नटसम्राट (नाटक)

कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक
(नटसम्राट, नाटक या पानावरून पुनर्निर्देशित)

नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला.

नटसम्राट
लेखन विष्णू वामन शिरवाडकर
भाषा मराठी
निर्मिती वर्ष इ.स. १९७०
कलाकार श्रीराम लागू

कलाकारसंपादन करा

या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे नाना पाटेकर हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.

नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले होते. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.न

या नाटकामध्ये अप्पा बेलवलकर यांच्या पत्नीची "कावेरी" ही भुमिका,'शांता जोग' यांनी अतिशय प्रभावीपणे साकारली होती .कलेसाठी स्वताला वाहून घेतलेल्या माणसासोबत संसार करताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी व ताण-तणावाच्या काळात प्रेमाने आणि संयमाने घर सावरणारी एक हळवी व खंबीर स्त्री 'कावेरी' या पात्रातून साकारली गेली.नटाची मुले देशोधडीला लागतात अशी त्यावेळी लोकांची समजूत असायची पण "नटसम्राट" नाटकामध्ये कावेरी' ने मात्र मुलांना शिक्षण व विचारांनी समृद्ध बनवले.

"नटसम्राट" हे नाटक अभिनयाचा अभ्यास करायला शिकवते, व खूप गोष्टी शिकवून जाते.

नटसम्राटचे सलग आठ प्रयोगसंपादन करा

या नाटकाच्या प्रयोगात अप्पासाहेब बेलवलकारांची भूमिका करणाऱ्या नटाला मानसिक थकवा येतो. असे असून २७ ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता सुरू झालेले आणि एकापाठोपाठ सलग चाललेले ’नटसम्राटचे’ एकाच नटसंचातले एकूण आठ प्रयोग २८ ऑगस्टच्या दुपारी दीड वाजता संपले. हे प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात एकूण ३१ तास ४५ मिनिटे चालले होते. हा बहुधा जागतिक विक्रम असावा. ’तीर्थराज’, ’रंगमैत्री’ आणि दादा कोंडकेफाउंडेशन यांनी हे प्रयोग रंगमंचावर सादर केले होते. गिरीश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते व अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिकाही केली होती.

माध्यमांतरसंपादन करा

नटसम्राट या नाटकावरून महेश मांजरेकर यांनी मराठीभाषेत चित्रपट बनवला आहे. या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत.

संदर्भसंपादन करा

युटूब वर आपण हे नाटक पाहू शकतो.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.