कियारा अडवाणी
भारतीय अभिनेत्री
कियारा अडवाणी मल्होत्रा (३१ जुलै १९९१ - हयात) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. कियाराने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या फगली नावाच्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ सालच्या एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी ह्या चित्रपटात महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीच्या भूमिकेत कियारा चमकली. तसेच तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीने ७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रेमविवाह केला.
कियारा अडवाणी मल्होत्रा | |
---|---|
जन्म |
आलिया अडवाणी ३१ जुलै, १९९२ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | २०१४ - चालू |
भाषा | हिंदी |
पती | [१] |
संदर्भ संपादन
- ^ "It's official! Kiara Advani and Sidharth Malhotra are now married!". The Times of India. 7 February 2023. Archived from the original on 9 February 2023. 27 July 2019 रोजी पाहिले.
बाह्य दुवे संपादन
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कियारा अडवाणी चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत