असंभव ही झी मराठी वाहिनीवरून इ.स. २००७-२००९ या काळात प्रसारित झालेली मराठी मालिका आहे. सतीश राजवाडे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले असून चिन्मय मांडलेकर याने या मालिकेचे लेखन केले. १२ फेब्रुवारी २००७ रोजी झी मराठी वरुन ही मालिका प्रसारित होऊ लागली. [१] मानसी साळवी, ऊर्मिला कानेटकर, उमेश कामत, नीलम शिर्के, सुनील बर्वे, आनंद अभ्यंकर, सुहास भालेकर, अशोक शिंदे इत्यादी कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

असंभव
दिग्दर्शक सतीश राजवाडे
निर्माता पल्लवी जोशी
कलाकार मानसी साळवी, ऊर्मिला कानेटकर, उमेश कामत, नीलम शिर्के, सुनील बर्वे, आनंद अभ्यंकर, सुहास भालेकर, अशोक शिंदे
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ७६२
निर्मिती माहिती
कथा संकलन चिन्मय मांडलेकर
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ०८:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग [१]
प्रथम प्रसारण १२ फेब्रुवारी २००७ – २९ ऑगस्ट २००९
अधिक माहिती
आधी कुलवधू
नंतर कळत नकळत

प्रसारणसंपादन करा

१२ फेब्रुवारी २००७ रोजी असंभव मालिकेचा पहिला भाग झी मराठी वरुन प्रसारित झाला. ही मालिका सोमवार ते शनिवार भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ०८:३० वाजता प्रसारित होत असे. [१] २९ ऑगस्ट २००९ रोजी या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित झाला. [ संदर्भ हवा ]

पात्रयोजनासंपादन करा

पात्राचे नाव कलाकार नाते/टिप्पणी
शुभ्रा शास्त्री.
पूर्वजन्मात पार्वती शास्त्री.
मानसी साळवी
ऊर्मिला कानेटकर
शुभ्रा ही आदिनाथ शास्त्री याची पत्नी; तर पूर्वजन्मात हीच पार्वती शास्त्री या नावाने महादेव शास्त्री याची पत्नी असते.
मानसी साळवी आधीच्या काही भागांत या व्यक्तिरेखा रंगवत होती. त्यानंतर मालिका संपेपर्यंत ऊर्मिला कानेटकर हिने या भूमिका रंगवल्या.
आदिनाथ शास्त्री.
पूर्वजन्मात महादेव शास्त्री.
उमेश कामत आदिनाथ शास्त्री हा शुभ्रा हिचा पती; तर पूर्वजन्मात हाच महादेव शास्त्री या नावाने पार्वती शास्त्री हिचा पती असतो.
डॉ. विराज सामंत
पूर्वजन्मात श्रीरंग रानडे
सुनील बर्वे
सुलेखा
पूर्वजन्मात इंदुमती
नीलम शिर्के प्रमुख खलनायिकेची व्यक्तिरेखा.
भालचंद्र
पूर्वजन्मात बल्लाळ
अशोक शिंदे
दीनानाथ शास्त्री आनंद अभ्यंकर
सोपानकाका सुहास भालेकर
अभिमान सरंजामे चिन्मय मांडलेकर
इन्स्पे. विक्रांत भोसले सतीश राजवाडे

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. a b c कानविंदे, वैष्णवी. "'असंभव'चा लवकरच निरोप". १० मार्च २०१३ रोजी पाहिले.



कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.