सोनाली मनोहर कुलकर्णी

मराठी अभिनेत्री

सोनाली मनोहर कुलकर्णी (जन्मतारीख : १८ मे, १९८८) ही अभिनेत्री असून ती प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करते. कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर, सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला झी गौरव पुरस्कारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. ती मुळची पुण्याची आहे. सोनाली ही प्रामुख्याने तिच्या नटरंग ह्या चित्रपटामधील 'अप्सरा आली' ह्या लावणीनृत्यासाठी साठी ओळखली जाते. [१] ह्या अभिनयासाठी तिला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा आणि झपाटलेला २ अशा चित्रपटांमध्ये काम केले. २०१४ मध्ये सोनालीने स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासमवेत मितवा हा चित्रपट केला होता. या चित्रपटासाठी तिला झी गौरव पुरस्कारच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकरीता नामांकन प्राप्त झाले. तिने ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी, ममता हिची भूमिका केली.[२] तसेच अजय देवगण याच्या सिंघम २ ह्या चित्रपटात देखील सोनाली ने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. [३]

सोनाली कुलकर्णी
जन्म १८ मे, १९८८ (1988-05-18) (वय: ३६)
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
कारकीर्दीचा काळ २००५ - आत्तापर्यंत
भाषा मराठी
हिंदी
वडील मनोहर कुलकर्णी
आई सविंदर कुलकर्णी
पती
कुणाल बेनोडेकर (ल. २०२१)
अधिकृत संकेतस्थळ सोनालीकुलकर्णी.कॉम

आयुष्य आणि कारकीर्द

संपादन

सुरुवातीची काही वर्षे (१९८८-२००६)

संपादन

मनोहर आणि सविंदर कुलकर्णी या दांपत्याच्या पोटी, १८ मे १९८८ रोजी, खडकी , पुणे येथील लष्करी छावणीमध्ये सोनालीचा जन्म झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात ३० वर्षे काम केले आहे. तिच्या आई, सविंदर ह्या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD (सेन्ट्रल आॅर्डनन्स डेपो)) येथे काम केले आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तिने पु्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. [४]पुण्याच्याच इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

तिला अतुल हा लहान भाऊ असून तोही चित्रपटक्षेत्रात कार्यरत आहे.[५]

पदार्पण आणि कारकिर्दीतील चढ-उतार (२००६-१०)

संपादन

चित्रपटांची सूची

संपादन
वर्ष नाव भाषा पात्र Ref(s)
२००६ गौरी मराठी गौरी
२००६ गाढवाचं लग्न मराठी रंभा
२००७ बकुळा नामदेव घोटाळे मराठी बकुळा
२००८ आबा झिंदाबाद मराठी रेश्मा
२००९ हाय काय नाय काय मराठी मल्लिका लोखंडे
२०१० समुद्र मराठी नंदा
२०१० स सासूचा मराठी अश्विनी/आशु
२०१० इरादा पक्का मराठी आद्या
२०१० गोष्ट लग्नानंतरची मराठी राधा
२०१० क्षणभर विश्रांती मराठी सानिका
२०१० नटरंग मराठी नयना कोल्हापूरकरीन
२०१२ अजिंठा मराठी पारो
२०१३ ग्रँड मस्ती हिंदी ममता [६]
२०१३ झपाटलेला २ मराठी मेघा [७]
२०१४ सिंघम रिटर्न्स हिंदी मेनका [३]
२०१४ रमा माधव मराठी आनंदीबाई [८]
२०१५ क्लासमेट्स मराठी अदिती [९]
२०१५ मितवा मराठी नंदिनी [१०]
२०१५ शटर मराठी सोनाली [११]
२०१५ टाईमपास २ मराठी पाहुणी कलाकार [१२]
२०१६ पोश्टरगर्ल मराठी रुपाली थोरात [१३]
२०१७ बघतोस काय मुजरा कर मराठी गौरी भोसले [१४]
२०१७ तुला कळणार नाही मराठी अंजली
२०१७ हंपी मराठी ईशा
२०१९ ती & ती मराठी प्रियंका
२०१९ हिरकणी मराठी हिरकणी
२०१९ विक्की वेलिंगकर मराठी विक्की वेलिंगकर
२०२० धुरळा मराठी
२०२० झिम्मा मराठी
२०२१ पांडू मराठी उषा केळेवाली

बाह्य दुवे

संपादन


संदर्भ आणि नोंदी

संपादन
 1. ^ "दै.सकाळ/इसकाळ 'साधी simple ... अप्सरा!' -ले.श्रीकांत कात्रे". Archived from the original on 2012-11-07. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
 2. ^ August 31, Suhani Singh; September 9, 2013 ISSUE DATE:; September 8, 2013UPDATED:; Ist, 2013 20:48. "Marathi actress Sonalee Kulkarni to make Bollywood debut in the adult comedy Grand Masti". India Today.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
 3. ^ a b "Sonalee Kulkarni wins praise for her act in Singham Returns - Times of India". The Times of India.
 4. ^ "Sonalee Kulkarni - About Me". sonaleekulkarni.com.
 5. ^ "Atul Kulkarni turns assistant director - Times of India". The Times of India.
 6. ^ "Sonalee Kulkarni is Marathi cinema's poster girl for women-centric subjects - Times of India". The Times of India.
 7. ^ "Sonalee Kulkarni set to make her Bollywood debut - Times of India". The Times of India.
 8. ^ http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Rama-Madhav-houseful/articleshow/43523893.cms%7C
 9. ^ "Classmates' first look revealed - Times of India". The Times of India.
 10. ^ http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Swwapnil-Joshi-Mitwaa-Meenakshi-Sagar-Sonalee-Kulkarni-Duniyadari-Shankar-Mahadevan-Shankar-Ehsaan-Loy-Swapna-Waghmare-Joshi-Prarthana-Behere/articleshow/38678024.cms%7C
 11. ^ December 15, Aditi Pai; December 28, 2015 ISSUE DATE:; December 21, 2015UPDATED:; Ist, 2015 15:46. "Five visionaries from Pune tell you what's on their New Year wishlist". India Today.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
 12. ^ "TP2 starcast: Mystery continues - Times of India". The Times of India.
 13. ^ "Priyanka Chopra is my Poshter Girl: Sonalee - Times of India". The Times of India.
 14. ^ "Baghtos Kay Mujra Kar | 3 February 2017 - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre". marathicineyug.com.[permanent dead link]