शब्दार्थ आणि इतिहास

संपादन

सर्वात पहिला अभिनेता म्हणून ईकरिआ (Icaria) येथील प्रचीन ग्रिक थेस्पीस (Thespis) याला ओळखले जाते. एका दंतकथेनुसार (पुर्वापार चालत आलेल्या गोष्टीनुसार) थेस्पीस काव्यत्मक निवेदनातून बाहेर यायचा व वेगळ्याच पात्राच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधायचा. थेस्पीस अभिनय सुरू करण्यापूर्वी, निवेदक गोष्टीचे निवेदन करत असे (उदा. "डायोनिससने असे केले, डायोनिसस असे म्हणाला" इ.) निवेदनानंतर जेव्हा थेस्पीस लोकांसमोर येई तेव्हा तो जणू काही तेच पात्र आहे असे बोलत असे. ( उदा. " मी आहे डायोनिसस, मी हे केले" इ.). थेस्पीसच्या नावावरून थेस्पियस हा शब्द तयार झाला.

अभिनयासाठी तुमच्याकडे अनेक प्रकारची कौशल्ये असण्याची गरज असते. जसे की, आवाजाची फेक, स्पष्ट उच्चार, देहबोली, भावनिक आरेखन, उत्कृष्ठ कल्पनाशक्ती, आणि नाट्य (नाट्य स्वरूपात कल्पना) सादर करण्याची क्षमता. अभिनय क्षेत्रात याशिवायही भाषेवरील प्रभुत्व, उच्चार आणि देहबोली, सादरीकरण (सादरीकरणाची क्षमता), निरिक्षण आणि नकला करण्याची क्षमता, मुकाभिनय, आणि रंगमंचाची भूक (अभिनयाची भूक) इत्यादी गोष्टींची आवशक्यता असते. अनेक अभिनेते, या प्रकारची कौशल्ये विकसीत करायाला शिकविणा-या खास कार्यशाळेतून, किंवा महाविद्यालयातून तयार झालेले असतात. आपली त्या गोष्टीची भूक भागवता आली पाहिजे आपणास कलेतील माहिती असणे गरजेचे असते समोरच्याला आपण कोणत्या प्रकारे आपली कला दाखवतो त्या वर अभिनेत्याची ओळख निर्माण होत असते.

‘अभिनय’ हा निव्वळ एक शब्द नसून ती एक संकल्पना आहे. तो एक विचार आहे, आणि विचार म्हटला की विचारधारा आली, सैद्धांतिक मांडणी आली. ‘अभिनय’ या संकल्पनेचा विचार हा मानवी अस्तित्वाइतकाच प्राचीन असला पाहिजे.

मुकाभिनय

एखादी कथा सांगण्यासाठी न बोलता केवळ शरीराच्या आणि हाताच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचा केलेला वापर म्हणजेच मूकाभिनय, मूकनाट्य होय.

(Mime act:- the use of movements of your hands and body and the expression on your face to tell a story or to act something without speaking; a performance using this method of acting.)

आपल्या मनातील भावना हाताची हालचाल आणि देहबोलीतून मूकपणे सादर करणे म्हणजे मायमिंग. अंधारात कलाकाराची कला स्पष्ट दिसावी यासाठी डोक्यापासून पायापर्यत पांढऱ्या शुभ्र कापडात शरीर लपेटून चेहऱ्यावरील अवयव काळ्या आणि लाल रंगाने रंगवून हायलाइट केले जातात.

मुकाभिनय हा संवादाचाच एक भाग आहे. चेहऱ्यावरची इवलीशी रेषा हलवून संवाद साधण्याच्या कलेत आपण तरबेज असतो. बायको स्वयंपाक करते. त्या माध्यमातूनही ती आपल्याशी संवाद साधण्याचाच प्रयत्नच करत असते. आपण टिव्ही पहात जेवणात मश्गुल झालेलो असतो. ती मात्र स्वयंपाक कसं झाला असावा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा वाचण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक छान झाला असेल तर बऱ्याचदा आपल्याकडून प्रतिक्रिया द्यायची राहून जाते. कारण आपण त्या चवीत रमून गेलेलो असतो. पण चव थोडीजरी बिघडलेली असेल तर आपण वसकन अंगावर धावून जातो. आणि मग नवरा बायकोतला संवाद बिघडतो. असे आपण प्रत्येक क्षणी संवाद साधण्याच्या प्रतीक्षेत असतो. पण संवाद साधण्यासाठी आधी तो कुणा कडून तरी व्यक्त व्हावा लागतो.

वर्ल्ड माईम डे हा जागतिक माईम ऑर्गनायझेशनचा एक जागतिक उपक्रम आहे. आर्ट ऑफ माईम साजरी करण्यासाठी २२ मार्च तारीख निवडण्याचे कारण म्हणजे प्रसिद्ध फ्रेंच माईम कलाकार मार्सेल मार्सेऊ यांचा जन्मदिवस आहे. २०११ पासून हा दिवस जगातील चारही खंडात साजरा केला जात आहे. मात्र याला अजूनही युनेस्कोची मान्यता मिळालेली नाही.

१९९८ मध्ये पॅरिस येथे मार्सेल यांच्या माइम स्कूलमध्ये त्यांचे मित्र व सहकारी मार्को स्टेझानोव्हिक यांनी आयोजित केलेल्या या लहान दौऱ्याचसाठी इस्त्राइलचे माइम कलाकार ओफर ब्लम आले होते. ब्लम आणि स्टेझानोव्हिक यांच्या प्राथमिक चर्चेतून आर्ट ऑफ माइमला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी व प्रोत्साहन मिळण्यासाठी जागतिक माइम डे साजरा करण्याचे ठरले. पण तारीख ठरत नव्हती. २०११ पर्यंत ही सूचलेली कल्पना तशीच राहिली. २००४ मध्ये वर्ल्ड माइम ऑर्गनायझेशनची सर्बियामध्ये स्थापना करण्यात आली. कारण संस्था स्थापनेची सर्वात कमी कागदपत्र सर्बियामध्ये लागत असत. २००७ मध्ये मार्सेल यांचे निधन झाले. एप्रिल २०११ मध्ये जीन बर्नाड लॅकलोटे यांने जागतिक माइम डे व जर्नी मॅन्यूअल डू माईमची एक विकसित कल्पना स्टेझोनोव्हिकला इमेल केली. त्यावेळेस ब्लूम व स्टेझोनोव्हिक यांना जागतिक माइम डेवरील चर्चा आठवली. आर्ट ऑफ माइममधील सर्वात मोठी व्यक्तीव समजला जाणारा आपला मित्र मार्सेलच्या नावाला अजरामर करण्यासाठी २२ मार्च ही या दिवसाची तारीख त्यांनी ठरवली.

व्यावसायिक अभिनेते

संपादन

संदर्भदूवे

संपादन

^ Csapo and Slater (1994, 257); hypokrisis, which literally means "acting," was the word used in discussions of rhetorical delivery.

स्रोत

संपादन