा ३५ २०१७ ५.८
आठवडा ३६ २०१७ ६.२
आठवडा ३७ २०१७ ५.९ []
आठवडा ३८ २०१७ ६.१
आठवडा ३९ २०१७ ५.१
आठवडा ४० २०१७ ५.२
आठवडा ४१ २०१७ ५.८
आठवडा ४२ २०१७ ५.७
आठवडा ४३ २०१७ ५.७
आठवडा ४४ २०१७ ५.६
आठवडा ४५ २०१७ ६.०
आठवडा ४६ २०१७ ६.४
आठवडा ४७ २०१७ ६.५
आठवडा ४८ २०१७ ७.२
२६ नोव्हेंबर २०१७ एक तास ५.०
आठवडा ४९ २०१७ ७.१ [१०]
आठवडा ५० २०१७ ६.७
आठवडा ५१ २०१७ ६.२
आठवडा ५२ २०१७ ६.७
आठवडा १ २०१८ ६.६
आठवडा २ २०१८ ६.४
आठवडा ३ २०१८ ५.८
आठवडा ४ २०१८ ६.८
आठवडा ५ २०१८ ७.०
आठवडा ६ २०१८ ६.६
आठवडा ७ २०१८ ६.३
आठवडा ८ २०१८ ६.४
आठवडा ९ २०१८ ५.६
आठवडा १० २०१८ ५.८
आठवडा ११ २०१८ ५.७
आठवडा १३ २०१८ ५.८
आठवडा १४ २०१८ ६.१
आठवडा १५ २०१८ ५.७ [११]
आठवडा १६ २०१८ ६.७
आठवडा १७ २०१८ ७.३
आठवडा १८ २०१८ ६.७
आठवडा १९ २०१८ ६.१ [१२]
आठवडा २१ २०१८ ६.४
आठवडा २२ २०१८ ७.०
आठवडा २३ २०१८ ६.५
आठवडा २४ २०१८ ६.२
आठवडा २५ २०१८ ३.९
आठवडा २६ २०१८ ५.९
आठवडा २७ २०१८ ५.७
आठवडा ३० २०१८ ४.९
आठवडा ३१ २०१८ ४.४
आठवडा ३२ २०१८ ३.५
आठवडा ३३ २०१८ ४.९
आठवडा ३४ २०१८ ६.१ [१३]
आठवडा ३५ २०१८ ५.२ [१४]
आठवडा ३६ २०१८ ५.९
आठवडा ३७ २०१८ ५.३ [१५]
आठवडा ३८ २०१८ ५.४ [१६]
आठवडा ३९ २०१८ ४.९
आठवडा ४० २०१८ ५.० [१७]
आठवडा ४१ २०१८ ४.८ [१८]
आठवडा ४२ २०१८ ४.४ [१९]
आठवडा ४३ २०१८ ५.१ [२०]
आठवडा ४४ २०१८ ५.४ [२१]
आठवडा ४५ २०१८ ४.८ [२२]
आठवडा ४६ २०१८ ५.७ [२३]
आठवडा ४७ २०१८ ५.६ [२४]
आठवडा ४८ २०१८ ५.४ [२५]
आठवडा ४९ २०१८ ५.५ [२६]
आठवडा ५० २०१८ ५.४ [२७]
आठवडा ५१ २०१८ ५.५ [२८]
आठवडा ५२ २०१८ ४.८ [२९][३०]
आठवडा १ २०१९ ५.५ [३१]
आठवडा २ २०१९ ५.५ [३२]
आठवडा ३ २०१९ ५.८ [३३]
आठवडा ४ २०१९ ५.६ [३४]
आठवडा ५ २०१९ ५.६ [३५]
आठवडा १३ २०१९ ४.०
आठवडा १४ २०१९ ४.० [३६]
आठवडा १५ २०१९ ४.१
आठवडा १६ २०१९ ३.९ [३७]
आठवडा १७ २०१९ ३.८ [३८]
आठवडा १८ २०१९ ३.८
आठवडा १९ २०१९ ३.७
आठवडा २० २०१९ ३.९
आठवडा २१ २०१९ ३.५ [३९]
आठवडा २२ २०१९ ३.९
आठवडा २३ २०१९ ३.८ [४०]
आठवडा २४ २०१९ ३.६
आठवडा २५ २०१९ ४.४ [४१]
आठवडा २६ २०१९ ५.५ [४२]
आठवडा २७ २०१९ ६.५ [४३]
आठवडा २८ २०१९ ६.७ [४४][४५]
आठवडा २९ २०१९ ६.५ [४६]
आठवडा ३० २०१९ ६.८ [४७][४८]
आठवडा ३१ २०१९ ६.७ [४९]
आठवडा ३२ २०१९ ६.८ [५०]
आठवडा ३३ २०१९ ६.७
आठवडा ३४ २०१९ ६.९ [५१]
आठवडा ३५ २०१९ ७.१ [५२]
आठवडा ३६ २०१९ ६.२ [५३]
आठवडा ३७ २०१९ ७.० [५४]
आठवडा ३८ २०१९ ६.९ [५५]
आठवडा ३९ २०१९ ७.० [५६]
आठवडा ४० २०१९ ६.३
आठवडा ४१ २०१९ ६.४
आठवडा ४२ २०१९ ७.३
आठवडा ४४ २०१९ ३.८
आठवडा ४५ २०१९ ४.६
आठवडा ४६ २०१९ ३.९
आठवडा ४७ २०१९ ३.९
आठवडा ४९ २०१९ ३.५
आठवडा ५० २०१९ ३.१ [५७]
आठवडा ५२ २०१९ ३.० [५८]
आठवडा ३१ २०२० २.०
आठवडा ३६ २०२० ३.०

संदर्भ

संपादन
  1. ^ "या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिका". एबीपी माझा. 2021-08-23 रोजी पाहिले.
  2. ^ "टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका अव्वल". झी २४ तास. 2021-04-15 रोजी पाहिले.
  3. ^ "टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' अव्वल". झी २४ तास. 2021-04-15 रोजी पाहिले.
  4. ^ "'माझ्या नवऱ्याची बायको' पुन्हा अव्वल". झी २४ तास. 2021-04-15 रोजी पाहिले.
  5. ^ "'तुझ्यात जीव रंगला' टीआरपीमध्ये अव्वल". झी २४ तास. 2021-08-15 रोजी पाहिले.
  6. ^ "'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये अव्वल". झी २४ तास. 2021-04-15 रोजी पाहिले.
  7. ^ "जाणून घ्या कोणती मालिका टीआरपीत ठरतेय अव्वल". लोकसत्ता. 2021-08-30 रोजी पाहिले.
  8. ^ "टीआरपी: 'गाव गाता गजाली' टॉप ५ मध्ये". झी २४ तास. 2021-09-06 रोजी पाहिले.
  9. ^ "टीआरपीमध्ये माझ्या नवऱ्याची बायको पुन्हा अव्वल". झी २४ तास. 2021-04-15 रोजी पाहिले.
  10. ^ "Zee Marathi serials rule in 2017". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). 2021-04-08 रोजी पाहिले.
  11. ^ "'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये एक नंबर". झी २४ तास. 2021-04-15 रोजी पाहिले.
  12. ^ "टीआरपीमध्ये 'ही' मालिका नंबर वन". झी २४ तास. 2021-05-18 रोजी पाहिले.
  13. ^ "Mazhya Navryachi Bayko rules the TRP chart; Tula Pahate Re secures its position to the top five shows". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-08 रोजी पाहिले.
  14. ^ "Lagira Zhala Ji out of Top 5 list; Tula Pahate Re makes it to the Top 3". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-08 रोजी पाहिले.
  15. ^ "Team Tula Pahate Re celebrates after topping TRP charts; See pics". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-11 रोजी पाहिले.
  16. ^ "टीआरपीच्या रेसमध्ये तुला पाहते रे ही मालिका तिसऱ्या स्थानी, जाणून घ्या कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर". लोकमत. 2021-08-11 रोजी पाहिले.
  17. ^ "#TRP मीटर: 'माझ्या नवऱ्याची बायको' नंबर वनवर, नव्या शनायाची चालली जादू". न्यूझ१८ लोकमत. 2021-08-11 रोजी पाहिले.
  18. ^ "#TRP मीटर: यावेळी चालली नाही सुबोधची जादू, टीआरपीमध्ये मोठा बदल". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  19. ^ "#TRP मीटर: शनायापुढे इतर मालिकांची 'हवा' गेली!". न्यूझ१८ लोकमत. 2022-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  20. ^ "#TRP मीटर: 'शनाया'ची जादू झाली फिकी, विक्रांत सरंजामे ठरला वरचढ!". न्यूझ१८ लोकमत. 2021-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  21. ^ "#TRP मीटर: राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे". न्यूझ१८ लोकमत. 2022-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  22. ^ "#TRP मीटर: दिवाळीच्या आठवड्यात नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं". न्यूझ१८ लोकमत. 2021-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  23. ^ "#TRP मीटर: शनाया पुन्हा एकदा जिंकली, विक्रांत आला एक पाऊल मागे". न्यूझ१८ लोकमत. 2021-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  24. ^ "जाणून घ्या, कोणती मालिका ठरली 'नंबर वन'?". लोकसत्ता. 2021-04-07 रोजी पाहिले.
  25. ^ "#TRP मीटर: आदेश भाऊजींचं 'झिंगाट' झालं लोकप्रिय, 'हवा'चं भवितव्य धोक्यात". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  26. ^ "३०० कोटींची मालकीण राधिका विक्रांत सरंजामेवर पडली भारी!". लोकसत्ता. 2021-04-07 रोजी पाहिले.
  27. ^ "राधिका सुभेदारसमोर विक्रांत सरंजामेची फिल्मी स्टाइल पडली फिकी". लोकसत्ता. 2021-04-07 रोजी पाहिले.
  28. ^ "तुला पाहते रे घसरली तिसऱ्या क्रमांकावर, ही मालिका ठरली अव्वल". लोकमत. 2021-08-30 रोजी पाहिले.
  29. ^ "#TRP मीटर: 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेनं बदललं टीआरपीचं गणित". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  30. ^ "स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या फॅन्ससाठी खूशखबर, टीआरपी रेसमध्ये मालिका दुसऱ्या क्रमांकावर". लोकमत. 2021-12-01 रोजी पाहिले.
  31. ^ "नव्या वर्षातही 'राधिका' काही पहिला नंबर सोडेना!". लोकसत्ता. 2021-08-22 रोजी पाहिले.
  32. ^ "#TRP मीटर: शनायाच्या लग्नापेक्षा विक्रांत सरंजामेचं लग्न पडलं भारी, टीआरपीत वर्षातला सर्वात मोठा बदल". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-11 रोजी पाहिले.
  33. ^ "#TRP मीटर: ईशाच्या लग्नानंतर प्रेक्षकांनी मालिकेशी केला 'ब्रेकअप'". न्यूझ१८ लोकमत. 2021-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  34. ^ "#TRP मीटर: पाठकबाईंची निवडणूक भारी पडली ईशा-विक्रांतच्या संसारावर". न्यूझ१८ लोकमत. 2021-08-11 रोजी पाहिले.
  35. ^ "#TRP मीटर: भाऊजींचा 'झिंगाट' ठरला विक्रांत सरंजामेच्या वरचढ". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  36. ^ "स्वराज्यरक्षक संभाजी हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या पहिल्या नंबरवर कोण?". लोकमत. 2021-08-11 रोजी पाहिले.
  37. ^ "टीआरपी रँकिंगमध्ये झी मराठीवरील 'ही' मालिका अव्वल स्थानावर". न्यूझ१८ लोकमत. 2021-08-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-07-03 रोजी पाहिले.
  38. ^ "तुला पाहते रे टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या नंबरवर, जाणून घ्या कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर". लोकमत. 2021-08-30 रोजी पाहिले.
  39. ^ "#TRP मीटर: शेलिब्रिटी पॅटर्नची 'हवा' वाढली, तर शनायाचं स्थान धोक्यात". न्यूझ१८ लोकमत. 2021-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  40. ^ "ईशा-विक्रांतच्या भांडणात, संभाजी महाराजांनी मारली बाजी!". न्यूझ१८ लोकमत. 2021-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-03 रोजी पाहिले.
  41. ^ "#TRP मीटर: जाता जाता 'लागिरं झालं जी'नं मारली बाजी". न्यूझ१८ लोकमत. 2021-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-11 रोजी पाहिले.
