कमलाबाई रघुनाथराव गोखले

कमलाबाई रघुनाथराव गोखले तथा कमला कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम बाल स्त्री-कलाकार होत्या. कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांना चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला कलाकार बनण्याचा मान मिळाला. या दोघींनी एकाच वेळी आणि एकत्र दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासुर या मूकपटात काम केले.[१]

Kamalabai Gokhle
जन्म 1909
मुंबई, ब्रिटिश भारत
मृत्यू 1997 (aged 87–88)
राष्ट्रीयत्व भारतभारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
वडील आनंद नानोसकर
आई दुर्गाबाई कामत
पती रघुनाथराव गोखले
अपत्ये  •  चंद्रकांत गोखले,
 • लालजी गोखले,
 • सूर्यकांत गोखले

कौटुंबिक माहिती

संपादन

कमलाबाई या दुर्गाबाई कामत आणि मुंबईच्या जे.जे स्कूल ऑफ आर्ट्‌समधील प्राध्यापक आनंद नानोसकर यांची कन्या होत. रघुनाथ गोखले हे त्यांचे पती. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले व सूर्यकांत गोखले ही त्यांची तीन मुले होत. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दोघे तबलावादक होते तर चंद्रकांत गोखले चित्रपट आणि नाट्य अभिनेता होते. चंद्रकांत गोखले यांचे पुत्र विक्रम गोखले हेदेखील चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत.

कमलाबाई गोखले यांची भूमिका असलेले हिंदी चित्रपट

संपादन
 • अफ़गान अबला (१९३४)
 • अंबरीश (१९३४)
 • अल्लादीन और जादुई चिराग (१९५२)
 • आख़री ग़लती (१९३६)
 • एक नज़र (१९७२)
 • औरत का दिल (१९३३)
 • कृष्ण सुदामा (१९३३)
 • ग़रीब का लाल (१९३९)
 • गहराई (१९८०)
 • गुणसुंदरी सुशीला (१९३४)
 • चंद्रहास (१९३३)
 • चाबुकवाली (१९३८)
 • चार चक्रम (१९३२)
 • देवी देवयानी शर्मिष्ठा (१९३१)
 • नवजीवनम कमला (१९४९)
 • नास्तिक कमला (१९५४)
 • नीति विजय (१९३२)
 • प्रभुका प्यारा (१९३६)
 • बॅरिस्टर्स वाईफ़ (१९३५)
 • बाल्यकालसखी (१९६७)
 • बिख़रे मोती (१९३५)
 • बे ख़राब जन (१९३६)
 • भूतियो महाल (१९३२)
 • भूल भुलैयॉं (१९३३)
 • भोला शिकार (१९३३)
 • मिर्ज़ा साहिबॉं (१९३३)
 • मोहिनी भस्मासुर (१९३१)
 • राजरानी मीरा (१९३३)
 • लाल-ए-यमन लालारुख (१९३३)
 • शैल बाला (१९३२)
 • सोना चांदी (१९४६)
 • स्टंट किंग (१९४४)
 • स्ट्रीट सिंगर (१९३८)
 • हक़दार (१९४६)
 • हलचल (१९७१)

संदर्भ

संपादन
 1. ^ "कमलाबाई गोखले-कामत". १७ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.