श्रीयुत गंगाधर टिपरे

श्रीयुत गंगाधर टिपरे ही झी मराठी वाहिनीवरून इ.स. २००१-२००५ या काळात प्रसारित झालेली मराठी मालिका आहे. ०२ नोव्हेंबर २००१ पासून हिच्या प्रक्षेपणास सुरुवात झाली.[१] १६५ भागांनंतर ०७ जानेवारी २००५ रोजी अखेरचा भाग प्रक्षेपित होऊन ही मालिका संपली.[२] केदार शिंदे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले असून दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले, विकास कदम, रेश्मा नाईक, इत्यादी कलाकारांनी या मालिकेत भूमिका केल्या आहेत. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे झी मराठी वर याचे दोनदा पुनःप्रक्षेपण करण्यात आले होते.

श्रीयुत गंगाधर टिपरे
दिग्दर्शक केदार शिंदे
कलाकार दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले, विकास कदम, रेश्मा नाईक
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १६५
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दर शुक्रवारी रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ०२ नोव्हेंबर २००१ – ०७ जानेवारी २००५

कथानक संपादन

या मालिकेचे कथानक दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदिनी या लोकसत्ता दैनिकात प्रसिद्ध होणाऱ्या सदरांवर आधरित होते. टिपरे कुटुंबात घडणाऱ्या दैनंदिन घटना या ह्या मालिकेचा आधार होता. पुढे ह्या सदरांचे ‘अनुदिनी’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले.

पात्रयोजना संपादन

पात्राचे नाव कलाकार नाते / टिप्पणी
आबा ऊर्फ गंगाधर टिपरे दिलीप प्रभावळकर आजोबा
शेखर टिपरे राजन भिसे गंगाधर टिपरे यांचा पुत्र
शामल टिपरे शुभांगी गोखले शेखर टिपरे याची पत्नी
शिऱ्या ऊर्फ शिरीष टिपरे विकास कदम शेखर टिपरे यांचा पुत्र
शलाका टिपरे रेश्मा नाईक शेखर टिपरे यांची कन्या

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ "टिपरे फॅमिलीचा रामराम घ्यावा". Archived from the original on १३ ऑगस्ट २०१४. १२ फेब्रुवारी २०१३ रोजी पाहिले.
  2. ^ "'टिपरे' का...बंद केली ?". Archived from the original on १३ ऑगस्ट २०१४. १२ फेब्रुवारी २०१३ रोजी पाहिले.