आनंद मोरेश्वर अभ्यंकर (जन्म : २ जून १९६३]]; - २३ डिसेंबर २०१२) हा मराठी चित्रपट, नाटके व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होता. "असंभव", "मला सासू हवी" इत्यादी मराठी दूरचित्रवाणी मालिकांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या.

आनंद अभ्यंकर
जन्म आनंद मोरेश्वर अभ्यंकर
२ जून, इ.स. १९६३
नागपूर, महाराष्ट्र
मृत्यू २३ डिसेंबर, इ.स. २०१२
मुंबई–पुणे द्रुतगतिमार्ग (अपघात)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ - २०१२
भाषा मराठी
वडील मोरेश्वर अभ्यंकर

जीवनसंपादन करा

आनंद अभ्यंकर मूळचे नागपूरचे, त्याचे शालेय शिक्षण नागपुरातील नूतन भारत शाळेत [१] झाले; तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील गरवारे महाविद्यालयात [२] झाले.

कारकीर्दसंपादन करा

चित्रपट-कारकीर्दसंपादन करा

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
इ.स. १९९९ वास्तव हिंदी
इ.स. २००० जिस देश में गंगा रहता है हिंदी
इ.स. २००१ अकलेचे कांदे मराठी
तेरा मेरा साथ रहे हिंदी
इ.स. २००४ कुंकू लावते माहेरचं मराठी दिनकर देशमुख
इ.स. २००६ मातीच्या चुली मराठी
ही पोरगी कुणाची मराठी
इ.स. २००८ चेकमेट मराठी
एक विवाह... ऐसा भी हिंदी
इ.स. २००९ चल चले हिंदी वैष्णवीचे वडील
इ.स. २०१० पप्पू कान्ट डान्स साला हिंदी "आनंद अभ्यंकर" म्हणून
इ.स. २०११ बालगंधर्व मराठी
इ.स. २०१२ स्पंदन मराठी
आनंदाचे झाड मराठी
आयडियाची कल्पना मराठी

दूरचित्रवाणी-कारकीर्दसंपादन करा

वर्ष (इ.स.) कार्यक्रम भाषा भूमिका/सहभाग टिप्पणी
इ.स. २००४ या गोजिरवाण्या घरात मराठी
इ.स. २००८ असंभव मराठी दीनानाथ शास्त्री
अवघाची संसार मराठी
इ.स. २०१० शुभंकरोति मराठी
इ.स. २०११ तारक मेहता का उल्टा चश्मा हिंदी भाऊकाका
इ.स. २०१२ फू बाई फू मराठी
मला सासू हवी मराठी आबा

मृत्यूसंपादन करा

एका चित्रीकरणाचे काम आटोपून पुण्याहून मुंबईकडे प्रवास करत असताना अभ्यंकरांच्या कारला २३ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबई–पुणे द्रुतगतिमार्गावरील उर्से टोलनाक्याजवळ अपघात झाला. त्यांच्या सोबत असलेला सहअभिनेता अक्षय पेंडसे याचा [३]. दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला. तर निगडीतल्या लोकमान्य इस्पितळातील उपचारांदरम्यान आनंद अभ्यंकर याचेही निधन झाले. [३].

आनंद अभ्यंकर मित्र परिवारसंपादन करा

२०१३ सालापासून, आनंद अभ्यंकर मित्र परिवारातर्फे रंगभूमीची सेवा करणाऱ्या कलावंताला किंवा कार्यकर्त्याला दरवर्षी आनंदरंग पुरस्कार देण्यात येतो.

  • २०१३ साली रंगकर्मी दिनेश गोसावी यांना पहिला आनंदरंग पुरस्कार पुरस्कार देण्यात आला.
  • २०१४ सालचा पुरस्कार शिवाजी मंदिरातील चहावाले बाळू वासकर यांना प्रदान झाला.
  • २०१५साली मोहम्मद चाचा याना हा पुरस्कार मिळाला.
  • २०१६ साली हा पुरस्कार पडद्यामागचे कलाकार विठ्ठल हुलावळे यांना देण्यात आला.

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. ^ भाकरे,राम. "नागपुरी ऋणानुबंधांचा 'आनंद' हरवला". ६ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "मराठी सिनेसृष्टीतील 'आनंद' हरपला". ६ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b "अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे निधन". ५ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवेसंपादन करा