अग्गंबाई सासूबाई

मराठी मालिका

अग्गंबाई सासूबाई ही एक भारतीय मराठी भाषेतील एक मालिका आहे जी झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाली होती. ज्याचे दिग्दर्शक अजय मयेकर, निर्माते सुनील भोसले आणि वितरक झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेझ आहेत.

अग्गंबाई सासूबाई
दिग्दर्शक अजय मयेकर
निर्माता सुनील भोसले
निर्मिती संस्था सोमील क्रिएशन्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ४३२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २२ जुलै २०१९ – १३ मार्च २०२१
अधिक माहिती
आधी येऊ कशी तशी मी नांदायला
नंतर माझा होशील ना
सारखे कार्यक्रम अग्गंबाई सूनबाई

कथानक

संपादन

सोहम कुलकर्णी (आशुतोष पत्की) शुभ्राला (तेजश्री प्रधान) एका बस-स्टॉप वर जाऊन भेटायला घाई करतो. दरम्यान, त्याची विधवा आई आसावरी कुलकर्णी (निवेदिता सराफ) तिच्या आवडत्या शेफ अभिजीत राजेचा (गिरीश ओक) कुकरीचा कार्यक्रम बघत असते. पुढे, शुभ्रा तिच्या घरी येते व तिला तिचा सोहमशी लग्न करायचा निर्णय सांगते ज्यामुळे त्याच्या आजोबांची (रवी पटवर्धन) चिडचिड होते. नंतर, शुभ्राला रस्त्यावर अभिजीत भेटतो. त्यानंतर, सोहम आणि शुभ्रा लग्न करतात आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एक मुक्काम आयोजीत केला जातो. दरम्यान, आसावरी अभिजीतला फोनवर सांगते की तिला त्याचं क्रेम ब्रुले आवडलं. पुढे, एक चिडलेले आजोबा सोहम आणि शुभ्राला घरी परत यायला लावतात. नंतर, काळजीत असलेली आसावरी सोहमएवेजी चुकून अभिजीतला फोन करते. दुसऱ्या दिवशी, आजोबांनी विकलेला कॅमेरा विकत घ्यायला अभिजीत आसावरीच्या घरी येतो. पुढे, त्यांच्या येण्यानी गोंधळून गेल्यामुळे आसावरी चुकून त्याच्या कॉफीमध्ये तांदूळ घालते. नंतर, आजोबा घरी परत येतात व अभिजीतला तो कॅमेरा विकुन टाकतात. तथापि, आसावरीच्या भावनांमुळे अभिजीत तो कॅमेरा तिच्या घरीच सोडतो. त्यानंतर, आजोबा अभिजीतचा धनादेश बँकमध्ये टाकायला घाई करतात. पुढे, अभिजीतनी तो कॅमेरा विकत घेतलेला नाही आहे हे कळल्यावर सुद्धा ते तो धनादेश परत करायला नकार देतात. तथापि, शुभ्रा त्याला तो धनादेश अभिजीतला परत करण्यासाठी पटवते. नंतर, आसावरी अभिजीतला तो धनादेश परत करण्यासाठी त्याच्या उपाहारगृहामध्ये जाते व दुपारच्या जेवणासाठी त्याला साथ देते.

५ महिन्यांनंतर, अभिजीत उपाहारगृहात त्यांनी आयोजीत केलेल्या खास मेजवानीमुळे आसावरीला आनंद होतो. तथापि, सोहमच्या स्कूटरचा अपघात झालेला आहे हे कळल्यानंतर ती घाईत घरी परत जाते. पुढे, त्याच्या जखमी आसावरीला अतिशयोक्त केल्यामुळे शुभ्रा सोहमला ओरडते. नंतर, अभिजीत आसावरीला इमारतीच्या खाली बोलावतो व तिला तिथे लग्नाची मागणी घालतो. त्यानंतर, शुभ्रा त्रास झालेल्या आसावरीला सांत्वन देते जी अनिच्छेनी अभिजीतबरोबर सांगली नाती तोडते. आसावरी मग शुभ्राला अभिजीतशी बोलायला सांगते. पुढे, शुभ्रा एका धक्का बसलेल्या अभिजीतला सांत्वन देते ज्याला आसावरीचा निर्णय आवडत नाही. नंतर, त्यांना सोडुन दिल्यामुळे सोहम आणि आजोबा आसावरीला ओरडतात ज्यामुळे ती दुखावली जाते. दुसऱ्या दिवशी, सोहम अभिजीतला त्याचा व्यवसाय प्रस्ताव दाखवण्यासाठी त्याच्या उपाहारगृहात पोचतो. दरम्यान, आसावरी अभिजीतसाठी तिच्या भावना शुभ्रासमोर व्यक्त करते. पुढे, अभिजीतच्या पा किटात आसावरीचं छायाचीत्र सापडल्याने सोहमला धक्का बसतो. नंतर, चिडलेला सोहम आसावरीनी सुरक्षीतपणे घरी ठेवलेल्या अभिजीतच्या स्मरणिका नष्ट करतो. त्यानंतर, अभिजीतच्या आठवणींनी ग्रासल्यामुळे, आसावरी एका किराणा दुकानाच्या मालकाएवजी चुकून अभिजीतला फोन करते. पुढे, अभिजीत तिच्या घरी येतो पण ती त्याला इमारतीच्या जिन्यात न बघता किराणा दुकानासाठी निघते. तथापि, ते दोघं शेवटी इमारतीच्या खाली समोरासमोर येतात. नंतर, सोहम आणि शुभ्राला अभिजीत त्याच्या भावना आसावरीसमोर व्यक्त करताना व तिला एक वचन देताना बघतात.

काही दिवसांनंतर, सोहम आजोबांना असं काहीतरी सांगतो ज्यामुळे ते रागावतात. आजोबांनी तिला ओरडल्यामुळे आसावरी घाबरते. अभिजीतच्या प्रेमाच्या कबुलीनी ते आणखी चिडतात व आसावरीला मारहाण करतात. तथापि, मकर संक्रांतीच्या दिवशी, आजोबा त्यांच्या भावना अभिजीतसमोर व्यक्त करतात व त्यांच्या आणि आसावरीच्या नात्याबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतात. लग्नाच्या दिवशी, सोहम लग्न थांबवण्यासाठी गैरसमज निर्माण करतो, आणि आसावरी लग्न अचानक रद्द करायचं ठरवते. नंतर, अभिजीत सगळे गैरसमज दूर करतो व आसावरीशी लग्न करतो.

कलाकार

संपादन
  • गिरीश ओक - शेफ अभिजीत राजे
  • निवेदिता सराफ - आसावरी प्रभाकर कुलकर्णी / आसावरी अभिजीत राजे
  • तेजश्री प्रधान - शुभ्रा अनिल कामत / शुभ्रा सोहम कुलकर्णी
  • रवी पटवर्धन / मोहन जोशी - दत्तात्रय (दत्ताजी) बंडोपंत कुलकर्णी
  • आशुतोष पत्की - सोहम (बबड्या) प्रभाकर कुलकर्णी
  • भक्ती रत्नपारखी - मंदोदरी (मॅडी) परब
  • प्रतिभा गोरेगांवकर - सुलभा सामंत
  • संजीवनी साठे - प्रज्ञा सुनील कारखानीस
  • अरुण मोहरे - विद्याधर कारखानीस
  • राजश्री पोतदार - प्रभा विद्याधर कारखानीस
  • महेश कोकाटे - कमलाकर काटेकोर
  • लीना आठवले-दातार - आशा अनिल कामत
  • भाग्येश पाटील - विश्वास
  • शुभदा नाईक - दाते
  • निखिल झोपे - अक्षय
  • पौर्णिमा डे - ट्विंकल
  • साक्षी गांधी - प्रिताली
  • राजेश भोसले - मंगेश

विशेष भाग

संपादन
  1. लग्न सासूचं, करवली सूनबाई. (२२ जुलै २०१९)
  2. सासूचं लग्न ठरलं बरं का! (१९ जानेवारी २०२०)
  3. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी आसावरीला मिळेल का बाबांच्या आशिर्वादाची खास भेट? (१७ जानेवारी २०२१)
  4. नात्यातील कटुता दूर सरणार, कारण बबड्याला त्याची आई परत मिळणार. (२१ फेब्रुवारी २०२१)

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
मल्याळम मनमपोल मंगल्याम् झी केरळम २८ डिसेंबर २०२० - २ जानेवारी २०२२
तामिळ पुधू पुधू अर्थांगल झी तमिळ २२ मार्च २०२१ - २० नोव्हेंबर २०२२
पंजाबी सस्सेनी सस्से तु खुशियाॅंच वस्से झी पंजाबी २५ एप्रिल २०२२ - २३ सप्टेंबर २०२२
कन्नड श्रीरस्तु शुभमस्तु झी कन्नडा ३१ ऑक्टोबर २०२२ - चालू

टीआरपी

संपादन
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ३० २०१९ ४.२ [][]
आठवडा ४४ २०१९ ५.४
आठवडा ४५ २०१९ ५.८
आठवडा ४६ २०१९ ५.२
आठवडा ४७ २०१९ ५.७
आठवडा ४८ २०१९ ३.५ []
आठवडा ४९ २०१९ ३.९
आठवडा ५२ २०१९ ४.७ []
आठवडा ५३ २०१९ ४.१ []
आठवडा १ २०२० ३.६
आठवडा २ २०२० ३.२
आठवडा ३ २०२० ४.३ [][]
आठवडा ४ २०२० २.९ []
आठवडा ५ २०२० ३.३ []
आठवडा ६ २०२० ३.३ [१०]
आठवडा ७ २०२० ३.५
आठवडा ८ २०२० ३.० [११]
आठवडा ९ २०२० २.८ [१२]
आठवडा १० २०२० ५.६ [१३][१४]
आठवडा ११ २०२० ४.३
आठवडा २८ २०२० ४.२ [१५]
आठवडा २९ २०२० ४.३
आठवडा ३१ २०२० ३.२
आठवडा ३२ २०२० ३.६
आठवडा ३३ २०२० ३.३
आठवडा ३४ २०२० ३.५
आठवडा ३५ २०२० ३.७
आठवडा ३७ २०२० ३.४
आठवडा २ २०२१ ३.९
आठवडा ३ २०२१ ३.९ [१६]
आठवडा ४ २०२१ ३.९

पुरस्कार

संपादन
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार
वर्ष श्रेणी प्राप्तकर्ता भूमिका
२०१९ सर्वोत्कृष्ट मालिका सुनील भोसले निर्माता
सर्वोत्कृष्ट कुटुंब कुलकर्णी कुटुंब
सर्वोत्कृष्ट जोडी निवेदिता सराफ-गिरीश ओक आसावरी-अभिजीत
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत अशोक पत्की संगीतकार
सर्वोत्कृष्ट आई निवेदिता सराफ आसावरी
सर्वोत्कृष्ट सासू
सर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट सासरे रवी पटवर्धन आजोबा
सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार स्त्री भक्ती रत्नपारखी मॅडी
२०२०-२१ सर्वोत्कृष्ट सासू निवेदिता सराफ आसावरी
सर्वोत्कृष्ट सून तेजश्री प्रधान शुभ्रा

