चंद्रकांत रघुनाथ गोखले
चंद्रकांत रघुनाथ गोखले (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते.
चंद्रकांत गोखले | |
---|---|
जन्म |
चंद्रकांत रघुनाथ गोखले जानेवारी ७, इ.स. १९२१ मिरज, सांगली संस्थान |
मृत्यू |
जून २०, इ.स. २००८ पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | मराठा, भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट, नाटके), गायन |
भाषा |
मराठी (मातृभाषा व अभिनय) हिंदी (अभिनय) |
प्रमुख नाटके |
List
|
प्रमुख चित्रपट | {{Collapsible list |
पुरस्कार |
चिंतामणराव कोल्हटकर स्मृती पुरस्कार मा. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार नाट्य परिषद जीवनगौरव नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक पुरस्कार पुणे महापालिका बालगंधर्व पुरस्कार विष्णूदास भावे गौरवपदक व्ही. शांताराम पुरस्कार छत्रपती शाहू पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान पुरस्कार |
आई | कमलाबाई गोखले |
अपत्ये | विक्रम गोखले, अपराजिता मुंजे |
मराठी अभिनेत्री कमलाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत.
कारकीर्द
संपादनअभिनय
संपादनयांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकीर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या.
गायन
संपादनअभिनेते चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते.
गदिमा लिखित, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १०व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. [१] [ दुजोरा हवा]
मृत्यू
संपादनआयुष्याच्या अखेरीस गोखले कर्करोगाने ग्रस्त होते. जून २०, इ.स. २००८ रोजी भाप्रवे सुमारे ०६३० वाजता पुण्यातील जोशी रुग्णालयात त्यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले[२].
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ http://www.misalpav.com/comment/565033#comment-565033
- ^ "चंद्रकांत गोखले यांचं निधन" (इंग्लिश भाषेत). ७ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
बाहय दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील चंद्रकांत रघुनाथ गोखले चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |