मोहन जोशी
मोहन विष्णू जोशी (जन्म : बंगळुरु, १२ जुलै १९५३) हे रंगमंचावरील आणि चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. (इ.स. २०१५)
मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्याचा प्रारंभ त्यांनी १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून केला. पहिले नाटक ’टुणटुण नगरी खणखण राजा’ हे होते. नाटके करणे सुरू असताना ते बी.कॉम. झाले. पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौऱ्यांसाठी सुट्ट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येक वेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस व्यवस्थापकाजवळ त्यांचे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मोहन जोशी यांनी शांतपणे विचार करून दुसऱ्या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला.
ज्योती जोशी यांच्याशी मोहन जोशींचे लग्न झाले आणि ते त्यांना घेऊन आपल्या अभिनय कारकिर्दीसाठी मुंबईत आले. ’कुर्यात् सदा टिंगलम्’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक होय. त्यापूर्वी त्यांनी शालेय जीवनात गाणारा मुलुख आणि थीफ पोलीस हा एकांकिकांत काम केले होते. कॉमर्स कॉलेजात असताना मोहन जोशी यांनी काका किशाचा, तीन चोक तेरा, डिअर पिनाक आणि पेटली आहे मशाल या नाटकांत कामे केली होती.
नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वतःचा ट्रक घेऊन मोहन जोशी ड्रायव्हर झाले. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. पुढे ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले.
कुटुंब
संपादनमोहन जोशींची आई म्हणजे माहेरच्या कुसुम भावे. त्या साहित्यिक पु.भा. भावे यांच्या चुलत भगिनी होत. वडील (अण्णा) खडकीला मिलिटरीच्या ईएम्ई वर्कशॉपमध्ये नोकरी करत. त्यांच्या बदल्याही होत. आईचे माहेर नागपूरचे आणि सासर अमरावतीचे. मोहन जोशी यांचे आईवडील पुण्यातील नवी पेठ येथील फाटकांच्या वाड्यात रहात. रवींद्र आणि अविनाश हे मोहन जोशींचे मोठे भाऊ; रवींद्र सर्वात मोठे. मोहन जोशी सर्वात धाकटे. वडिलांचे मामा बाबा साठे हे भरत नाट्य मंदिरात मेकअपमन होते. गौरी आणि नंदन ही मोहन जोशींची मुले.
गौरीनंदन थिएटर्स
संपादनमोहन जोशी आणि पत्नी ज्योती जोशी यांनी ’गौरीनंदन थिएटर्स’ नावाची एक नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे निर्माण केलेली मराठी नाटके आणि दूरचित्रवाणी मालिका :-
- गजरा (चित्रवाणी मालिका)
- डिटेक्टिव्ह जयराम(मालिका)
- भटाच्या चालीने (नाटक)
- मनोमनी (नाटक)
गौरीनंदन थिएटर्सने ज्या काही नाटकांच्या सीडीज बाजारात आणल्या ती नाटके :-
|
|
नाटके
संपादनमोहन जोशी यांची भूमिका असलेली नाटके
बालनाट्ये
संपादन
|
|
कॉलेज जीवनातील नाटके/एकांकिका
संपादन- काका किशाचा
- डिअर पिनाक
- तीन चोक तेरा
- पेटली आहे मशाल
हौशी नाट्यसंस्थांची नाटके
संपादन- इन्व्हेस्टमेंट (एकांकिका)
- तिला मृत्यू द्या (एकांकिका)
- काचसामान जपून वापरा (एकांकिका)
- मला खून करायचाय
- सावल्या
हौशी प्रायोगिक नाट्यसंस्थांची नाटके
संपादन- अचानक
- एक शून्य बाजीराव
- गार्बो
- सू्र्योदयाच्या प्रथम किरणापासून सूर्यास्ताच्या अंतिम किरणापर्यंत
व्यावसायिक नाटके
संपादन
|
|
|
मालिका
संपादन- अग्निहोत्र
- अधांतर
- अर्धांगिनी
- असे पाहुणे येती
- एका लग्नाची दुसरी गोष्ट
- एका लग्नाची तिसरी गोष्ट
- एका श्वासाचे अंतर
- अग्गंबाई सूनबाई
- अग्गंबाई सासूबाई
- कल्याणी
- गुंडा पुरुष देव
- घे भरारी
- त्रेधा तिरपीट
- धनंजय
- नो प्रॉब्लेम
- न्यायदेवता
- पोलिसातील माणूस
- जीव झाला येडापिसा
- भांडा सौख्य भरे
- भैरोबा
- काहे दिया परदेस
- लाईफ लाईन
- संघर्ष
- संस्कार
- हद्दपार
- हॉर्न ओके प्लीज
- ऊन पाऊस
- माझी तुझी रेशीमगाठ
चित्रपट
संपादनमराठी चित्रपट
संपादन
|
|
|
हिंदी चित्रपट
संपादनमोहन जोशी यांचे हिंदी चित्रपट (सुमारे १६६)
|
|
|
जाहिरातपट
संपादनमोहन जोशी याची भूमिका असलेल्या ॲड फिल्म्स (जाहिरातपट)
- गोवा गुटका
- बियान (महाबीज कंपनीची जाहिरात करणारा जाहिरातपट)
इतर
संपादनमोहन जोशी यांचे अन्य भाषांतील चित्रपट
- जीवनयुद्ध (बंगाली)
- डॉक्टर बाबू (भोजपुरी)
- बिदाई (भोजपुरी
- मोक्ष (कन्नड)
आत्मचरित्र
संपादन- मोहन जोशी यांनी ‘नटखट नट-खट’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला वि.भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दिला जाणारा इंदिरा-भालचंद्र पुरस्कार मिळाला आहे.