संदर्भ

संपादन
  1. ^ "#TRP मीटर: सासूबाई आल्या पहिल्या पाचात, पण नवऱ्याच्या बायकोचं काही खरं नाही!". न्यूझ१८ लोकमत. 2022-09-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  2. ^ "क्या बात है...! TRP च्या टॉप ५ मध्ये झाली झी मराठीच्या या मालिकेची एन्ट्री". लोकमत. 2021-12-01 रोजी पाहिले.
  3. ^ "'स्वराज्यरक्षक संभाजी'च्या फॅन्ससाठी खूशखबर, टीआरपी रेसमध्ये या क्रमांकावर आहे मालिका". लोकमत. 2021-06-23 रोजी पाहिले.
  4. ^ "#TRP मीटर: वर्षाच्या शेवटी 'सासूबाई' पडली 'बायको'वर भारी!". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  5. ^ "'तुझ्यात जीव रंगला'ला टीआरपी रेसमध्ये पहिल्या पाचमध्ये मिळवता आले नाही स्थान, ही मालिका ठरली सरस". लोकमत. 2021-08-30 रोजी पाहिले.
  6. ^ "TRP मीटरमध्ये 'स्वराज्यरक्षक संभाजी' अव्वल, 'माझ्या नवऱ्याची बायको'ला दणका". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  7. ^ "स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका संपण्यापूर्वी मालिकेच्या टीमला मिळाली ही गुड न्यूझ". लोकमत. 2021-12-01 रोजी पाहिले.
  8. ^ "#TRP मीटर: 'बायको' पडली 'सासूबाईं'वर भारी, पाहा तुमची मालिका कोणत्या स्थानावर". न्यूझ१८ लोकमत. 2021-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-03 रोजी पाहिले.
  9. ^ "'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका शेवटाकडे, असा आहे या आठवड्याचा TRP मीटर". न्यूझ१८ लोकमत. 2021-08-22 रोजी पाहिले.
  10. ^ "टीआरपीच्या स्पर्धेत 'माझ्या नवऱ्याची बायको'च अव्वल". महाराष्ट्र टाइम्स. 2021-03-08 रोजी पाहिले.
  11. ^ "'स्वराज्यरक्षक संभाजी'ने शेवटच्या आठवड्यात देखील मारली बाजी, टीआरपीमध्ये 'या' नंबरवर होती मालिका". लोकमत. 2021-09-26 रोजी पाहिले.
  12. ^ "TRP मध्ये 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा दबदबा कायम, 'नवऱ्याच्या बायको'ला फटका". न्यूझ१८ लोकमत. 2021-08-11 रोजी पाहिले.
  13. ^ "'रात्रीस खेळ चाले २'ची टॉप ५ मध्ये दणदणीत एंट्री, असा आहे या आठवड्याचा TRP मीटर". न्यूझ१८ लोकमत. 2021-08-11 रोजी पाहिले.
  14. ^ "ही मालिका ठरली टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल, 'माझ्या नवऱ्याची बायको'ची घसरली लोकप्रियता". लोकमत. 2021-12-01 रोजी पाहिले.
  15. ^ "'या' मराठी मालिका करतात प्रेक्षकांच्या मनावर राज्य; टीआरपीमध्ये आहेत अव्वल". लोकसत्ता. 2021-09-05 रोजी पाहिले.
  16. ^ "पहिल्या पाचमध्ये कित्येक महिन्याने आली झी मराठीवरील ही मालिका तर टीआरपीत ठरलीय ही मालिका अव्वल". लोकमत. 2021-09-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
रात्री ८.३०च्या मालिका
आभाळमाया | अवंतिका | ऊन पाऊस | वादळवाट | असंभव | अनुबंध | लज्जा | आभास हा | एका लग्नाची दुसरी गोष्ट | मला सासू हवी | जुळून येती रेशीमगाठी | माझे पती सौभाग्यवती | खुलता कळी खुलेना | तुझं माझं ब्रेकअप | तुला पाहते रे | अग्गंबाई सासूबाई | टोटल हुबलाक | अग्गंबाई सूनबाई | माझी तुझी रेशीमगाठ | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | सारं काही तिच्यासाठी | लाखात एक आमचा दादा