सुनील बर्वे

नाट्य-चित्रपट अभिनेते
सुनील बर्वे
जन्म ३ ऑक्टोबर, १९६६ (1966-10-03) (वय: ५७)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी नाटक
मराठी चित्रपट
बॉलीवूड
मराठी दूरचित्रवाणी मालिका
हिंदी दूरचित्रवाणी मालिका
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके हमीदाबाईची कोठी
प्रमुख चित्रपट तू तिथं मी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम कळत नकळत, सहकुटुंब सहपरिवार, ग्रहण, कुंकू

सुनील बर्वे (जन्म : ३ ऑक्टोबर, १९६६) हे मराठी-हिंदी-गुजराती नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्येही ते काम करतात.

सुनील बर्वे हे मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले आहेत. त्यांनी यूएस व्हिटॅमिन्स या कंपनीत फक्त एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. आधीपासूनच ते तबल्याच्या आणि गाण्याच्या क्लासला जात असत. ते सात वर्षे तबला शिकले. गांधर्व महाविद्यालयाची मध्यमा ही संगीताची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व करतानाच त्यांचा संबंध थिएटर ग्रुपशी झाला. त्यातूनच त्यांचा विनय आपटे यांच्या अफलातून या संगीत नाटकात शिरकाव झाला (१९८५). त्यांना एका गाणाऱ्या पात्राची भूमिका मिळाली होती. ती भूमिका यशस्वी झाल्यावर सुनील बर्वे यांना ’मोरूची मावशी’ आणि कशी मी राहू तशीच’ यांसारख्या मराठी नाटकांत काम करायले मिळाले,. आणि अभिनयक्षेत्रात उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत गेली. ’तो हा मी सुनील बर्वे’ या एफ.एम. रेडियो ’सुरभी’वरती ते रेडियो जॅकी आहेत.

उल्लेखनीय

संपादन

सुनील बर्वे यांची 'सुबक' नावाची नाट्यसंस्था आहे. या संस्थेतर्फे 'हबेर्रिअम' नावाच्या उपक्रमांतर्गत सुनील बर्वे यांनी काही जुन्या नाटकांचे मर्यादित प्रयोग रंगमंचावर सादर करण्याचे ठरवले आहे. केले. या नाटकांते ते भूमिका करतीलच असे नाही. नाटके अशी :-

 • गारंबीचा बापू
 • झोपी गेलेला जागा झाला (फार्स)
 • दिनूच्या सासूबाई राधाबाई
 • मानापमान
 • मंगेश कदम दिग्दर्शित 'लहानपण देगा देवा'. (प्रयोग चालू झाले)
 • वाहतो ही दुर्वांची जुडी
 • वेड्याचं घर उन्हात
 • शांतेचं कार्टं चालू आहे
 • संशय कल्लोळ
 • प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित 'सूर्याची पिल्ले'. (प्रयोग चालू झाले)
 • सौभद्र

कार्य

संपादन

चित्रपट

संपादन
सुनील बर्वे अभिनीत मराठी चित्रपट
सुनील बर्वे अभिनीत हिंदी चित्रपट
 • अस्तित्व
 • टुन्नू की टिना
 • निदान
सुनील बर्वे अभिनीत मराठी नाटके
 • अफलातून
 • असेच आम्ही सारे
 • आपण ह्यांना ऐकलंत का
 • ऑल दि बेस्ट
 • इथे हवंय कुणाला प्रेम
 • कशी मी राहू तशीच
 • चारचौघी
 • झोपी गेलेला जागा झाला
 • बायकोच्या नकळत
 • मोरूची मावशी
 • म्हणून मी तुला कुठेच नेत नाही
 • लग्नाची बेडी
 • वन रुम किचन
 • श्री तशी सौ
 • हॅलो इन्स्पेक्टर
 • हीच तर प्रेमाची गंमत आहे
 • ह्यांना जमतं तरी कसं
सुनील बर्वे अभिनीत हिंदी नाटके
 • टी, कॉफी और मी
सुनील बर्वे अभिनीत गुजराती नाटके
 • मासीबा
सुनील बर्वे अभिनीत इंग्रजी नाटके
 • ऑल द बेस्ट

दूरचित्रवाणी

संपादन
सुनील बर्वे अभिनीत हिंदी दूरचित्रवाणी मालिका
 • अभी तो मैं जवान हूं
 • आवाज
 • कर्तव्य
 • कोई सूरत नजर नही आती
 • कोरा कागज
 • कौन अपना कौन पराया
 • प्रो. प्यारेलाल
 • सप्तर्षी
 • स्वयम्‌
सुनील बर्वे अभिनीत मराठी दूरचित्रवाणी मालिका
सुनील बर्वे अभिनीत गुजराती दूरचित्रवाणी मालिका
 • छैलछबीला
 • जूठ्ठन जरीवाला
 • ज्योती

सुनील बर्वे यांना मिळालेले पुरस्कार

संपादन
 • ठाण्यातील इंद्रधनू संस्थेचा इंद्रधनू युवोन्मेष पुरस्कार (५-१२-२०१०)
 • पिंपरी-चिंचवड कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलागौरव पुरस्कार (२०-१-२०१५)
 • मोहन वाघ पुरस्कार

बाह्य दुवे

संपादन