विक्रम गोखले

मराठी नाट्य-चित्र अभिनेते


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

विक्रम गोखले ( पुणे, ३० ऑक्टोबर, इ.स. १९४७) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे, अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले, सन २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला आहे.(फेब्रुवारी २०१६ची बातमी). सध्या नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे काम ते करत आहेत.

विक्रम गोखले
विक्रम गोखले
जन्म विक्रम गोखले
३० ऑक्टोबर, १९४७
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
वडील चंद्रकांत गोखले
पत्नी वृषाली

कौटुंबिक माहितीसंपादन करा

विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांच्या पत्‍नीचे नाव वृषाली.

विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.


विक्रम गोखले यांची गाजलेली नाटकेसंपादन करा

 • एखादी तरी स्मितरेषा
 • कथा
 • कमला
 • कल्पवृक्ष कन्येसाठी
 • के दिल अभी भरा नही
 • खरं सांगायचं तर
 • छुपे रुस्तम
 • जावई माझा भला
 • दुसरा सामना
 • नकळत सारे घडले
 • पुत्र मानवाचा
 • बॅरिस्टर
 • मकरंद राजाध्यक्ष
 • महासागर
 • मी माझ्या मुलांचा
 • संकेत मीलनाचा
 • समोरच्या घरात
 • सरगम
 • स्वामी


विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपटसंपादन करा

 • मॅरेथॉन जिंदगी (२०१७)
 • आघात (२०१० दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट)
 • आधारस्तंभ
 • आम्ही बोलतो मराठी
 • कळत नकळत (१९९१)
 • ज्योतिबाचा नवस
 • दरोडेखोर (१९८०)
 • दुसरी गोष्ट (२०१४)
 • दे दणादण
 • नटसम्राट (२०१५)
 • भिंगरी (१९७७)
 • महानंदा (१९८५)
 • माहेरची साडी (१९९१)
 • लपंडाव (१९९३)
 • वजीर
 • वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३)
 • वासुदेव बळवंत फडके
 • सिद्धान्त

[१]

विक्रम गोखले यांचे हिंदी चित्रपटसंपादन करा

 • अकेला (१९९१)
 • अग्निपथ (१९९०)
 • अधर्म (१९९२)
 • आंदोलन (१९९५)
 • इन्साफ (१९८७)
 • ईश्वर (१९८९)
 • कैद में है बुलबुल (१९९२)
 • क्रोध (१९९०)
 • खुदा गवाह (१९९२)
 • घर आया मेरा परदेसी (१९९३)
 • चँपियन (२०००)
 • जख़मों का हिसाब (१९९३)
 • जज़बात (१९९४)
 • जय बाबा अमरनाथ (१९८१)
 • तडीपार (१९९५)
 • तुम बिन (२००१)
 • थोडासा रूमानी हो जाय (१९९०)
 • धरम संकट (१९९१)
 • परवाना (१९७१)
 • प्रेमबंधन (१९७९)
 • फलक द स्काय (१९८८)
 • बदमाश (१९९८)
 • बलवान (१९९२)
 • मुक्ता (१९९४)
 • यही है जिंदगी (१९७७)
 • याद रखेगी दुनिया (१९९२)
 • लाईफ पार्टनर (२००९)
 • लाड़ला (१९९४)
 • वजीर (१९९४)
 • श्याम घनश्याम (१९९८)
 • सती नाग कन्या (१९८३)
 • सलीम लंगडे पे मत रो (१९८९)
 • स्वर्ग नरक (१९७८)
 • हम दिल दे चुके सनम (१९९९)
 • हसते हसते (१९९८)
 • हे राम (२०००)

दूरचित्रवाणी मालिकासंपादन करा

 • अकबर बिरबल (दूरदर्शन-१९९०)
 • अग्निहोत्र (स्टार प्रवाह)
 • अल्पविराम
 • उडान (दूरदर्शन-१९९०-९१)
 • कुछ खोया कुछ पाया (दूरदर्शन)
 • जीवनसाथी
 • द्विधाता
 • मेरा नाम करेगा रोशन
 • या सुखांनो या (झी मराठी)
 • विरुद्ध
 • संजीवनी (२००२)
 • सिंहासन (२०१३)

पुरस्कारसंपादन करा

 • ’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून)
 • विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५)
 • बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्कार
 • हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार (४-८-२०१७)
 • पुलोत्सव सन्मान (डिसेंबर २०१८)
 1. ^ http://marathistars.com/movies/marathon-zindagi-marathi-movie/