मे १८
दिनांक
(१८ मे या पानावरून पुनर्निर्देशित)
मे १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३८ वा किंवा लीप वर्षात १३९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
तेरावे शतकसंपादन करा
सतरावे शतकसंपादन करा
- १६५२ - अमेरिकेच्या ऱ्होड आयलंड राज्याने गुलामगिरी बेकायदेशीर ठरवली.
अठरावे शतकसंपादन करा
- १७६५ - कॅनडातील मॉॅन्ट्रिआल शहरात भीषण आग.
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८०३ - युनायटेड किंग्डमने एमियेन्सचा तह झिडकारला व फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८०४ - नेपोलियन बोनापार्ट फ्रांसच्या सम्राटपदी.
- १८६९ - जपानचे एझो प्रजासत्ताक बरखास्त.
- १८७६ - कॅन्ससच्या डॉज सिटी शहरात वायेट अर्प पोलिसकामात रुजू झाला.
विसावे शतकसंपादन करा
- १९०० - युनायटेड किंग्डमने टोंगा आपल्या साम्राज्याचा भाग असल्याचे जाहीर केले.
- १९१७ - अमेरिकन काँग्रेसने नागरिकांना सक्तीने सैन्यात भरती करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला दिला.
- १९२७ - मिशिगनच्या बाथ शहरात शाळेच्या अधिकाऱ्याने शाळेत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट. ४५ ठार.
- १९४४ - दुसरे महायुद्ध-मॉन्टे कॅसिनोची लढाई - उभय पक्षातील २०,००० सैनिकांच्या मृत्यूनंतर जर्मन सैन्याची पीछेहाट.
- १९५३ - जॅकी कॉक्रन ही स्वनातीत विमान चालवणारी प्रथम स्त्री ठरली.
- १९५८ - अमेरिकेच्या एफ.१०४ स्टारफायटर विमानाने ताशी २,२५९.८२ कि.मी.चा वेग गाठून विक्रम प्रस्थापित केला.
- १९६९ - अपोलो १०चे प्रक्षेपण.
- १९७४ - भारताने पोखरण १ परमाणू परीक्षण केले. परमाणू ताकद असणारा सहावा देश झाला.
- १९८० - अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील माउंट सेंट हेलेन्स या ज्वालामुखीचा उद्रेक. ५७ ठार. ३,००,००,००,००० अमेरिकन डॉलरचे नुकसान.
- १९८० - पेरूमध्ये शायनिंग पाथ या अतिरेकी संघटनेने मतदान केन्द्रावर हल्ला चढवून आपल्या कारवायांची सुरुवात केली.
- १९९२ - अमेरिकेच्या संविधानातील २७वा बदल अधिकृतरीत्या मान्य.
- १९९५ - अलेन जुप्पे फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
एकविसावे शतकसंपादन करा
- इ.स. २०१५ - मुंबईच्या केईएम हॉस्पिलमध्ये नर्स असलेल्या अरुणा शानबाग यांचे निधन.
जन्मसंपादन करा
- १०४८ - उमर खय्याम, पर्शियन कवी.
- १६८२ - छत्रपती शाहूराजे भोसले, मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती
- १७९७ - फ्रेडेरिक ऑगस्टस दुसरा, सॅक्सनीचा राजा.
- १८६८ - निकोलाई अलेक्सांद्रोविच रोमानोव्ह, रशियाचा शेवटचा झार.
- १८७२ - बर्ट्रान्ड रसेल, इंग्लिश तत्त्वज्ञानी व गणितज्ञ.
- १८७६ - हरमन म्युलर, जर्मनीचा चान्सेलर.
- १८८३ - युरिको गॅस्पर दुत्रा, ब्राझिलचा पंतप्रधान.
- १८९७ - फ्रॅंक काप्रा, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक.
- १९०५ - हेडली व्हेरिटी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२० - पोप जॉन पॉल दुसरा.
- १९२३ - ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.
- १९३१ - डॉन मार्टिन, अमेरिकन व्यंगचित्रकार.
- १९३३ - एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान.
- १९५५ - चौ युन फॅट, हॉंग कॉंगचा अभिनेता.
मृत्यूसंपादन करा
- १४५० - सेजॉॅंग, कोरियाचा सम्राट.
- १५८४ - इकेदा मोटोसुके, जपानी सामुराई.
- १६७५ - जॉक मार्केट, फ्रेंच जेसुइट धर्मप्रचारक व शोधक.
- १८४६ - बाळशास्त्री जांभेकर, मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार.
- १९५६ - मॉरिस टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता.
- १९९७ - कमलाबाई रघुनाथराव गोखले, भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार.
- २०२० - रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर मे १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)