सिद्धार्थ जाधव

अभिनेता

सिद्धार्थ रामचंद्र जाधव (२३ ऑक्टोबर, इ.स. १९८१ - हयात) हा मराठी चित्रपटांतील अभिनेता आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले.

सिद्धार्थ जाधव
सिद्धार्थ रामचंद्र जाधव
जन्म २३ ऑक्टोबर, १९८१ (1981-10-23) (वय: ४२)
मुंबई, महाराष्ट्र
इतर नावे सिद्धू
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, टीव्ही, नाटक)
कारकीर्दीचा काळ २००५ ते आजतागायत
भाषा मराठी (स्वभाषा)
मराठी, हिंदी (अभिनय)
प्रमुख नाटके जागो मोहन प्यारे, लोच्या झाला रे
प्रमुख चित्रपट जत्रा, दे धक्का, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
पत्नी
तृप्ती अक्कलवार (ल. २००७)

परिचय

संपादन

सिद्धार्थ जाधवचा जन्म २३ ऑक्टोबर, इ.स. १९८१ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. त्याने ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या 'तुमचा मुलगा करतो काय' या नाटकामधून प्रकाशझोतात आला.

चित्रपट कारकीर्द

संपादन
वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
इ.स. २००४ अगं  बाई  अर्रेचा !  मराठी
इ.स. २००६ जत्रा मराठी सिद्धू
गोलमाल : फन  अनलिमिटेड हिंदी
इ.स. २००७ जबरदस्त मराठी
बकुळा नामदेव घोटाळे मराठी नामदेव
इ.स. २००८ साडे माडे तीन मराठी
दे धक्का मराठी धनाजी
उलाढाल मराठी सिकंदर
बाप रे बाप डोक्याला ताप मराठी
गलगले निघाले मराठी
सालीने केला घोटाळा मराठी
इ.स. २००९ गाव तसं चांगलं मराठी
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मराठी उस्मान पारकर
इ.स. २०१० हुप्पा हुय्या (२०१०) मराठी हणम्या
शिक्षणाच्या आयचा घो मराठी इब्राहिमभाई
लालबाग परळ मराठी गण्या
क्षणभर विश्रांती मराठी
इरादा पक्का मराठी रोहित
इ.स. २०११ फक्त लढा म्हणा मराठी
इ.स. २०१२ कुटुंब मराठी मामू
इ.स. २०१३ टाईम प्लीज मराठी
खो -खो मराठी
इ.स. २०१४ प्रियतमा मराठी
इ.स. २०१५ मध्यमवर्ग मराठी
रझाकार मराठी हरी
इ.स. २०१६ दुनिया  गेली  तेल  लावत
इ.स.

२०१८

सिम्बा हिंदी इन्स्पेक्टर

नाटके

संपादन
  • जागो मोहन प्यारे
  • तुमचा मुलगा करतोय काय
  • लोच्या झाला रे
  • गेला उडत

दूरचित्रवाणी मालिका

संपादन
  • हसा चकट फू
  • घडलंय बिघडलंय
  • आपण यांना हसलात का?
  • बा, बहू और बेबी (हिंदी)
  • हे तर काहीच नाय
  • आता होऊ दे धिंगाणा

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन