तुला पाहते रे

मराठी मालिका

तुला पाहते रे ही मराठी भाषेतील दूरदर्शन मालिका आहे. ही मालिका झी मराठीवर प्रसारित झाली होती. मालिकेमधील मुख्य कलाकार सुबोध भावे, शिल्पा तुळसकर आणि गायत्री दातार आहेत. या मालिकेने टीआरपीमध्ये ११.०, ९.०, ८.३, ८.०, ७.९, ७.८ असे अनेक सर्वोच्च स्तर गाठले आहेत.

तुला पाहते रे
दिग्दर्शक गिरीश मोहिते
निर्मिती संस्था राईट क्लिक मीडिया सोल्युशन्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २९८
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १३ ऑगस्ट २०१८ – २० जुलै २०१९
अधिक माहिती
आधी माझ्या नवऱ्याची बायको
नंतर स्वराज्यरक्षक संभाजी

कथानक

संपादन

विक्रांत सरंजामे (सुबोध भावे) नावाचा एक श्रीमंत विधूर असतो जो "सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज" ह्या कंपनीचा बिझनेसमन असतो. तो आपली विधवा आई स्नेहलता सरंजामे ऊर्फ आईसाहेब (विद्या करंजीकर), धाकटा भाऊ जयदीप (आशुतोष गोखले) व वहिनी सोनिया (पूर्णिमा डे) ह्यांच्या बरोबर कर्जत मधल्या एका मोठ्या बंगल्यात राहतो. एके दिवशी, एका कॉलेज मध्ये एक फंक्शन होणार असतं ज्यात विक्रांत चीफ गेस्ट असतो. तिकडे जाताना वाटेत त्याच्या सायकलचा टायर पंक्चर झाल्यामुळे तो ईशा निमकर (गायत्री दातार) नावाच्या मुलीसोबत रिक्षा शेअर करतो. ईशा आपल्या आईवडिलांसोबत एका चाळीत राहणारी माध्यमवर्गीय मुलगी असते. ती त्याच कॉलेजमधली विद्यार्थी असते जिला विक्रांतबद्दल भाषण द्यायचं असतं. रिक्षात ती विक्रांतला न ओळखल्यामुळे त्याला वाट्टेल ते बोलते. कॉलेजमध्ये जेव्हा तो चीफ गेस्ट म्हणुन येतो तेव्हा तिला मोठा धक्का बसतो व ती आपलं भाषण विसरते. परंतु, विक्रांत तिचा मान राखतो व तिला एक ब्लँक चेक देऊन तिचा विश्वास मिळवतो.

पुढे, विक्रांत ईशाच्या प्रेमात पडतो व तिला आपल्या कंपनीत नोकरी देतो. जसा वेळ निघून जातो, ईशा पण विक्रांतच्या प्रेमात पडते तेव्हाच विक्रांतचा जवळचा मित्र विलास झेंडे (उमेश जगताप) व सेक्रेटरी मायरा कारखानीस (अभिज्ञा भावे) त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतात कारण मायरा हिचं सुद्धा विक्रांतवर प्रेम आहे. तथापि, विक्रांत ईशाला आपली प्रथम पत्नी राजनंदिनी हिच्याबद्दलचा सगळा भूतकाळ सांगतो, व तिला हेलिकॉप्टर मधून लग्नाची मागणी घालतो. प्रभावित होऊन ईशा विक्रांतच्या भावना स्विकारते. शेवटी, विक्रांत आणि ईशा कसातरी सगळ्यांना पटवतात व लग्न करतात.

त्यांच्या लग्नानंतर, गोष्टी हळूहळू बदलायला लागतात जेव्हा विक्रांत व झेंडे ह्यांची काळी बाजू समोर येते. असं अचानकपणे प्रकट होतं की विक्रांतचे वडील दादासाहेब ह्यांनी आपल्या विलमध्ये एक असा क्लॉज टाकला होता की विक्रांत सरंजामे प्रॉपर्टीचा कधीच मालक होऊ शकत नाही, आणि राजनंदिनीच त्याची खरी मालकीण आहे. त्यामुळे, विक्रांतनं ईशाशी ह्यासाठी लग्न केलं की तो तिला प्यादं म्हणून वापरून आईसाहेब व जयदीप, ज्यांच्या नावावर साध्या प्रॉपर्टी आहे, ती तो त्यांच्याकडून सहज मिळवू शकेल. त्याच्या योजनेनुसार, विक्रांत झेंडेसोबत असं भासवायचा प्रयत्न करतो की ईशा ही राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे, म्हणजे आईसाहेब व जयदीप सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करतील.

