जुलै ३१
25August 1994
(३१ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१२ वा किंवा लीप वर्षात २१३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनआठवे शतक
संपादनअकरावे शतक
संपादन- १००९ - सर्जियस चौथा पोपपदी.
पंधरावे शतक
संपादन- १४९८ - क्रिस्टोफर कोलंबस त्रिनिदादला पोचला.
अठरावे शतक
संपादन- १७०३ - डॅनियेल डॅफोला सरकारविरुद्ध वात्रटिका लिहिल्याबद्दल राजद्रोहाच्या आरोपाखाली चौकात बांधून ठेवून दगडांनी मारण्याची शिक्षा. या वात्रटिका जनतेला इतक्या आवडल्या की त्यांनी डॅफोला दगडांऐवजी फुले मारली.
एकोणिसावे शतक
संपादन- १८५६ - न्यू झीलंडची राजधानी क्राइस्टचर्चची स्थापना.
विसावे शतक
संपादन- १९१७ - पहिले महायुद्ध - य्प्रेसची तिसरी लढाई.
- १९३२ - जर्मनीतील निवडणुकांत नाझी पार्टीला ३८% मते मिळाली.
- १९४० - अमेरिकेत कुयाहोगा फॉल्स, ओहायो येथे रेल्वे अपघात. ४३ ठार.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या पंतप्रधान पिएर लव्हालने दोस्त राष्ट्रांसमोर आत्मसमर्पण केले.
- १९४८ - न्यू यॉर्कचा आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला.
- १९५१ - जपान एरलाइन्सची स्थापना.
- १९५४ - इटलीच्या अर्दितो देसियोच्या नेतृत्वाखाली गिऱ्यारोहक पथकाचे के-२ शिखरावर पहिले यशस्वी आरोहण.
- १९५६ - ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर जिम लेकरने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.
- १९७१ - अपोलो १५च्या अंतराळवीरांनी चंद्रावर पहिल्यांदा मानवनिर्मित बग्गी चालवली.
- १९७३ - डेल्टा एरलाइन्सचे विमान बॉस्टनच्या लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. ८९ ठार.
- १९७५ - अमेरिकेतील टीम्स्टर युनियनचा नेता जिमी हॉफा गायब.
- १९८१ - पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू.
- १९८७ - कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान.
- १९८८ - मलेशियाच्या बटरवर्थ शहरात फेरीवर जाण्यासाठीचा पूल कोसळला. ३२ ठार, १,६७४ जखमी.
- १९९२ - थाई एरवेझचे एरबस ए.३०० प्रकारचे विमान नेपाळची राजधानी काठमांडूजवळ कोसळले. ११३ ठार.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- ११४३ - निजो, जपानी सम्राट.
- १५२७ - मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १९०२ - सर ऑस्वाल्ड ब्राउनिंग ऍलन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१२ - बिल ब्राउन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१२ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.
- १९१९ - लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - जिमी कूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४१ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.
- १९७५ - अँड्रु हॉल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८२ - ब्लेसिंग माहविरे, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ११०८ - फिलिप पहिला, फ्रांसचा राजा.
- १५०८ - नाओद, इथियोपियाचा सम्राट.
- १५४७ - फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.
- १७५० - होआव पाचवा, पोर्तुगालचा राजा.
- १८७५ - अँड्रु जॉन्सन, अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष.
- १९४३ - हेडली व्हेरिटी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू (युद्धबंदी असताना).
- १९७२ - पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान.
- १९८० - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.
- १९९३ - बॉद्वां पहिला, बेल्जियमचा राजा.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- हरी पहलावान - मलेशिया.
- का हेइ हवाई - हवाई.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जुलै ३१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै २९ - जुलै ३० - जुलै ३१ - ऑगस्ट १ - ऑगस्ट २ - जुलै महिना