लालबाग परळ (हिंदी नाव: सिटी ऑफ गोल्ड) हा २०१० साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. मुंबई शहरामधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित असलेल्या लालबाग परळचे दिग्दर्शन महेश मांजरेकरने केले असून शशांक शिंदे, सीमा विश्वासअंकुश चौधरी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.

लालबाग परळ
दिग्दर्शन महेश मांजरेकर
निर्मिती अरुण रंगाचारी
कथा जयंत पवार
प्रमुख कलाकार शशांक शिंदे
सीमा विश्वास
अंकुश चौधरी
अनुषा दांडेकर
सिद्धार्थ जाधव
सचिन खेडेकर
समीर धर्माधिकारी
गीते श्रीकांत गोडबोले
संगीत अशोक परब
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २३ एप्रिल २०१०
वितरक एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रा.लि.

ऐंशीच्या दशकातील गिरणगावामधील गिरणीकामगारांच्या अयशस्वी ठरलेल्या वादग्रस्त संपामुळे एका कुटुंबाची झालेली वाताहत ह्या चित्रपटामध्ये रंगवली गेली आहे. लालबाग परळ चित्रपट सिटी ऑफ गोल्ड ह्या नावाने एकाच वेळी हिंदीमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला.

बाह्य दुवेसंपादन करा