काही दिवसांनंतर, गोष्टी आजून बदलतात जेव्हा सरंजामे कंपनीत होणारा फ्रॉड बाहेर येतो व ईशाला एका कर्मचाऱ्याकडून असा एस.एम.एस. येतो की फ्रॉड करणाऱ्या माणसाचं नाव "गजेंद्र पाटील" आहे. विक्रांत व झेंडे ह्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते अज्ञात कारणांसाठी एका खोट्या गुन्हेगाराला ईशासमोर आणतात आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देत तिला सांगतात की तोच फ्रॉड करणारा "गजेंद्र पाटील" आहे. तथापि, ईशाला संशय यायला लागतो जेव्हा आईसाहेबांना फ्रॉड करणाऱ्या माणसाचं नाव गजेंद्र पाटील आहे हे ऐकून चक्कर येते.

त्यानंतर, ईशा विक्रांतचं नाव व्होटिंग लिस्टमध्ये घालण्यासाठी जेव्हा तिथल्या ऑफिसमध्ये जाते तेव्हा तिला हे बघून धक्का बसतो की व्होटिंग लिस्टमध्ये विक्रांतचा फोटोअसून त्याच्या बाजूला "गजेंद्र पाटील" हे नाव आहे. विक्रांतचा जुना शत्रू जालिंदर माने (संदेश जाधव) सुद्धा विक्रांतचं खरं नाव व हेतू ह्यांची ईशाला कबुली देतो. त्याचवेळेला, हे देखील ईशासमोर येतं की राजनंदिनी ही आईसाहेबांची सावत्र मुलगी व जयदीपची मोठी सावत्र बहीण होती. जेव्हा ती देवीकडे उत्तर शोधण्यासाठी मदत मागते, तिला परातीतल्या पाण्यात एका अनोळखी तरुण बाईच्या चेहरा दिसतो ज्यानी तिला धक्काच बसतो.

शेवटी, फार त्रासलेली ईशा विक्रांतला हे सगळं तिच्यापासून लपवल्यामुळे सुनावते, जेव्हा तो तिचा विश्वास परत मिळवण्यासाठी तिला भूतकाळातील राजनंदिनीबद्दलची खोटी गोष्ट सांगतो. पुढे, तो तिला सरंजामे घरातील एका बंद खोलीत नेतो जिथे राजनंदिनी हिचा फोटो असतो. तो फोटो बघतात ईशाला आठवतं की जो चेहरा तिला परातीतल्या पाण्यात दिसला होता ती राजनंदिनीच होती, जशी ती त्या धक्क्यामुळे त्या खोलीत बेशुद्ध पडते. आपल्या बेशुद्धीत ईशाला चमत्कारिकपणे राजनंदिनीचं सगळं आयुष्य स्वप्नात दिसतं.

फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की गजेंद्र (विक्रांत) व झेंडे चाळीत राहणारे अनाथ मित्र असतात. एके दिवशी, गजेंद्र जालिंदरच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जात असतो जेव्हा तो आपली रिक्षा राजनंदिनी सोबत शेअर करतो, जशी तिला सुद्धा त्याच ऑफिसमध्ये मीटिंग असते. पैशांमुळे गजेंद्र राजनंदिनीच्या प्रेमात पडतो व तिच्या विश्वास जिंकण्यासाठी जालिंदरच्या कंपनीत एक खोटा फ्रॉड उघडकीस करतो. राजनंदिनी ही हळूहळू त्याच्या प्रेमात पडायला लागते व गजेंद्र शेवटी तिला प्रपोज करतो. दादासाहेबांच्या इच्छेविरुद्ध तिने त्याच्याशी लग्नं केल्यानंतर, गजेंद्र सरंजामे घरात घरजावई म्हणुन राहायला लागतो व आपलं नाव बदलून "विक्रांत सरंजामे" ठेवतो.

तथापि, दादासाहेबांना जालिंदरकडून त्याच्याविरुद्ध सगळे पुरावे मिळतात व ते विक्रांतला त्यांच्या जावई म्हणून कठोरपणे नाकारत त्याचा अपमान करतात. ह्याचा बदला घेत विक्रांत झेंडेच्या मदतीने दादासाहेबांचं औषध बदलून टाकतो व जालिंदरला जेलमध्ये पाठवतो. चुकीचं औषध घेतल्यामुळे दादासाहेबांच्या मृत्यू होतो आणि विक्रांत गुप्तपणे आईसाहेबांना ह्यासाठी जबाबदार धरतो. परंतु, जेलमध्ये जालिंदर राजनंदिनीला भेटतो व तिला सगळं सत्य कबूल करतो. विक्रांत व झेंडेला रंगेहाथ पकडत राजनंदिनी त्या दोघांना पोलिसात द्यायची धमकी देते. हे टाळण्यासाठी विक्रांत राजनंदिनीला गच्चीवरून ढकलून देतो ज्यानी तिच्या दुर्देवी अंत होतो.

गोष्ट वर्तमानकाळात परतते व ईशाला हे सगळं बघून हे ही जाणवतं की ती खरच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. आईसाहेब आणि जयदीपला ईशा तिची ओळख व विक्रांत आणि झेंडेचे कारस्थानाबद्दल कबूली करते. हे तिघं राजनंदिनीवर झालेल्या अन्यायाचा बदला विक्रांतकडून घ्यायची शप्पथ घेतात. झेंडेला ईशावर संशय येतो व तो विक्रांतला हे सांगण्याचा प्रयत्न करतो पण व्यर्थ. आईसाहेब व जयदीपच्या आधाराने, ईशा विक्रांतला त्यानी राजनंदिनीसोबत केलेल्या अन्यायाबद्दल जाप विचारते व दावा करते की तिला राजनंदिनीचं सगळं जीवनपट माहितेय.

बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग न दिसल्याने, विक्रांत सगळ्यांसमोर कबूल करतो की त्यानी गरिबीत होणारे हाल ह्यांच्या काटा काढण्यासाठी दादासाहेब व राजनंदिनी ह्यांना फसवून त्यांचे खून केले, आणि टोमणा मारतो की त्यांच्यापैकी कोणाकडेही त्याचे गुन्हे सिद्ध करण्यासाठी पुरावा नाही आहे. पुढे, तो ईशाला महत्त्वाचं बोलण्यासाठी गच्चीवर बोलावतो. आईसाहेबांना हा विचार करून काळजी वाटते की विक्रांत राजनंदिनीसारखं ईशाला देखील गच्चीवरून ढकलून देणार नाही ना. परंतु, गच्चीवर विक्रांत ईशाला एकांतात भेटून कबूल करतो की ती त्याच्या विरुद्ध जाऊन सुद्धा तो तिच्यावर खरं प्रेम करतो.

तथापि, मालिकेचा शेवट अत्यंत धक्कादायक व भावनिक होतो जेव्हा विक्रांत ईशासमोर प्रकट करतो की झेंडे तिच्या विरुद्ध सल्ले दिल्यामुळे त्यानी त्याला गोळी मारून ठार केलं, व तो अपराधीपणा आणि पश्चातापानी गच्चीवरून उडी मारून स्वतःच्या मृत्यूला भेटतो. उद्वस्त झालेली ईशा सरंजामे घर सोडून आपल्या चाळीतल्या घरी परत राहायला जाते, असं म्हणत की तिला तिचं खरं स्वः जगायचं आहे. काही महिन्यांनंतर, ईशा व तिच्या आईवडिलांनी उघडलेला खानपान व्यवसाय दाखवण्यात मालिका संपते.