  42. ^ "#TRP मीटर: गुरू-शनायाला कुणी दिला धक्का? 'ही' मालिका ठरली नंबर १". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-11 रोजी पाहिले.
  43. ^ "#TRP मीटर: राधिका शनायाच्या जुगलबंदीने सगळ्यांची गेली 'हवा', या आहेत टाॅप ५ मालिका". न्यूझ१८ लोकमत. 2021-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-03 रोजी पाहिले.
  44. ^ "#TRP मीटर: झी मराठीच्या वर्चस्वाला धक्का, कलर्स मराठीची 'ही' मालिका TOP 5 मध्ये". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-03 रोजी पाहिले.
  45. ^ "TRP च्या शर्यतीत टॉप ५ मध्ये झी मराठीचा रेकॉर्ड मोडत कलर्स मराठीची एन्ट्री". लोकमत. 2021-12-01 रोजी पाहिले.
  46. ^ "#TRP मीटर: प्रेक्षक म्हणताहेत राणादा 'तुझ्यात जीव रंगला', 'या' मालिकेनं गमावलं आपलं स्थान". न्यूझ१८ लोकमत. 2021-09-03 रोजी पाहिले.
  47. ^ "क्या बात है...! TRP च्या टॉप ५ मध्ये झाली झी मराठीच्या या मालिकेची एन्ट्री". लोकमत. 2021-12-01 रोजी पाहिले.
  48. ^ "#TRP मीटर: सासूबाई आल्या पहिल्या पाचात, पण नवऱ्याच्या बायकोचं काही खरं नाही!". न्यूझ१८ लोकमत. 2022-09-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  49. ^ "#TRP मीटर: सगळ्यांना जिरवत मिसेस मुख्यमंत्र्यांची एन्ट्री, 'या' मालिकेनं टिकवला नंबर १". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-22 रोजी पाहिले.
  50. ^ "#TRP मीटर: 'या' मालिकेची नव्यानं एंट्री, पाहा आठवड्यात कोण आहे टॉपवर". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  51. ^ "कोणत्या मराठी मालिकेची TRP सर्वात जास्त आहे?". Bio Marathi. 2021-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-08 रोजी पाहिले.
  52. ^ "#TRP मीटर: 'मिसेस मुख्यमंत्री'ची लोकप्रियता कायम, 'ही' मालिका अजूनही नंबर १". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  53. ^ "#TRP मीटर: प्रेक्षकांचा कौल कायम, 'या' मालिकेनं मारली बाजी". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  54. ^ "#TRP मीटर: प्रेक्षकांची पसंती कायम, तरीही 'या' मालिकेला मिळाली बढती". न्यूझ१८ लोकमत. 2021-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-03 रोजी पाहिले.
  55. ^ "#TRP मीटर: कशात रंगलाय प्रेक्षकांचा जीव? या आठवड्यातल्या टॉप ५ मालिका". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी पाहिले.
  56. ^ "टीआरपीच्या रेसमध्ये चला हवा येऊ द्या पाचव्या नंबरला, जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल". लोकमत. 2021-03-08 रोजी पाहिले.
  57. ^ "#TRP मीटर: टॉप ५ मध्ये पुन्हा एकदा झी मराठी, पाहा कोणती मालिका आहे नंबर वन!". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  58. ^ "#TRP मीटर: वर्षाच्या शेवटी 'सासूबाई' पडली 'बायको'वर भारी!". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
संध्या. ७.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | अवघाचि संसार | भाग्यलक्ष्मी | अरुंधती | दिल्या घरी तू सुखी राहा | राधा ही बावरी | जावई विकत घेणे आहे | असे हे कन्यादान | नांदा सौख्य भरे | तुझ्यात जीव रंगला | लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू | कारभारी लयभारी | पाहिले न मी तुला | मन उडू उडू झालं | तू चाल पुढं | सारं काही तिच्यासाठी | पारू
संध्या. ६.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | सावित्री | साडे माडे तीन | वारस | तुझ्यात जीव रंगला | माझ्या नवऱ्याची बायको | घेतला वसा टाकू नको | माझी तुझी रेशीमगाठ | ३६ गुणी जोडी | अप्पी आमची कलेक्टर | सारं काही तिच्यासाठी