नाटकांतील अभिनयासाठी मोहन जोशी यांना मिळालेली बक्षिसे, पातितोषिके, सन्मान, पुरस्कार
संपादन- औद्योगिक ललित कलामंडळ एकांकिका स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’इन्व्हेस्टमेन्ट’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
- औद्योगिक ललित कलामंडळ एकांकिका स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’काचसामान जपून वापरा’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
- पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील कॉमर्स कॉलेजने सादर केलेल्या ’डिअर पिनाक’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
- पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील कॉमर्स कॉलेजने सादर केलेल्या ’पेटली आहे मशाल’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी पुरस्कार
- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या एकांकिका स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’नाथ हा माझा’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या प्रथम आणि अंतिम स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’मोरूची मावशी’ या नाटकातील अभिनयासाठी पहिला क्रमांक
- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या एकांकिका स्पर्धेत रंगश्रीतर्फे सादर झालेल्या ’मोरूची मावशी’’ या नाटकाला प्रथम आणि अंतिम स्पर्धेत अभिनयासाठी सुवर्णपदक
- राज्य नाट्य स्पर्धेत ड्रॉपर्सतर्फे सादर झालेल्या ’एक शून्य बाजीराव’ या नाटकामधील प्राथमिक फेरीतील अभिनयासाठी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक
- नाट्यदर्पण हास्यअभिनेता ॲवॉर्ड : ओम् नाट्यगंधातर्फे सादर झालेल्या ’देखणी बायको दुसऱ्याची’मधील अभिनयासाठी
- नाट्यदर्पण ॲवॉर्ड : भद्रकाली प्रॉडक्शनतर्फे सादर झालेल्या ’माझं छान चाललंय ना’ या नाटकातील अभिनयासाठी
- ’कार्टी काळजात घुसली’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
- ’नातीगोती’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’साहाय्यक अभिनेता पुरस्कार; नाट्यदर्पण ॲवॉर्ड
- ’थॅंक यू मिस्टर ग्लाड’ या नरेश/संवादतर्फेतर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या पुनरुज्जीवित नाटकातील अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; उत्कृष्ट अभिनेता नाट्यदर्पण ॲवॉर्ड.
- व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या चंद्रलेखातर्फे सादर झालेल्या ’आसू आणि हासू’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
- व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’एकदा पहावं करून’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’श्री तशी सौ’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक
- व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकातील अभिनयासाठी नाट्यदर्पण ॲवॉर्ड
- व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’चिंतामणी थिएटर्स’तर्फे सादर झालेल्या ’मी रेवती देशपांडे’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक; झी टीव्ही लक्षवेधी अभिनेता पुरस्कार; कलासंस्कृती उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; मिफ्टा (MIFTA) उत्कृष्ट अभिनेता नामांकन
- व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’कॅंपस क्रिएटिव्ह’तर्फे सादर झालेल्या ’वय लग्नाचं’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
- व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’आशय प्रॉडक्शन’तर्फे सादर झालेल्या सुखान्त’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी झी मराठी ॲवॉर्ड; व्यावसायिक नाट्यस्पर्धा उत्कृष्ट अभिनेता ॲवॉर्ड
- संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार. (२०१७)
चित्रपटांतील कामासाठी मिळालेले पुरस्कार
संपादन- ’घराबाहेर’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; राष्ट्रीय अभिनय पुरस्कार
- ’तू तिथे मी’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; फिल्मफेअर पुरस्कार
- बे दुणे साडेचार’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट विनोदी अभितेता पुरस्कार
- मृत्युदंड’ (हिंदी)तील अभिनयासाठी स्क्रीन ॲवॉर्ड; फिमफेअर पुरस्कार
- ’रावसाहेब’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; स्क्रीन ॲवॉर्ड
- ’सरीवर सरी’मधील अभिनयासाठी साहाय्यक अभिनेत्यासाठीचा मटा सन्मान
- ’सवत माझी लाडकी’तील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार
मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील अभिनयासाठी
संपादन- गुंडा पुरुष देव’मधील उत्कृष्ट अभिनयासाठी मटा सन्मान
अभिनय कारकिर्दीबद्दल (गौरव) पुरस्कार
संपादन- दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
- पी. सावळाराम पुरस्कार
- मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सु.ल. गद्रे पुरस्कार
- विदर्भभूषण पुरस्कार
- सिनेगोअर्स पुरस्कार
- विष्णूदास भावे पुरस्कार (२०१७)
लेखन पुरस्कार
संपादन- ’नटखट’ या आत्मचरित्राला, पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यक्रमात डॉ. वि.भा. देशपांडे यांच्यातर्फे फय्याज यांच्या हस्ते ’इंदिरा भास्कर पुरस्कार’ देण्यात आला. .