कलाकार

संपादन
  • सुबोध भावे - विक्रांत सरंजामे / गजेंद्र रघू पाटील (गजा)
  • गायत्री दातार - ईशा अरुण निमकर / ईशा विक्रांत सरंजामे
  • शिल्पा तुळसकर - राजनंदिनी सरंजामे / राजनंदिनी गजेंद्र पाटील
  • अभिज्ञा भावे - मायरा कारखानीस
  • मोहिनीराज गटणे - अरुण निमकर
  • गार्गी फुले-थत्ते - पुष्पा अरुण निमकर
  • अनिल खोपकर - दादासाहेब सरंजामे
  • विद्या करंजीकर - स्नेहलता सरंजामे (आईसाहेब)
  • उमेश जगताप - विलास झेंडे
  • आशुतोष गोखले - जयदीप सरंजामे
    • मल्हार भावे - छोटा जयदीप
  • पौर्णिमा डे - सोनिया जयदीप सरंजामे
  • संदेश जाधव - जालिंदर माने
  • अशोक सावंत - सर्जेराव
  • लीना पालेकर - मंदा
  • प्रथमेश देशपांडे - बिपिन टिल्लू
  • सोनल पवार - रुपाली
  • चित्रा गाडगीळ - रुपालीची आई
  • रविंद्र कुलकर्णी - बिपिनचे बाबा
  • सुरभी भावे-दामले - पिंकी मावशी
  • भाग्येश पाटील - वृत्तनिवेदक
  • लीना पंडित - वाडकर
  • सोनाली खटावकर - सपना
  • केदार आठवले - मिहीर
  • सतीश जोशी - परांजपे
  • स्वानंद देसाई - एफ.एम.
  • ऊर्मिला काटकर - जोगतीण

विशेष भाग

संपादन
  1. वय विसरायला लावतं तेच खरं प्रेम! (१३ ऑगस्ट २०१८)
  2. ईशामुळे कोट्यवधी विक्रांतला पटणार दोन रुपयांची किंमत. (२१ ऑगस्ट २०१८)
  3. नव्याने प्रेमात पाडणारी प्रेमकहाणी! (४ सप्टेंबर २०१८)
  4. ईशाच्या अल्लड प्रेमाची विक्रांतला लागेल का चाहूल? (८ सप्टेंबर २०१८)
  5. विक्रांत घेणार ईशाचं लग्न ठरवण्यासाठी पुढाकार. (१२ सप्टेंबर २०१८)
  6. विक्रांत सरंजामे मागणार निमकर कुटुंबीयाची माफी. (१० ऑक्टोबर २०१८)
  7. विक्रांत ईशाला घालणार लग्नाची मागणी. (९ डिसेंबर २०१८)
  8. नव्या वर्षाचं पहिलं लग्न! (१३ जानेवारी २०१९)
  9. विक्रांत सरंजामेचा मुखवट्यामागचा खरा चेहरा समोर येणार. (८ फेब्रुवारी २०१९)

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ३३ २०१८ ५.१
आठवडा ३४ २०१८ ४.४ []
आठवडा ३५ २०१८ ५.५ []
आठवडा ३६ २०१८ ५.०
आठवडा ३७ २०१८ ५.६ []
आठवडा ३८ २०१८ ५.१ []
आठवडा ३९ २०१८ ४.८
आठवडा ४० २०१८ ५.१ []
आठवडा ४१ २०१८ ४.५ []
आठवडा ४२ २०१८ ५.३ []
आठवडा ४३ २०१८ ६.६ []
आठवडा ४४ २०१८ ७.० []
आठवडा ४५ २०१८ ५.३ [१०]
आठवडा ४६ २०१८ ६.३ [११]
आठवडा ४७ २०१८ ५.९ [१२]
आठवडा ४८ २०१८ ६.६ [१३]
आठवडा ४९ २०१८ ५.० [१४]
आठवडा ५० २०१८ ६.५ [१५]
आठवडा ५१ २०१८ ५.४ [१६]
आठवडा ५२ २०१८ ४.० [१७][१८]
आठवडा १ २०१९ ५.६ [१९]
आठवडा २ २०१९ ७.८ [२०]
आठवडा ३ २०१९ ५.७ [२१]
आठवडा ४ २०१९ ३.७ [२२]
आठवडा १६ २०१९ ३.० [२३]
आठवडा १७ २०१९ २.९ [२४]
आठवडा २१ २०१९ २.९ [२५]
आठवडा २३ २०१९ २.८ [२६]
आठवडा २७ २०१९ ३.७ [२७]
आठवडा २८ २०१९ ३.६ [२८][२९]
आठवडा २९ २०१९ ३.७ [३०]

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड जोथे जोथेयाली झी कन्नडा ९ सप्टेंबर २०१९ - १९ मे २०२३
तेलुगू प्रेमा एन्था मधुरम झी तेलुगू १० फेब्रुवारी २०२० - चालू
मल्याळम नियुम् न्जानुम् झी केरळम १० फेब्रुवारी २०२० - ८ एप्रिल २०२३
तमिळ निथाने एन्थान पुन्वासन्थाम झी तमिळ २४ फेब्रुवारी २०२० - २५ डिसेंबर २०२१
उडिया केमिती कहिबी कहा झी सार्थक १८ जानेवारी २०२१ - १२ मार्च २०२२
पंजाबी अखियॉं उदीक दिया झी पंजाबी २२ मार्च - २७ ऑगस्ट २०२१

पुरस्कार

संपादन
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८
श्रेणी प्राप्तकर्ता भूमिका
सर्वोत्तम वडील मोहिनीराज गटणे अरुण निमकर
सर्वोत्तम आई गार्गी थत्ते-फुले पुष्पा निमकर
सर्वोत्तम व्यक्तिरेखा पुरुष मोहिनीराज गटणे अरुण निमकर
सर्वोत्कृष्ट अभिनेता सुबोध भावे विक्रांत सरंजामे
सर्वोत्तम कुटुंब निमकर कुटुंब
सर्वोत्तम मालिका अपर्णा केतकर, अतुल केतकर निर्माते
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत अशोक पत्की संगीत दिग्दर्शक

संदर्भ

संपादन
  1. ^ "Majhya Navryachi Bayko rules the TRP chart; Tula Pahate Re secures its position to the top five shows". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-08 रोजी पाहिले.
  2. ^ "Lagira Zhala Ji out of Top 5 list; Tula Pahate Re makes it to the Top 3". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Team Tula Pahate Re celebrates after topping TRP charts; See pics". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-08-11 रोजी पाहिले.
  4. ^ "टीआरपीच्या रेसमध्ये तुला पाहते रे ही मालिका तिसऱ्या स्थानी, जाणून घ्या कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर". लोकमत. 2021-08-11 रोजी पाहिले.
  5. ^ "#TRP मीटर: 'माझ्या नवऱ्याची बायको' नंबर वनवर, नव्या शनायाची चालली जादू". न्यूझ१८ लोकमत. 2021-08-11 रोजी पाहिले.
  6. ^ "#TRP मीटर: यावेळी चालली नाही सुबोधची जादू, टीआरपीमध्ये मोठा बदल". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  7. ^ "#TRP मीटर: शनायापुढे इतर मालिकांची 'हवा' गेली!". न्यूझ१८ लोकमत. 2022-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  8. ^ "#TRP मीटर: 'शनाया'ची जादू झाली फिकी, विक्रांत सरंजामे ठरला वरचढ!". न्यूझ१८ लोकमत. 2021-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  9. ^ "#TRP मीटर: राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे". न्यूझ१८ लोकमत. 2022-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-15 रोजी पाहिले.
  10. ^ "#TRP मीटर: दिवाळीच्या आठवड्यात नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं". न्यूझ१८ लोकमत. 2021-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  11. ^ "#TRP मीटर: शनाया पुन्हा एकदा जिंकली, विक्रांत आला एक पाऊल मागे". न्यूझ१८ लोकमत. 2021-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  12. ^ "जाणून घ्या, कोणती मालिका ठरली 'नंबर वन'?". लोकसत्ता. 2021-04-07 रोजी पाहिले.
  13. ^ "#TRP मीटर: आदेश भाऊजींचं 'झिंगाट' झालं लोकप्रिय, 'हवा'चं भवितव्य धोक्यात". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  14. ^ "३०० कोटींची मालकीण राधिका विक्रांत सरंजामेवर पडली भारी!". लोकसत्ता. 2021-04-07 रोजी पाहिले.
  15. ^ "राधिका सुभेदारसमोर विक्रांत सरंजामेची फिल्मी स्टाइल पडली फिकी". लोकसत्ता. 2021-04-07 रोजी पाहिले.
  16. ^ "तुला पाहते रे घसरली तिसऱ्या क्रमांकावर, ही मालिका ठरली अव्वल". लोकमत. 2021-08-30 रोजी पाहिले.
  17. ^ "#TRP मीटर: 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेनं बदललं टीआरपीचं गणित". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-01 रोजी पाहिले.
  18. ^ "स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या फॅन्ससाठी खूशखबर, टीआरपी रेसमध्ये मालिका दुसऱ्या क्रमांकावर". लोकमत. 2021-12-01 रोजी पाहिले.
  19. ^ "नव्या वर्षातही 'राधिका' काही पहिला नंबर सोडेना!". लोकसत्ता. 2021-08-22 रोजी पाहिले.
  20. ^ "#TRP मीटर: शनायाच्या लग्नापेक्षा विक्रांत सरंजामेचं लग्न पडलं भारी, टीआरपीत वर्षातला सर्वात मोठा बदल". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-11 रोजी पाहिले.
  21. ^ "#TRP मीटर: ईशाच्या लग्नानंतर प्रेक्षकांनी मालिकेशी केला 'ब्रेकअप'". न्यूझ१८ लोकमत. 2021-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-11 रोजी पाहिले.
  22. ^ "#TRP मीटर: पाठकबाईंची निवडणूक भारी पडली ईशा-विक्रांतच्या संसारावर". न्यूझ१८ लोकमत. 2021-08-11 रोजी पाहिले.
  23. ^ "टीआरपी रँकिंगमध्ये झी मराठीवरील 'ही' मालिका अव्वल स्थानावर". न्यूझ१८ लोकमत. 2021-08-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-07-03 रोजी पाहिले.
  24. ^ "तुला पाहते रे टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या नंबरवर, जाणून घ्या कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर". लोकमत. 2021-08-30 रोजी पाहिले.
  25. ^ "#TRP मीटर: शेलिब्रिटी पॅटर्नची 'हवा' वाढली, तर शनायाचं स्थान धोक्यात". न्यूझ१८ लोकमत. 2021-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-11 रोजी पाहिले.
  26. ^ "ईशा-विक्रांतच्या भांडणात संभाजी महाराजांनी मारली बाजी!". न्यूझ१८ लोकमत. 2021-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-03 रोजी पाहिले.
  27. ^ "#TRP मीटर: राधिका शनायाच्या जुगलबंदीने सगळ्यांची गेली 'हवा', या आहेत टाॅप ५ मालिका". न्यूझ१८ लोकमत. 2021-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-03 रोजी पाहिले.
  28. ^ "#TRP मीटर: झी मराठीच्या वर्चस्वाला धक्का, कलर्स मराठीची 'ही' मालिका TOP 5 मध्ये". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-03 रोजी पाहिले.
  29. ^ "TRP च्या शर्यतीत टॉप ५ मध्ये झी मराठीचा रेकॉर्ड मोडत कलर्स मराठीची एन्ट्री". लोकमत. 2021-12-01 रोजी पाहिले.
  30. ^ "#TRP मीटर: प्रेक्षक म्हणताहेत राणादा 'तुझ्यात जीव रंगला', 'या' मालिकेनं गमावलं आपलं स्थान". न्यू़झ१८ लोकमत. 2021-09-03 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
रात्री ८.३०च्या मालिका
आभाळमाया | अवंतिका | ऊन पाऊस | वादळवाट | असंभव | अनुबंध | लज्जा | आभास हा | एका लग्नाची दुसरी गोष्ट | मला सासू हवी | जुळून येती रेशीमगाठी | माझे पती सौभाग्यवती | खुलता कळी खुलेना | तुझं माझं ब्रेकअप | तुला पाहते रे | अग्गंबाई सासूबाई | टोटल हुबलाक | अग्गंबाई सूनबाई | माझी तुझी रेशीमगाठ | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | सारं काही तिच्यासाठी | लाखात एक आमचा दादा